Hail Possibility : विदर्भासह महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता
1 min read
Hail Possibility : महाराष्ट्रातील संपूर्ण कोकण, खानदेश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, नांदेड, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा व अमरावती या 26 शनिवार (दि. 3 मे) ते शनिवार (दि. 10 मे) पर्यंतच्या आठवड्यात ढगाळ वातावरण राहुन किरकोळ ठिकाणी एखाद दुसऱ्या दिवशी विजा, वारा व गडगडाटीचे वातावरण राहील. कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात दोन ते तीन दिवस खालील तारखांना व जिल्ह्यांत अवकाळी पावसाच्या (Unseasonal rain) तीव्रतेबरोबर गारपिटीची (Hail) शक्यता (Possibility) निर्माण झाली आहे.
🔆 नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव – 4 ते 7 मे (रविवार ते बुधवार)
🔆 अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर – 6 व 7 मे (मंगळवार व बुधवार)
🔆 संपूर्ण मराठवाडा – 7 मे (बुधवार)
🔆 संपूर्ण विदर्भ – 4 व 5 मे (रविवार व सोमवार)
🟣 दिवसाचे तापमान
कोकण 34 ते 35 डिग्री सेंटिग्रेड, मध्य महाराष्ट्र 37 ते 42 डिग्री सेंटिग्रेड, मराठवाडा 41 ते 42 डिग्री सेंटिग्रेड, विदर्भ 42 ते 44 डिग्री सेंटिग्रेड.
असे असले तरी कमाल व किमान तापमान हे सरासरी व काही ठिकाणी सरासरीच्या खाली आहे. त्यामुळे मे महिना असूनही उष्णतेच्या तापेपासून ही सुसह्यताच आहे. संपूर्ण महाराष्ट्रात रात्रीचा उकाडा वा उष्णतेच्या लाटेची शक्यता कुठेही जाणवत नाही.
🟣 गारपिटीची शक्यता कशामुळे?
छत्तीसगडमध्ये घड्याळ काटा दिशेच्या विरुद्ध फिरणाऱ्या आवर्ती व अरबी समुद्रात दीड किमी उंचीपर्यंत घड्याळ काटा दिशेने फिरणाऱ्या प्रत्यावर्ती अशा दोन्हीही चक्रीय वाऱ्यांच्या संगमातून कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता या दोन तीन दिवसात निर्माण झाली आहे. प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात ताशी 45 ते 50 किमी वेगाने वाहणाऱ्या आर्द्रतायुक्त उत्तरी वाऱ्यामुळे हा वातावरणीय बदल समजावा.