krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Mahabeej’s Seed Preparation : खरीपाच्या धक्क्यानंतर रब्बीसाठी राज्याची महा‘बीज’तयारी!

1 min read

Mahabeej’s Seed Preparation : यावर्षीच्या मान्सूनमधील पावसाचा दीर्घ खंड व तूट तसेच पिकांना बसलेल्या पाण्याच्या ताणामुळे पिकांचे माेठे नुकसान झाले आहे. याच दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्याने रब्बीसाठी नियोजन केले आहे. ‘ई-पीक पाहणी’च्या नोंदींच्या आधारे बियाणे, खत व पीक कर्जाचे नियोजन करण्यात आले असून, ‘महाबीज’कडून (Mahabeej) रब्बी (Rabi) व उन्हाळी हंगामासाठी 4,10,778 क्विंटल सुधारित व प्रमाणित बियाणे (Seed) उपलब्ध करण्यात आले आहे. यातील बहुतांश वाण कमी पाण्यात चांगले उत्पादन देणारे व पाण्याचा ताण सहन करणारे आहेत.

🔲 रब्बी ज्वारी
रब्बी ज्वारीचे (Sorghum) 16,609 क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात आले असून, यात पीव्हीके-1009 (परभणी शक्ती) 6,125 क्विंटल, मालदांडी (एम. 35-1) 5,995.14 क्विंटल, एसपीव्ही-2407 (परभणी सुपर मोती) 2,325.82 क्विंटल, फुले यशोमती 831.14 क्विंटल, एसपीव्ही-1411 (परभणी मोती) 508.3 क्विंटल, फुले रेवती 333.08 क्विंटल, फुले सुचित्रा 272.98 क्विंटल, एकेएसव्ही-9-आर (पीकेव्ही क्रांती) 194.3 क्विंटल आणि एसपीव्ही-1595 (परभणी ज्योती) 23 क्विंटल आहे.

🔲 गहू
गव्हाचे (Wheat) एकूण 1,04,289 क्विंटल बियाणे उपलब्ध करून दिले आहे. यात जीडब्ल्यू-496 वाणाचे 28,792 क्विंटल, लोक-वन 23,284 क्विंटल, एमएसीएस-6222 वाणाचे 14,720 क्विंटल, फुले समाधान (एनआयएडब्ल्यू-1944) 14,038 क्विंटल, एमएसीएस-6478 वाणाचे 5,802 क्विंटल, डीबीडब्ल्यू-168 वाणाचे 4,273 क्विंटल, एचआय-1544 (पूर्णा) 3,600 क्विंटल, पूसा वाणी (एचआय-1633) 3,009 क्विंटल, पीकेव्ही सरदार 1,629 क्विंटल, फुले नेत्रवती 1,537 क्विंटल, फुले अनुपम 998 क्विंटल, यूएएस-428 वाणाचे 869 क्विंटल, लोक-79 वाणाचे 820 क्विंटल, करण शिवाजी 285 क्विंटल, फुले पौष्टिक 225 क्विंटल, एमपी (जेडब्ल्यू)-78 वाणाचे 150 क्विंटल, फुले अनुराग 130 क्विंटल, जीडब्ल्यू-1346 वाणाचे 99 क्विंटल, लोक-1 (जैविक) 21 क्विंटल आणि फुले सात्विक वाणाचे 8 क्विंटल बियाणे उपलब्ध आहे.

🔲 हरभरा
विविध वाणाच्या हरभऱ्याचे (Gram) एकूण 2,75,753 क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे. यात जाकी-9218 वाणाचे 1,95,141 क्विंटल, फुले विक्रांत 20,369 क्विंटल, विजय 12,088 क्विंटल, फुले विश्वराज 11,956 क्विंटल, फुले विक्रम 9,410 क्विंटल, दिग्विजय 6,785 क्विंटल, पीकेव्ही काबुली-2 वाणाचे 5,004 क्विंटल, एकेजी-1109 (पीकेव्ही कांचन)3,512 क्विंटल, पीकेव्ही कनक 3,191 क्विंटल, बीडीएनजीके-798 वणाचे 1,638 क्विंटल, बीजी-10216 (पूसा चिकपी) 1,574 क्विंटल, सुपर अन्नेगिरी-1 वाणाचे 1,184 क्विंटल, विक्की (महाबीज-2002) 900 क्विंटल, बीजी-30-62 (पूसा पार्वती) 666 क्विंटल, विशाल 625 क्विंटल, आरव्हीजी-204 वाणाचे 622 क्विंटल, जाकी-9218 (जैविक) 450 क्विंटल, बीजी-20211 (पूसा मानव) 267 क्विंटल, विराट 164 क्विंटल, तोरण (महाबीज-2006) 92 क्विंटल, पीकेव्ही सुपर जाकी 58 क्विंटल, बिग बी (एम-2001) 53 क्विंटल, कोटा काबुली चना-3 वाणाचे 4 क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे.

🔲 रब्बी गळीत धान्य
रब्बी गळीत धान्यांचे एकूण 1,842 क्विंटल बियाणे उपलब्ध करून दिले आहे. करडईचे (Safflower) 1,041 क्विंटल बियाणे उपलब्ध असून, यात पीबीएनएस-154 (परभणी सुवर्णा) 563 क्विंटल, पीबीएनएस-12 वाणाचे 338 क्विंटल, एएनजी-17-102 वाणाचे 92.04 क्विंटल, एसएसएफ-12-40 वाणाचे 34.8 क्विंटल, फुले एसएसएफ-708 वाणाचे 17.2 क्विंटल, एसएसएफ-15-65 (फुले गोल्ड) 13.2 क्विंटल, पीकेव्ही पिंक 3.71 क्विंटल तसेच जवसचे (Flaxseed) 247 क्विंटल बियाणे उपलब्ध असून, त्यात एलएसएल-93 वाणाचे 170.27 क्विंटल, एनएल-260 वाणाचे 76.6 क्विंटल आणि मोहरीचे (Mustard) 554 क्विंटल बियाणे उपलब्ध असून, त्यात टीएएम-108 वाणाचे 1 क्विंटल बियाणे आहे.

🔲 उन्हाळी पिके
विविध उन्हाळी पिकांचे एकूण 12,285 क्विंटल बियाणे उपलब्ध आहेत. यात भुईमूग (Groundnut) बियाणे 12,000 क्विंटल असून, भुईमुगाच्या टीएजी-73 वाणाचे 8,000 क्विंटल, के-1812 वाणाचे 2,000 क्विंटल, टीएजी-24 वाणाचे 2,000 क्विंटल तसेच तीळ बियाणे (Sesame seeds) 185 क्विंटल असून, त्याच्या फुले पूर्ण वाणाचे 180 क्विंटल, पीकेव्हीएनटी-11 वाणाचे 5 क्विंटल; मूग (Moong) बियाणे 100 क्विंटल उपलब्ध असून, त्यात शिखा वाणाचे 100 क्विंटल बियाणे आहे.

राज्यातील शेतकऱ्यांनी लहरी हवामानाचा सामना करण्यासाठी जमिनीतील उपलब्ध ओलाव्याचा अचूक अंदाज घेऊनच रब्बीची पेरणी करावी. कमी पाण्यात भरपूर उत्पन्न देणाऱ्या ‘महाबीज’च्या प्रमाणित आणि गुणवत्तापूर्ण सुधारित वाणांचीच निवड करून शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न वाढवावे, असे आवाहन महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांनी केले आहे.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!