krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Sapodilla : मुलांचे आवडते फळ ‘चिकू’

1 min read
Sapodilla : चिकू हे सर्वांना आवडणारे फळ! सर्व वयोगटातील माणसे चिकू (Sapodilla ) आवडीने खातात. लहान मुलांना तर हे अतिशय प्रिय असते. मलाही लहानपणापासून चिकू खूप आवडायचे. परंतु, हे फळ खायला मिळणे हे त्या काळात अतीशय दुर्मिळ होते.आमच्या शेजारील गावात एका शेतकऱ्याकडे चिकूची बाग होती. आम्ही त्या गावात चिकू खाण्यासाठी जात असत. परंतु, या झाडांचा चिकू पिकलेले कधीच मिळतं नसतं. कच्चा तोडला तर त्याला वृच्चिक निघत असे. अनेक वेळा आम्ही कच्चे चिकू खात असत. त्यामुळे त्याचा रस तोंडाला लागून खूप आग होत असे. पुढील काळात मी दहावीला असताना माझ्या वडिलांनी 40 चिकूची झाडे लावली. त्यातील 15 झाडे यशस्वी झाली व मला घरीच मनसोक्त चिकू खाण्यास मिळू लागले.

🔆 झाडाची रचना
चिकूचे झाड Sapotaceae कुटुंबातील आहे. झाडाला राखाडी-तपकिरी साल असलेले सरळ खोड असते. जे वयाबरोबर खडबडीत आणि फुगलेले होते. त्याच्या फांद्या सममितीय पद्धतीने पसरतात व दाट, गोलाकार मुकुट बनवतात. पाने चकचकीत, अंडाकृती आकाराची आणि चामड्याची असतात. फांद्यांवर आळीपाळीने मांडलेली असतात. ते वरच्या पृष्ठभागावर गडद हिरवे आणि खाली फिकट हिरवे असतात. चिकूच्या झाडावर फिकट पिवळी किंवा मलई रंगाची छोटी, न दिसणारी फुले येतात. ही फुले सामान्यत: एकाकी असतात किंवा लहान गुच्छांमध्ये मांडलेली असतात.

🔆 लागवड
चिकूची झाडे उष्ण आणि दमट हवामानासह उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशात वाढतात. त्यांना दव-मुक्त वातावरण आवश्यक आहे आणि ते 5 ते 45 अंश सेल्सिअस तापमान सहन करू शकतात. वालुकामय चिकणमाती, चिकणमाती किंवा लॅटराइट मातींसह चांगले निचरा होणारी माती हे झाड पसंत करते. ते किंचित अम्लीय ते किंचित अल्कधर्मी मातीच्या pH पातळीच्या विस्तृत श्रेणीशी देखील जुळवून घेऊ शकते. चिकूच्या झाडांचा प्रसार बियांद्वारे केला जाऊ शकतो. परंतु, मूळ झाडाची इच्छित वैशिष्ट्ये राखली जावीत याची खात्री करण्यासाठी ग्राफ्टिंग किंवा बडिंग तंत्र वापरणे अधिक सामान्य आहे. योग्य वाढ आणि विकासासाठी झाडांमध्ये 10-15 मीटर अंतर ठेवावे.

🔆 फळ
चिकू फळ एक अत्यंत मौल्यवान उष्णकटिबंधीय स्वादिष्ट पदार्थ आहे. ते अंडाकृती किंवा गोलाकार आकाराचे असते. उग्र व तपकिरी त्वचा असते, जी पिकल्यावर मऊ आणि नितळ होते. फळाचे मांस मलईदार, गोड आणि सुगंधी असते. जे कारमेल किंवा ब्राऊन शुगरच्या चवीसारखे असते. त्यात लहान, काळे, चमकदार बिया असतात, जे अखाद्य असतात. चिकूच्या फळामध्ये जीवनसत्त्वे ए, सी आणि ई तसेच पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोह यासारख्या खनिजांसह भरपूर पोषक असतात. हे बऱ्याचदा ताजे वापरले जाते. परंतु ते मिष्टान्न, आइस्क्रीम, मिल्कशेक आणि प्रिझर्व्हज यासारख्या विविध पाककृतींमध्ये देखील वापरले जाऊ शकते.

