Rainy weather : दोन दिवस पावसाळी वातावरण
1 min read
Rainy weather : संपूर्ण महाराष्ट्रात मंगळवार (दि. 9 जानेवारी 2024) व बुधवार (दि. 10 जानेवारी 2024) या दोन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण (Cloudy weather) राहणार असून, अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची (Rain) शक्यता जाणवते. ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यात भुर-भुऱ्या (ड्रीझल) टाईप पावसाची शक्यता अधिक असू शकते. उर्वरित विदर्भात पावसाची शक्यता जाणवत नाही, अशी शक्यता हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.

🔆 कशामुळे हा पाऊस?
साक्री व दापोली शहर अक्षवृत्त व पोरबंदर शहर रेखावृत्त दरम्यान अरबी समुद्रात समुद्र पाण्याच्या पृष्ठभागापासून वर उंच दीड किमीपर्यंत पसरलेल्या हवेच्या कमी दाबाच्या आसामुळे खेचलेल्या पुरवी झोताचे दमट व उत्तरी दिशेकडून थंड वारे ह्यांच्या संयोगातून सध्या महाराष्ट्रात दोन दिवस पावसाळी वातावरण घडून आले. गुरुवार (दि. 11 जानेवारी)पासून पावसाळी वातावरण निवळून हळूहळू किमान तापमानात घसरण हाेईल व थंडीला सुरुवात होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.