Farmer suicide : शेतकरी आत्महत्यांची उपेक्षा पाहून किसानपुत्रात तीव्र असंतोष
1 min read
अन्नत्याग कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यासाठी 21 फेब्रुवारी 2023 ला किसानपुत्र आंदोलन सदस्यांची आढावा बैठक पार पडली होती. या बैठकीसोबतच किसानपुत्र आंदोलनाचे गडचिरोलीपासून कोकणापर्यंतचे प्रतिनिधी अन्नत्याग कार्यक्रमाची काय तयारी करीत आहेत, याबाबत अमर हबीब यांनी माहिती दिली. ते म्हणाले, पुण्यात किसानपुत्र बालगंधर्व जवळ किसानपुत्र प्रतिनिधी व नागरिक उपोषणाला बसतील. त्यानंतर संध्याकाळी एसेम फाउंडेशन येथे ‘कोरडी शेती ओले डोळे’ या पुस्तकावर आंतरभारतीच्या वतीने परिसंवाद होईल, असे मयूर बागुल यांनी सांगितले. याला नितीन राठोड, विश्वास सूर्यवंशी आदी सहकार्य करणार आहेत.
आंबाजोगाईत पत्रकार उपोषणाला बसणार आहेत, असे सांगून अनिकेत डिघोळकर म्हणाले की, सुदर्शन रापतवार यांच्या मार्गदर्शनाखाली संध्याकाळी वसंत मुंडे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. शैलजा बरुरे या स्वाराती महाविद्यालयातील विद्यार्थी मिरवणुकीने व्याख्यान स्थळी येतील असेही त्यांनी सांगितले. शहरातील विविध संघटना सहकार्य करीत आहेत. परतुर (जालना) च्या नवनाथ तनपुरे यांनी गावोगाव भोगा लावून 19 मार्चला उपवास करण्याचे नागरिकांना आवाहन करीत आहेत. ऐश्वर्या तनपुरे शेतकरी आत्महत्यांवर स्ट्रीट प्ले करणार आहे. अकोट (जिल्हा अकोला) येथे यंदा मोठ्या प्रमाणात उपवासाची तयारी करीत असल्याचे मुकेश टापरे यांनी सांगितले. देगलूरचे नरसिंग देशमुख, नांदेडचे प्रा डॉ विकास सुकाळे, डॉ. हरीश नातू पदयात्रेत सहभागी होतील. औरंगाबादचे भूषण पाटील यांनी 4 तारखेला बैठक बोलावली असल्याचे सांगितले. संदीप धावडे यांनी वर्ध्याच्या उपोषणाच्या तयारीची माहिती दिली. रामकिसन रुद्राक्ष, डांगे (जवळा बाजार) अनंत देशपांडे (लातूर) यांनीही मार्गदर्शन केले.
❇️ पदयात्रा
डॉ. राजीव बसर्गेकर यांनी किनगाव (जळगाव) ते धुळे या मार्गावर निघणाऱ्या पदयात्रेबद्दल माहिती दिली. हृतगंधा पाटील व संदीप धावडे यांचे वडील पदयात्रेत सहभागी होणार आहेत, असे त्यांनी सांगितले. ही पदयात्रा 12 मार्चला निघणार आहे. ) या पडयात्रेची तयारी सुभाष कच्छवे (परभणी करीत आहेत.