krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

शूद्र म्हणजे काय?

1 min read
ज्या समजाला स्वतःचे निर्णय घेता येत नाहीत. त्यांना न विचारता दुसरेच कोणीतरी कायदे तयार करून त्यांच्यावर लादत असतं. त्यांचा न्याय मागण्याचा अधिकार नाकारला जातो. त्यांना इतर समाजापासून दूर ठेवलं जातं, त्यांची शूद्र म्हणून निर्भत्स्ना केली जाते, उपहास केला जातो. इतर समाजापेक्षा कमीपणाची वागणूक दिली जाते. समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यापासून रोखले जाते, बंदी घातली जाते. तसे असेल तर मग आज असा कोणता समाज आहे ज्यांना वरील प्रमाणे वागवले जाते? निर्वीवादपणे शेतकऱ्यांचे नाव घ्यावे लागेल.

🌐 होय आज 75 कोटी शेतकरी शूद्र आहेत. भलेही शेतकऱ्यांची पोरं स्वतःला क्षत्रियांची पोरं समजून घेत असतील, पण ते काही खरे नाही.
🌐 शेतकऱ्यांनी शेती किती बाळगावी सरकार ठरवते.
🌐 त्यात काय आणि किती पिकावावे, त्याचे भाव काय असतील, हे पण सरकार ठरवते.
🌐 सरकार त्यांची जमीन हवी असेल तेव्हा जबरदस्तीने काढून घेऊ शकते.
🌐 कोणते तंत्रज्ञान वापरावे तेही सरकार सांगणार.

मग शेतकरी काय करतो?
🌐 सरकार जे सांगेल, जे कायदे करेल ते मान्य करून त्याबरहुकूम चालत राहणे, यापलीकडे काही करू शकत नाही.
🌐 पूर्वी शूद्रांना असेच वागवले जायचे ना?
🌐 अशा समजालाच तर शूद्र मानले जाते.

⚫ जमीन धारणा कायदा.
⚫ आवश्यक वस्तू कायदा.
⚫ जमीन अधिग्रहण कायदा.
हे कायदे शेताकऱ्यांच्या शूद्र असण्याची साक्ष देतात.
जुन्या चातूर्वर्ण्य व्यवस्थेच्या नावाने ओरडणाऱ्यांनो, ते कधी गेलेच नव्हते. नव्या रूपाने ते पुन्हा अवतरले आहे हे तुम्ही कधी बघणार आहात?

1 thought on “शूद्र म्हणजे काय?

  1. खूप सुंदर…
    सद्या शेतकऱ्याजवळ लाचारी शिवाय काहीच शिल्लक ठेवलं नाही,
    भारतीय संविधानात शेड्युल 9 जोडून, तोंड दाबून बुक्कयांचा मार सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!