Varieties of Sorghum : कोरडवाहू आणि बागायती क्षेत्रासाठी रब्बी ज्वारीचे वाण
1 min readमहात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ज्वारी वाणांनी उत्पादनाची क्रांती केली आहे. ज्वारी सुधार प्रकल्पाने सन 2023 पर्यंत ज्वारीचे विविध 25 वाण शेतकऱ्यांसाठी प्रसारित केले आहे. राज्यात एकूण 40 टक्के क्षेत्रावर राहुरीच्या विकसित वाणांची लागवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सन 2020-21 मध्ये 16.6 लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी ज्वारीची लागवड झाली होती. त्यामध्ये 23 टक्के क्षेत्र हे हलक्या जमिनीचे, 48 टक्के मध्यम तर 29 टक्के क्षेत्र हे भारी जमिनीचे आहे. यामधून मागील वर्षी राज्याला 17.4 लाख टन ज्वारीचे उत्पादन मिळाले. राज्यातील एकूण ज्वारीच्या क्षेत्रापैकी 40 टक्के क्षेत्र महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विकसित वाणाखाली आहे. यामध्ये फुले रेवती खालील क्षेत्र 15 टक्के, फुले वसुधा खालील क्षेत्र 10 टक्के, फुले सुचित्रा 10 टक्के, फुले अनुराधा 5 टक्के, मालदांडी व इतर स्थानिक वाणाखाली 60 टक्के क्षेत्र आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाने जरी ज्वारीची लागवड ही 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या दरम्यान करण्याची शिफारस केलेली असली तरी राज्यातील काही भागात गोकुळ अष्टमीपासून पेरणीला सुरुवात होते. काही शेतकरी 15 सप्टेंबरनंतर पेरणीला सुरुवात करतात. तर काही शेतकरी हस्ताचा पाऊस पडून गेल्यानंतर पेरणी करतात. विविध भागातील पाऊस परिस्थिती, जमिनीतील उपलब्ध ओलाव्यानुसार पेरणीचे नियोजन करणे आवश्यक आहे. तत्पूर्वी ज्वारीच्या वाणांची निवड ही अत्यंत महत्त्वाची. त्याकरिता प्रस्तुत लेखात कोरडवाहू व बागायती क्षेत्रासाठी ज्वारीचे वाण व त्यांची वैशिष्टे या बाबत माहिती दिली आहे.
❇️ फुले यशोमती (प्रसारण वर्ष : 2022)
🔆 पश्चिम महाराष्ट्रातील हलक्या जमिनीकरीता कोरडवाहू खालील फुले अनुराधा ऐवजी प्रसारित
🔆 धान्य उत्पादन – 9.2 क्विंटल प्रति हेक्टर.
🔆 चारा उत्पादन – 42.6 क्विंटल प्रति हेक्टर.
🔆 शुभ्र पांढऱ्या आकाराचे गोलाकार दाणे.
🔆 पक्वता कालावधी – 112 ते 115 दिवस
🔆 पश्चिम महाराष्ट्रातील जिरायत क्षेत्रातील उथळ जमिनीसाठी शिफारस
❇️ फुले अनुराधा
🔆 कोरडवाहू क्षेत्रासाठी, हलक्या जमिनीसाठी लागवडीस योग्य.
🔆 पक्व होण्याचा कालावधी 105 ते 110 दिवस.
🔆 अवर्षणास प्रतिकारक्षम.
🔆 भाकरी उत्कृष्ट, चवदार.
🔆 कडबा अधिक पौष्टीक व पाचक.
🔆 खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम.
🔆 कोरडवाहू धान्य उत्पादन सरासरी प्रती हेक्टरी 8 ते 10 क्विंटल व कडबा 30 ते 35 क्विंटल प्रति हेक्टर.
❇️ फुले माऊली
🔆 हलक्या व मध्यम जमिनीसाठी लागवडीस योग्य.
🔆 पक्व होण्याचा कालावधी 110 ते 115 दिवस.
🔆 भाकरीची चव उत्तम.
🔆 कडबा पौष्टीक व चवदार.
🔆 धान्याचे उत्पादन हलक्या जमिनीत हेक्टरी 7 ते 8 क्विंटल प्रति हेक्टर व कडबा 20 ते 30 क्विंटल प्रति हेक्टर.
