Mohful to Mohaamrut : मोहफूल ते मोहामृत एक प्रवास
1 min read
पुढे एप्रिल 2022 मध्ये काकडयेली, ता. धानोरा, जिल्हा गडचिरोली येथे मोहामृत (Mohaamrut) या उत्पादनाची सुरुवात करीत असताना अनेक अडचणी आल्यात व त्यावरही मात करून या उत्पादनासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना केलेले भारतीय उत्पादनाच्या आव्हानानुसार शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री सुक्ष्मअन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा (PMFME – Pradhan Mantri Formalisation of Micro Food Processing Enterprises Scheme) लाभ घेवून उराशी बाळगलेले मोहफूल प्रक्रियेचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविले. या कंपनीची स्थापना करीत असताना नजरेसमोर फक्त ग्रामीण भागातील आदिवासी व शाेषित समाजातील युवक व तेथील रहिवाशी यांचे जीवनमान कसे उंचविता येईल, हेच ध्येय ठेवून कार्य सुरू करण्यात आले. या मोहफुलाची (अमृताची ओळख ग्रामीण जीवनापासून दूर असलेल्या शहरी लोकांपर्यंत पोहचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. यापासून वनात राहणाऱ्या या बांधवाचे उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याचे लक्ष्य ठेवून प्रत्यक्ष मोह अमृताची निर्मिती कार्य सुरू करण्यात आले. आज आमच्या प्रकल्पात प्रत्यक्ष आठ कुटुंबांना काम देण्यात आले असून, अप्रत्यक्ष गावातील सर्वच कुटुंबांना याचा लाभ होतो आहे. त्यांची व्यापाऱ्याकडून होणारी पिळवणूक थांबविण्याचे कार्य या प्रकल्पाद्वारे केले आहे. सध्या या प्रकल्पाअंतर्गत दररोज 30 किलो मोहफुलावर प्रक्रिया करण्याचे कार्य नियमित सुरू असून, पुढे मागणीनुसार यांचे उत्पादन वाढविण्यास आम्ही कटीबद्ध आहाेत.

हे उत्पादन अनेक आजारावर गुणकारी असून, विशेषत्वाने हे उत्पादन मानवी शरीराला आवश्यक असणारी राेगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढविण्यात व महिला, भगिनींच्या मासिक पाळीतील (Menstrual cycle) अनियमिततेवर, त्या काळात होणारे त्रास, यापासून मुक्ती मिळविण्यास तसेच शरिरातील हिमोग्लोबिनचे (Hemoglobin) प्रमाण वाढविण्याचा एक नैसर्गिक स्त्राेत आहे. यात अनेक सूक्ष्म पाेषक घटक दडलेले असून, हे पूर्वापार आदिवासी बांधवांचे खाद्य राहिले आहे. त्यांच्या निराेगी जीवनाचे रहस्य सांगणारे असे एक अनमाेल देण म्हणजे, माेहफूल हाेय. अशा ऊर्जा व गुणवत्तेसह पाैष्टिक मूल्ये (Nutritional values) असणाऱ्या एका उत्पादनाची निर्मिती करून लाेकांना त्यांचे निराेगी जीवन जगण्यास अनमाेल असे सहकार्य करण्यासाठी कार्य करीत आहे. स्थानिक समाजाची संस्कृती जाेपासताना तसेच नैसर्गिक संसाधनांचा वापर करून या नवउद्योजकतेच्या प्रथम चरणी प्रवासादरम्यान गोंडवाना विद्यापीठाच्या ट्रायसेफ नवसंशोधन केंद्राचे संचालक प्रा. मनीष उत्तरवार यांनी या केंद्रात नवउद्योजक म्हणून नाेंदणी करण्याची प्रक्रिया हाती घेतली. पुढील टप्प्यात भारत सरकारच्या आयुष विभागांतर्गत माेहामृतची चाचणी, परवाना या महत्त्वाच्या बाबींवर कार्यवाही करून माेहामृत जागतिक पातळीवर निर्यात (Export) करण्याचे अंतिम उद्दिष्ट ठेवले आहे.