krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Unseasonal rain, Hailstorm : अवकाळी पावसासह तुरळक गारपीट

1 min read

Unseasonal rain, Hailstorm : आजपासून (साेमवार, दि. 16 मार्च) ते शुक्रवार (दि. 20 मार्च पर्यंतच्या पाच दिवसात कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात विजा, वारा-वावधन, गडगडाटासह दुपारनंतर उष्णता संवहनी प्रक्रियेतून तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची (Rain) शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः गुढी पाडव्याला, आदल्या व दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. 18, 19 व 20 मार्च (बुधवार, गुरुवार व शुक्रवार) या तीन दिवशी असल्या वातावरणासह, अमरावती, अकोला, वर्धा, बुलढाणा, वाशिम, नागपूर, भंडारा, गोंदिया व यवतमाळ तसेच नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बीड, धाराशिव, लातूर सह मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, सातारा, सांगली व सोलापूर या 20 जिल्ह्यात पावसाची शक्यता अधिक जाणवते.

📍 गारपीटीची शक्यता
परवा बुधवार, दि. 18 मार्च रोजी अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा व गोंदिया या सहा जिल्ह्यात किरकोळ गारपीटीची (Hailstorm) शक्यताही नाकारता येत नाही.

📍 उष्णतेची लाट व रात्रीचा उकाडा
मुंबईसह उत्तर कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रात जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे तसेच छत्रपती संभाजीनगर अशा 13 जिल्ह्यात काहीशी उष्णता व रात्रीच्या उकाड्याची शक्यता निर्माण झाली आहे. तत्पूर्वी गुरुवार, दि. 12 ते शनिवार दि. 14 मार्चपर्यंत महाराष्ट्रातील अलिबाग, डहाणू, हर्णाई, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, ब्रम्हपुरी, बुलढाणा येथे उष्णतेची लाट किंवा उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थिती निर्माण झाली हाेती. रविवार दि. 15 मार्चपासून महाराष्ट्रात 4-5 दिवस दुपारच्या कमाल तापमानात काहीशी घसरण होवून उन्हाची ताप व दमटपणा कमी हाेण्याची शक्यता निर्माण झाली हाेती.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!