🔆 पर्यावरणीय महत्त्व
पर्यावरणात या झाडाला खूप महत्त्व आहे. या झाडाच्या मुळ्या जमिनीत खोलवर जातात. त्यामुळे हे झाडं कधीही जळत नाही तसेच अनंत काळापर्यंत जिवंत राहू शकतात. या झाडाला प्रचंड फुलोरा येत असल्यामुळे याच्या भोवती मधमाश्या व इतर कीटक मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे निसर्गात परागीभवन करण्याचे महत्त्वाचे कार्य चिकू करतो. परिणामी, शेतीतील पिकांचे उत्पादन वाढते. चिकू हवा शुद्ध करण्याचे कार्य करतो. भरपूर प्रमाणात ऑक्सिजन देण्याचे कामही चिकू करतो. या झाडाची पाने व फुले मोठा प्रमाणात गळून जमिनीवर पडतात. त्यापासून शेतीला उपयोगी खत बनते. जमिनीतील पाण्याचा साठाही वाढविण्यास हे झाड मदत करते. अनेक पक्षी, प्राणी यांना आश्रय व अन्नही देते.

🔆 आयुर्वेदिक उपयोग
चिकू खाल्ल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. त्याच्या सेवनाने अशक्तपणा दूर होतो आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. चिकूची झाडाची साल आणि पानांचा उपयोग अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो. चिकूमध्ये भरपूर पोषक घटक असतात. चिकूमध्ये व्हिटॅमिन बी, सी, ई आणि पोटॅशियम, मॅंगनीज, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म चांगल्या प्रमाणात आढळतात. चिकूची पाने, मूळ आणि साल यांचा अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये वापर केला जातो. चिकू खाल्ल्याने कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा धोकाही कमी होतो. ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांच्यासाठीही चिकू हे एक चांगले फळ आहे. चिकू पोटासाठीही खूप फायदेशीर आहे. यामुळे चिकू हे फळ नेहमी आपल्या आहारात असणे आवश्यक आहे.

🔆 आर्थिक महत्त्व
शेतकऱ्यांसाठी चिकू हे झाड आर्थिक क्रांती करणारे झाड आहे. या झाडाला वर्षभर फळे येतात. त्यामुळे वर्षभर चिकू उत्पादन देत राहते. याला साधारण वर्षातून तीन बहार येतात. या झाडाला फळे अमाप असतात. रोगराई खूप कमी, कमी खते यामुळे खूप कमी खर्चात याचे उत्पादन घेता येते. हे फळ औषधी गुणधर्म असलेले आहे. यामुळे मानवी आरोग्य सुधारण्यास मदत करते. यांचे लाकूड मजबूत, टणक व टिकाऊ असते. त्यामुळे या लाकडाला खूप मागणी आहे. या झाडाला खूप दाट पाने असतात. वर्षभरात याची भरपूर पाने गळून जातात. त्यापासून खत बनते. हे खत शेतीसाठी अतीशय उपयुक्त असते. त्यामुळे चिकू हे झाड शेतकऱ्यांसाठी अतीशय फायद्याचे आहे.

🔆 चिकू संवर्धन
चिकू हे झाड निसर्गाचे एक वरदान आहे. निसर्गाचा समतोल तसेच सजीवांना आधार देणारा हा वृक्ष आहे. परंतु, आज हे झाड वेगाने कमी होत आहे. हे झाड जागा जास्त व्यापते, यामुळे शेतकरी या झाडाची तोड करत आहेत. आजच्या काळात या झाडाची लागवड मोठ्या प्रमाणात करणे गरजेचे आहे. नागर फाउंडेशनने रवळगावमध्ये या झाडाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे तसेच अनेक लोकांना विवाह किव्वा इतर कार्यक्रमामध्ये चिकू झाडे भेट दिलेली आहेत. सर्वांना आवाहन आहे की चिकूचे एक झाड प्रत्येकाने लावावे, अशी नम्र विनंती!.

🌳 झाडे लावा…. झाडे जगवा….!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!