Shahu Maharaj : कल्याणकारी राज्यकर्ते शाहू महाराज!
1 min read⭐ राजकीय स्वातंत्र्य अगोदर की, सामाजिक सुधारणा अगोदर? असा वाद महाराष्ट्रात झाला. पण, राजकीय व्यवस्थेतून सामाजिक सुधारणा किती प्रभावीपणे अंमलात येऊ शकतात, याचा प्रत्यय त्यांनी आणून दिला.
⭐ पुरोहित आणि राजे अशी सांगड सर्वत्र असताना ती तोडून पर्यायी धर्मपद निर्माण करण्यापर्यंत आव्हान पुरोहितशाहीला दिले, हे राजसत्तेने क्वचितच केले होते.
⭐ ज्या सुधारणा करण्यासाठी आज आपण झगडतो, त्या अगदी त्यांनी सहज करून दाखवल्या. आज लग्नाचे मुलींचे वय 18 की 21 हा वाद सुरू असताना त्यांनी सन 1919 मध्ये मुलींच्या लग्नाचे वय 14 केले. पण, आज 100 वर्षांनी आपण त्या वयापुढील बालविवाह ही थांबवू शकलो नाही.
⭐ शिक्षण हक्क कायदा आणायला देशाला 2009 साल लागले. पण महाराजांनी 92 वर्षा अगोदर (सन 1917 ला) हे करून दाखवले. मुले न शिकवणाऱ्या पालकांना शिक्षा करण्याची आज हिंमत नाही. हे त्याकाळात त्यांनी करून दाखवले. आजही पुरेशी वसतिगृहे नसताना त्याकाळात करून दाखवली.
⭐ विधवा विवाह आजही होण्यात अडचणी येतात, समाजाची मानसिकता नकारात्मक आहे. सन 1916 मध्ये त्यांनी विधवा विवाह कायदा केला. हे धाडस खूप काळाच्या पुढचे होते.
⭐ भटक्या जमातींना आजही गुन्हेगार समजून त्यांच्यावर हल्ले होतात. नेहरूंनी येऊन 1952 ला गुन्हेगारी कलंक पुसला. पण महाराजांनी ते 34 वर्ष अगोदर करून दाखवले.
⭐ महारोग्यांची वेदना बाबा आमटेच्या आनंदवनानंतर आपल्याला कळली. पण महाराजांनी 1897 सालीच महारोग्यांसाठी आश्रम काढला.
⭐ शेतकरी आत्महत्या होताना अजूनही तो राज्यकर्त्यांचा प्राधान्यक्रम होत नाही. पण सिंचन, दुष्काळ उपाययोजना, हे त्या काळात करून दाखवले .
⭐ औद्याेगिकीकरण, रोजगार यावर आज परिसंवाद फक्त होताना. ते केव्हाच महाराजांनी करून दाखवले.
⭐ मर्यादित क्षेत्रात अमर्यादित काम हे बाबा आमटेंच्या वाक्याचे शाहू महाराज प्रतिक ठरले. एक राज्य किती कल्याणकारी असू शकते, याने आपण थक्क होतो.
⭐ वंदन या राजाला….