Monsoon rain forecast: महाराष्ट्रात उष्णता, वळवाचा पाऊस अन् गारांची शक्यता
1 min read✴️ नैऋत्य मान्सूनने अरबी समुद्रात प्रवेश केला असला तरी अजून केरळात म्हणजे देशाच्या भू-भागावर मान्सूनचा अजून प्रवेश झाला नाही. परंतु, पुढील वाटचालीस वातावरण अनुकूल जाणवते. मान्सून जरी आज (रविवार, दि. 4 जून), उद्या (साेमवार, दि. 5 जून) केरळात पोहोचला तरी महाराष्ट्रात कोकण वगळता सह्याद्री ओलांडून उर्वरित महाराष्ट्रात केवळ मान्सूनचा पाऊस पोहोचण्यास कदाचित अजून आठवडाभर किंवा अधिक कालावधी म्हणजे 14 जूनपर्यंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोकण व गोव्यात मात्र पुढील आठवडाभर किरकोळ वळवाच्या पावसाची शक्यता जाणवते.
✴️ अरबी समुद्रात बुधवार, दि. 7 जूनला कमी दाब क्षेत्र निर्मितीच्या शक्यता व त्याच्या पुढील विकसनावर मान्सूनचे वेगात आगमन किंवा आगमनानंतर कदाचित खंड अशा काही शक्यता नाकारता येत नाही.
✴️ धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी आजपासून पुढील तीन दिवस म्हणजे मंगळवार दि. 5 जूनपर्यंत विजा, वारा व गारांसह किरकोळ वळवाच्या पावसाची शक्यताही नाकारता येत नाही.
✴️ आजपासून पुढील 5 दिवस म्हणजे 4 ते 8 जूनपर्यंत संपूर्ण विदर्भ तसेच मराठवाड्यातील लातूर, नांदेड व परभणी जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थिती कदाचित जाणवू शकते.
✴️ पश्चिम हिमालयीन जम्म्ू काश्मिर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड ही राज्ये तसेच उत्तर भारतातील इतर उर्वरित राज्यात पुढील आठवडाभर ढगाळ वातावरणसह तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.