🔆 धान्याचे उत्पादन मध्यम जमिनीत 15 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर व कडबा 40 ते 50 क्विंटल प्रति हेक्टर.
❇️ फुले सुचित्रा
🔆 मध्यम जमिनीसाठी शिफारस.
🔆 पक्व होण्याचा कालावधी 110 ते 115 दिवस.
🔆 उत्कृष्ट धान्य व कडबा प्रत.
🔆 धान्य उत्पादन 24 ते 28 क्विंटल प्रति हेक्टर व कडबा 60 ते 65 क्विंटल प्रति हेक्टर.
❇️ फुले वसुधा
🔆 भारी जमिनिकारिता कोरडवाहू व बागायती जमिनीसाठी शिफारस.
🔆 पक्व होण्याचा कालावधी 116 ते 120 दिवस.
🔆 दाणे मोत्यासारखे, पांढरेशुभ्र चमकदार.
🔆 भाकरीची चव उत्तम.
🔆 ताटे भरीव, रसदार व गोड.
🔆 खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम.
🔆 कोरडवाहू धान्य उत्पादन सरासरी 24 ते 28 क्विंटल प्रति हेक्टर व कडबा 65 ते 70 क्विंटल प्रति हेक्टर.
🔆 बागायती धान्य उत्पादन सरासरी 30 ते 35 क्विंटल प्रति हेक्टर व कडबा 70 ते 75 क्विंटल प्रति हेक्टर.
❇️ फुले यशोदा
🔆 भारी जमिनीत लागवडीसाठी प्रसारित.
🔆 पक्व होण्याचा कालावधी 120 ते 125 दिवस.
🔆 दाणे मोत्यासारखे, पांढरेशुभ्र चमकदार, भाकरीची चव चांगली.
🔆 कोरडवाहू धान्य उत्पादन सरासरी 25 ते 28 क्विंटल प्रति हेक्टर व कडबा 60 ते 65 क्विंटल प्रति हेक्टर.
🔆 बागायती धान्य उत्पादन सरासरी 30 ते 35 क्विंटल प्रति हेक्टर व कडबा 70 ते 80 क्विंटल प्रति हेक्टर.
❇️ फुले पूर्वा (आरएसव्ही-2371) (प्रसारण वर्ष 2023)
🔆 पाण्याचा ताण सहन करणारे.
🔆 महाराष्ट्रातील जिरायत भागातील खोल काळ्या जमिनीसाठी शिफारस.
🔆 कालावधी 118 ते 120 दिवस.
🔆 पांढरे शुभ्र टपोरे व गोलाकार दाणे.
🔆 न लोळणारा, काढणीस सुलभ.
🔆 धान्य उत्पादन – 23.7 क्विंटल प्रति हेक्टर व कडबा 70 ते 80 क्विंटल प्रति हेक्टर.
❇️ सीएसव्ही-22
🔆 भारी जमिनीकरिता कोरडवाहू व बागायती जमिनीसाठी शिफारस.
🔆 पक्व होण्याचा कालावधी 116 ते 120 दिवस.
🔆 दाणे मोत्यासारखे चमकदार, भाकरीची चव चांगली.
🔆 खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम.
🔆 कोरडवाहू धान्य उत्पादन सरासरी 24 ते 28 क्विंटल प्रति हेक्टर व कडबा 65 ते 70 क्विंटल प्रति हेक्टर.
🔆 बागायती धान्य उत्पादन सरासरी 30 ते 35 क्विंटल प्रति हेक्टर व कडबा 70 ते 80 क्विंटल प्रति हेक्टर.
❇️ परभणी मोती
🔆 बागायती धान्य उत्पादन सरासरी 30 ते 35 क्विंटल प्रति हेक्टर व कडबा 70 ते 80 क्विंटल प्रति हेक्टर.
🔆 भारी जमिनीकरिता कोरडवाहू व बागायती जमिनीसाठी शिफारस.
🔆 पक्व होण्याचा कालावधी 125 ते 130 दिवस.
🔆 दाणे मोत्यासारखे, पांढरेशुभ्र चमकदार.
🔆 खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम.
🔆 कोरडवाहू धान्य उत्पादन सरासरी 17 क्विंटल प्रति हेक्टर व कडबा 50 ते 60 क्विंटल प्रति हेक्टर.
🔆 बागायती धान्य उत्पादन सरासरी 32 क्विंटल प्रति हेक्टर व कडबा 60 ते 70 क्विंटल प्रति हेक्टर.
