krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Rainy weather & cold : पावसाळी वातावरण निवळणार, थंडीला सुरुवात हाेणार

1 min read
Rainy weather & cold : महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण (Rainy weather) गुरुवार (दि. 11 जानेवारी 2024) पासून निवळणार आहे. साेबतच हळूहळू पहाटेच्या किमान तापमानाचा पारा 2 ते 3 डिग्रीने घसरून सरासरीच्या सामान्य पातळीत पोहोचेल. येत्या 2-3 दिवसानंतर पारा अजून खाली घसरण्याची शक्यता आहे. मकरसंक्रांती दरम्यान चांगली थंडी (cold) जाणवण्याची अपेक्षा आहे. विशेषतः विदर्भात गुरुवारपासूनच चांगली थंडी पडू शकते. अर्थात सध्या लगेचच थंडीच्या लाटीची शक्यता नाही, असा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.

एका मागे एक पश्चिमी झंजावात साखळी उत्तर भारतात सुरूच आहे. शुक्रवारी (दि. 12 जानेवारी 2024) मध्यम पश्चिमी झंजावात वायव्येकडून प्रवेशित होऊन आपल्याकडील येणाऱ्या अपेक्षित थंडीला पूरक ठरू शकते. दक्षिणेतील हिवाळी पावसाचा हंगाम आटोपण्याची शक्यता असताना अजूनही केरळ व तामिळनाडू या राज्यात पावसाचा जोर कायम आहे. त्याचाच परिणामातून महाराष्ट्रात आता जसे दोन दिवस वातावरण बदलले, तसे वातावरणात बदल होत आहे.

तीन आठवडे उलटले तरी दाट धुक्यापासून पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये अजूनही चालूच आहे व पुढील काही दिवस ही स्थिती राहू शकते. त्याचाच परिणाम आपल्याकडील खानदेशातील जिल्ह्यात होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!