Rain forecast : आषाढी एकादशीपर्यंत पावसाचे सातत्य कायम
1 min read
Rain forecast : गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात मान्सूनच्या दुसऱ्या आवर्तनातील सुरू असलेला मध्यम ते मुसळधार पाऊस (Rain) अजून पुढील चार दिवस म्हणजे मोठ्या (आषाढी) एकादशी (शनिवार दि. 25 जुलै, पंढरपूर यात्रा)पर्यंत कायम राहण्याची शक्यता (forecast) जाणवते. त्यातही विशेषतः बुधवार (दि. 22) व गुरुवारी (दि. 23) पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता जाणवते.
📍 द्वादशीपासून उघडीप
द्वादशी अर्थात रविवार (दि. 26 जुलै) ते शुक्रवार (दि. 31 जुलै)पर्यंतच्या सहा दिवसात मध्य महाराष्ट्रातील खानदेश, नाशिक ते सांगली सोलापूरपर्यंतच्या 10 व मराठवाड्यातील 8 अशा 18 जिल्ह्यात काहीशी उघडीप मिळण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकण व विदर्भात मध्यम व हलक्या पावसाची शक्यताही कायम आहे.
📍 उघडीप कशामुळे?
🔆 पावसाळी हंगामातील महाराष्ट्रातील पावसाला पूरक ठरणारा देशाच्या मध्यावरील दीड किमी उंचीपर्यंतचा पूर्वो-पश्चिम हवेच्या कमी दाबाचा आस त्याच्या सरासरी जागेपासून पुन्हा अधिक उत्तरेकडे म्हणजेच उत्तर प्रदेशाकडे सरकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
🔆 बंगालच्या उपसागरातील उंचीवरील हवेचे तीव्र कमी दाब क्षेत्र हे पूर्व उत्तरप्रदेशाकडे सरकण्याच्या शक्यतेमुळे अरबी समुद्रातून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकणारे सध्याचे बळकट मान्सून वारे कमकुवत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 4 दिवस पावसाचा जोर कमी होवून मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात काहीशी उघडीप जाणवणार आहे.
🔆 ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातील पुढील पाऊस वा पुढील उघडीपी संबंधीचा खुलासा रविवार (दि. 2 ऑगस्ट (संकष्टचतुर्थी) दरम्यान तयार होण्याऱ्या वातावरणीय प्रणाल्यांच्या निर्मिती शक्यतेच्या आधारावरच खुलासा करता येईल. असे वाटते.
🔆 जुलै महिन्यातील 2 ते 8 व 17 ते 25 जुलै दरम्यान झालेल्या पावसाने धरणे व इतर जलाशयात साठवणीत विशेष नसली तरी काहीशी वाढ झाली आहे. ऑक्टोबर अखेर नक्कीच पाणी पातळीत चांगली वाढ होण्याची शक्यता आहे.