❇️ फुले रेवती
🔆 भारी जमिनीत बागायतीसाठी शिफारस.
🔆 पक्व होण्याचा कालावधी 118 ते 120 दिवस.
🔆 दाणे मोत्यासारखे, पांढरे चमकदार.
🔆 भाकरीची चव उत्कृष्ट.
🔆 कडबा पौष्टीक व अधिक पाचक.
🔆 धान्य उत्पादन सरासरी 40 ते 45 क्विंटल प्रति हेक्टर व कडबा 90 ते 100 क्विंटल प्रति हेक्टर.
❇️ मालदांडी 35-1
🔆 मध्यम खोल जमिनीत कोरडवाहूसाठी शिफारस.
🔆 पक्व होण्याचा कालावधी 118 ते 120 दिवस.
🔆 दाणे चमकदार, पांढरे.
🔆 भाकरीची चव चांगली.
🔆 खोडमाशी प्रतिकारक्षम.
🔆 धान्य उत्पादन सरासरी 15 ते 18 क्विंटल प्रति हेक्टर व कडबा 60 क्विंटल प्रति हेक्टर.
❇️ फुले उत्तरा
🔆 हुरड्यासाठी शिफारस.
🔆 हुरड्याची अवस्था येण्यास 90 ते 100 दिवस.
🔆 भोंडातून दाणे सहज बाहेर पडतात.
🔆 सरासरी 70 ते 90 ग्राम इतका हुरडा मिळतो.
🔆 हुरडा चवीस सरस अत्यंत गोड, शिवाय ताटेही गोड असल्याने जनावरे कडबा चवीने खातात.
❇️ फुले मधुर
🔆 हुरड्यासाठी शिफारस.
🔆 हुरड्याची अवस्था येण्यास 93 ते 98 दिवस लागतात.
🔆 वाण उंच असून, पालेदार आहे.
🔆 हुरडा अवस्थेत दाणे सहज सुटण्याचे प्रमाण 95 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
🔆 उत्कृष्ट प्रतीचा व चवदार हुरडा मिळतो.
🔆 या वाणा पासून 30 त 35 क्विंटल प्रति हेक्टर हुरड्याचे उत्पादन मिळते.
🔆 सदर वाणाची शिफारस ही फुले उत्तर ह्या वाणा ऐवजी प्रसारित केली आहे.
❇️ फुले पंचमी
🔆 लाह्याचे प्रमाण (वजनानुसार) 87.4 टक्के.
🔆 लाह्या मोठ्या प्रमाणात फुटून रंगाने पांढऱ्या शुभ्र होतात.
🔆 खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम.
🔆 महाराष्ट्रातील कोरडवाहू क्षेत्रासाठी लाह्यांसाठी प्रसारित
✴️ कोरडवाहू रब्बीची पेरणी 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत जमिनीत पुरेशी ओल असल्यास करावी. शक्यतो हस्ताचा पाऊस पडून गेल्यावर पेरणी करणे हिताचे आहे. योग्य वेळी पेरणी न झाल्यास खोडमाशीचा प्रादूर्भाव अधिक होतो. पेरणीपूर्वी बियाण्यास गंधकाची प्रक्रिया करावी. त्यासाठी 1 किलो बियाण्यास 300 मेष गंधकाची 4 ग्राम याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. त्यामुळे कानी हा रोग येत नाही.
✴️ गंधकाची प्रक्रिया केल्यानंतर 10 किलो बियाण्यास प्रत्येकी 250 ग्राम अॅझोटोबॅक्टर व पीएसबी या जीवाण संवर्धनाची प्रक्रिया करावी. पेरणीसाठी प्रति हेक्टरी 10 किलो बियाणे वापरावे.
✴️ ज्वारीची पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने ४५ x१५ से.मी अंतरावर एकाच वेळी खते व बियाणे स्वतंत्र दोन चाड्यातून पेरावे. बागायत ज्वारीचे अपेक्षित उत्पादन मिळविण्यासाठी ज्वारीची पेरणी ४५ x१२ से.मी. अंतरावर करावी.
✴️ कोरडवाहू ज्वारीसाठी दोन रोपातील अंतर २० से.मी. ठेवावे. पेरणीच्या वेळी संपूर्ण नत्र, स्फुरद व पालाश द्यावे.