krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Rainfall unit : पाऊस मिलीमीटर, सेंटीमीटरमध्ये कसा मोजला जातो?

1 min read
Rainfall unit : मुळात मिलीमीटर,सेंटीमीटर किंवा इंच हे लांबी माेजण्याचे युनिट (unit) आहेत. पाऊस (Rainfall) देखील याच युनिटमध्ये माेजला जाताे. त्यासाठी कुठलेही Calculation (गणना) केले जात नाही. त्यामागचे कारण असे की, पावसाच्या (Rain water) थेंबाला (Drops) ठराविक आकार किंवा वजन नसते.

🌧️ पर्जन्यमापन
पर्जन्यमापनासाठी वापरणाऱ्या उपकरणाला Rainmeter (रेनमीटर) किंवा हाइड्रोमीटर, यूडोमीटर, प्लवीओमीटर या ओमब्रोमीटर म्हटला जातो. पावसाचे मोजमाप करण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणे खालीलप्रमाणे असतात.
💦 एक काचेची नळी किंवा कंटेनर ज्याला ‘Collecting Bottle’ म्हटले जातो. ह्या नळीला बाहेरून धातूचा मुलामा चढवलेला असतो. या नळीमध्ये पावसाचे जमा झालेले पाणी एकत्रित केला जातो.
💦 काचेच्या नळीवर एक नरसाळा लावलेला असतो. ज्यामुळे पाणी इकडे-तिकडे जात नाही.
💦 या नळीला हलू नये म्हणून सिमेंटच्या आधाराने पावसात उघड्यावर ठेवला जातो. नळीला कुठल्याही झाडाखाली किंवा शेडखाली खाली ठेवले जात नाही. कारण त्याने पावसाचे पाणी पूर्ण क्षमतेने गोळा होत नाही.
💦 रोज ठराविक वेळेनंतर नळीमध्ये जमा झालेले पावसाचे पाणी एका काचेच्या पात्रात (Beaker) जमा केले जाते. काचेच्या पात्राला मोजमापन करण्यासाठी मिलीमीटर, सेंटीमीटर किंवा इंच मध्ये खुणा असतात (जसे पट्टीवर असतात तसे) आणि त्याद्वारे जमा झालेल्या पाण्याची उंची मोजली जाते.
💦 आलेली उंची ही त्या ठिकाणाची त्या वेळेत झालेल्या पावसाची मापन असते.
💦 यात वापरण्यात येणाऱ्या उपकरणांची मापे (लांबी आणि रुंदी) जगात सगळ्या ठिकाणी सारखीच ठेवली जाते. म्हणजेच नळीची लांबी 203 मिलीमीटर आणि नरसाळ्याचा व्यास 5 इंच ठेवला जाते.
💦 आजकाल नळी आणि नरसाळा वेगळे वेगळे नसतात. ते एकत्रितपणे नळीवरच मोजमापीसाठी खुणा केलेल्या असतात.
💦 भारतात हवामान विभागाद्वारे पावसाची दिवसातून 2 वेळा (सकाळी 8 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता) मोजमापन केले जाते.
💦 आलेल्या निरीक्षणांची नोंद वर्षानुवर्षे केली आणि ठेवली जाते. त्याचा उपयोग त्या भागाचा सरासरी पर्जन्यवृष्टी किती झाली किंवा अंदाज किती होईल याचे भाकीत केले जाते.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!