Cloudy weather & Cold : ढगाळ वातावरणामुळे थंडी काहीसी कमी
1 min read
संपूर्ण महाराष्ट्रात सध्याचे पहाटेचे किमान तापमान (Temperature) हे 16 डिग्री सेंटिग्रेड आणि दुपारचे कमाल तापमान 30 डिग्री सेंटिग्रेड दरम्यान राहणार असून, 1 ते 7 जानेवारी 2024 या काळातील तापमानाची पातळी अशीच कायम राहू शकते. ही दोन्हीही तापमाने दरवर्षी या काळात नेहमीसारखी जशी असतात तशीच सरासरी तापमानाच्या पातळीत असून, त्यात विशेष चढ -उतार सध्या तरी जाणवणार नाही.
एकापाठोपाठ आदळणाऱ्या पश्चिमी झंजावातातून गेल्या पंधरवाड्यपासून संपूर्ण उत्तर भारतात चालू असलेला धुक्याचा कहर तिथे अजूनही कायम आहे. महाराष्ट्रावर त्या वातावरणाचा विशेष असा काहीही परिणाम जाणवणार नाही. हे ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने जमेचीच बाजू समजावी, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.