krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Return monsoon forecast : परतीचा मान्सून जागेवरच थबकला

1 min read

Return monsoon forecast : महाराष्ट्रातील सध्य:स्थितीतील तीव्र वातावरणीय प्रणालीमुळे देशात परतीच्या मार्गावर असलेला मान्सून (Monsoon) शुक्रवार (दि. 3 ऑक्टोबर) पर्यंत गुजरातमधील वेरावळ, भरूच, मध्य प्रदेशातील उज्जैन, उत्तर प्रदेशातील झाशी, शहाजहानपूर ह्या शहरादरम्यानच्या सीमारेषेवर आठवडाभरापासून जागेवरच थबकला असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी वातावरण पूरकतेची शक्यता (forecast) टिकून राहू शकते. हा पाऊस (Rain) परतीच्या मान्सूनचा (Return monsoon) नसून, मान्सूनचा आहे.

🔆 हवेच्या तीव्र कमी दाबात रूपांतर
अपेक्षित असलेल्या हवेच्या कमी दाबाचे शनिवारी (दि. 27 सप्टेंबर) पहाटे तीव्र कमी दाबात रूपांतर झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात दसऱ्यापर्यंत (दि. 2 ऑक्टाेबर) अपेक्षित असलेल्या जोरदार पावसाला ही प्रणाली पूरक ठरण्याची शक्यता कायम आहे.

🔆 मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होणार
हवेच्या तीव्र कमी दाब वातावरण प्रणालीच्या नेमक्या प्रभावी टप्प्यात सापडलेल्या दक्षिण मराठवाड्यातील जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी तसेच सोलापूर जिल्हा क्षेत्रात मंगळवार (दि. 30 सप्टेंबर)पासून 2-3 दिवस पावसासाठी काहीशी उघडीप मिळू शकते.

🔆 पूरजन्य परिस्थितीची शक्यता
संपूर्ण मराठवाडा, विदर्भ तसेच जळगाव, नाशिक, अहिल्यानगर व सोलापूर अशा महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यात मंगळवार (दि. 30 सप्टेंबर)पर्यंतच्या 4 दिवसात पूरजन्य परिस्थितीची शक्यता जाणवत असून, धरण क्षेत्रातून नद्यांच्या पात्रात पुन्हा एकदा पूर पाण्याच्या विसर्गाची शक्यता जाणवते.

🔆 अंदमानजवळ तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र वायव्येकडे सरकणार
मंगळवार (दि. 30 सप्टेंबर) दरम्यान अंदमानजवळ बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्या क्षेत्राचे उत्तर व उत्तर मध्य भारताकडे मार्गक्रमण हाेण्याची शक्यता असल्यने महाराष्ट्रात दि. 8-9 ऑक्टोबर दरम्यानच्या पावसाच्या चौथ्या आवर्तनाच्या धोका कमी जाणवतो.

🔆 दसऱ्यानंतर उघडीपीची शक्यता
शुक्रवार (दि. 3 ऑक्टोबर)पासून महाराष्ट्रात पूर्णतः नव्हे, परंतु काहीशी उघडीपीची शक्यता जाणवते.

🔆 मुंबईत जोरदार पावसाची शक्यता
मुंबईत मात्र दसऱ्यानंतरही पावसाची शक्यता कायम जाणवत आहे.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!