krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Women’s invisible labor in GDP :केंद्रीय अर्थमंत्री महाेदया, महिलांच्या अदृश्य श्रमाचा ‘जीडीपी’मध्ये समावेश करा!

1 min read
Women's invisible labor in GDP :

श्रीमती निर्मला सीतारामन,
केंद्रीय अर्थमंत्री,

आदरणीय महोदया,
आम्ही पूर्वी आयोजित केलेल्या महिला (Women) बचतगट प्रशिक्षणामध्ये (Traning) आम्ही मांडलेल्या एका मागणीचा येथे जागतिक महिला दिनानिमित्ताने पुनरुच्चार करीत आहे. महिलांच्या अदृश्य श्रमाचा जीडीपी (GDP) अर्थात ‘सकल राष्ट्रीय उत्पादना’मध्ये (Gross domestic product) समावेश करा. महिला आपल्या कुटुंबासाठी अहोरात्र काबाडकष्ट (Unpaid Domestic Work- प्रती दिन 299 मिनिटे) करीत असतातच. तसेच शेती व पूरक व्यवसायामधील कामांमध्ये त्यांचा 65 टक्के सहभाग असतोच. परंतु, आपल्या अर्थतज्ज्ञांनी या अदृश्य श्रमाकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष केले आहे.

🚺 5 जानेवारी 2021 राेजी सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या समितीने एका खटल्यामध्ये निकाल देताना अशी आशा व्यक्त केली की, ‘केंद्र सरकारने देशातील गृहिणींच्या श्रमांचे अर्थ मूल्यांकन करण्याची प्रक्रिया सुरू करायला हवी.’ कीर्ती विरुद्ध ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या एका प्रकरणात न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा म्हणाले की, गृहिणी काम करत नाहीत किंवा घरामध्ये आर्थिक मूल्य जोडत नाहीत, ही संकल्पना ‘समस्यापूर्ण’ कल्पना आहे. जी अनेक वर्षांपासून कायम आहे आणि त्यावर मात करणे आवश्यक आहे. हा निकाल सामाजिक समतेच्या घटनात्मक दृष्टिकोनातून व महिलांच्या श्रमांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठीचे एक महत्त्वाचे पाऊल आहे. हा दूरगामी परिणाम करणारा ऐतिहासिक निकाल आहे असे आम्ही मानतो.

🚺 अनुजाथ सिद्धुने वयाच्या दहाव्या वर्षी एक पेंटिंग काढले होते. शिर्षक होते ‘My Mother and Mothers in my neighbourhood’. त्यात महिला किती विविध प्रकारची कामे करतात, त्याचे चित्रण केले होते. या चित्रातून त्याची भावना प्रगट होते. या पेंटिंगला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. केरळ सरकारने या चित्राची निवड ‘Gender Budget Document’ च्या मुखपृष्ठासाठी केली. सोबत चित्र जोडले आहे. पण हा सन्मान पाहायला त्याची आई जिवंत नव्हती.

🚺 महिलांच्या कष्टाचे शास्त्रीय मोजमाप करून त्याची नोंद जीडीपी – सकल राष्ट्रीय उत्पादनामध्ये करणे ही काळाची गरज आहे.

🚺 आमचा ठाम विश्वास व अपेक्षा आहे की तुम्ही आमच्या सूचनेचा विचार कराल. कारण एक स्त्री म्हणून तुम्हालाही असाच अनुभव आला असणार.

🚺 असे झाल्यास भारताने जगासाठी प्रस्थापित केलेला हा नवा ट्रेंड व पायंडा असेल. ज्याचा इतर देश अनुकरण करतील.

प्रत :- ✳️ राष्ट्रपती, भारत सरकार
✳️ मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
✳️ पंतप्रधान व पीएमओ ऑफिस
✳️ एकच ध्यास- शेतकरी आणि एकात्मिक ग्रामीण विकास!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!