krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Cold-Weather : पुढील 10 दिवस थंडीसाठी पूरक!

1 min read

Cold-Weather : कार्तिक पौर्णिमा (गुरुनानक जयंती) अर्थात मंगळवार (दि. 24 नोव्हेंबर) ते कार्तिक एकादशी (आळंदी यात्रा) म्हणजेच शुक्रवार (दि. 4 डिसेंबर) पर्यंतच्या 10 दिवसात महाराष्ट्रात थंडीची (Cold) शक्यता जाणवते.

📍 विदर्भात थंडीचे प्रमाण अधिक
विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर व गडचिरोली अशा 8 जिल्ह्यात या 10 दिवसात थंडीचा जोर अधिक असू शकतो.

📍 कशामुळे या थंडीत वाढ होवू शकते?
महाराष्ट्रावर जमिनीपासून 3 किमी उंचीपर्यंत प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्याची (Alternating cyclic winds) स्थिती असून, महाराष्ट्रावर हवेचा दाब 1014 हेक्टापास्कल (Hectopascal) टिकून आहे. त्यामुळे वाढलेल्या हवेच्या घनतेतून पहाटे थंडावलेल्या महाराष्ट्राच्या भूभागावर थंडीचे संक्रमण होत आहे. शिवाय, उत्तर भारतात असलेला 1016 हेक्टापास्कल इतका वाढीव हवेचा दाबामुळे उत्तरेकडील बर्फाळ थंडी ईशान्यकडे वाहणाऱ्या थंड कोरड्या वाऱ्याद्वारे महाराष्ट्रात लोटली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा व डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीचा चांगलाच प्रभाव जाणवेल, असे वाटते. अकवान (Akwan) चक्रीवादळाने (Cyclone) बदललेल्या दिशेमुळेही महाराष्ट्रातील थंडीस अनुकूलता मिळाली आहे. सध्या प्रत्येक दिवसागणिक मिळणारी थंडी व तसेच आर्द्रतेच्या अभावातून माफकच दवीकरण (Dew) जाणवत आहे, रब्बी पिकांच्या दृष्टीने ही जमेची बाजू समजावी.

📍 पाऊस व चक्रीवादळ
येत्या पंधरवड्यात अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्मिती शक्यता नाही. त्यामुळे महाराष्ट्रातही पावसाची (Rain) शक्यता नाही.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!