Rain intensity to subside : पावसाचा जोर ओसरणार
1 min read
Rain intensity to subside : जुलै महिन्यातील चालू असलेल्या पावसाच्या (Rain) सातत्यानंतर मंगळवार (दि. 4 ऑगस्ट) पासून पुढील 3 दिवस म्हणजे गुरुवार (दि. 6 ऑगस्ट) पर्यंत खानदेश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलढाणा, अकोला, वर्धा, वाशिम, यवतमाळ व संपूर्ण मराठवाडा अशा 24 जिल्ह्यांत पावसाचा जोर काहीसा ओसरून केवळ हलक्या श्रावणपहाळी टाईप पावसाची शक्यता जाणवते.
🔷 कोकण व विदर्भातील पाऊस
मुंबईसह संपूर्ण कोकण व पूर्व विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली अशा 12 जिल्ह्यांत मात्र आजपासून (रविवार, दि. 2 ऑगस्ट) पुढील पाच दिवस म्हणजे 2 ते 6 ऑगस्ट दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता जाणवते.
🔷 ऑगस्ट महिन्यातील सरासरीपेक्षा अधिक पावसाचे जिल्हे
संपूर्ण मराठवाडा व सोलापूर तसेच विदर्भातील वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली अशा 16 जिल्ह्यांत ऑगस्ट महिन्यातील त्यांच्या सरासरी पावसापेक्षा अधिक पावसाची शक्यता जाणवते.
🔷 ऑगस्ट महिन्यातील सरासरीपेक्षा कमी पावसाचे जिल्हे
मुंबईसह संपूर्ण कोकण, खानदेश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलढाणा, अकोला व वर्धा अशा 20 जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यातील त्यांच्या सरासरी पावसापेक्षा कमी पावसाची शक्यता जाणवते.