Green manure : जागच्या जागी वाढविलेले हिरवळीचे खत
1 min read🟢 ताग
तागाचे बियाणे हेक्टरी 40 ते 50 किलो लागते. हे शेतात पावसाळी हंगामाअगोदर पेरावे. साधारणपणे 40 ते 55 दिवसात (पीक फुलोऱ्यात असताना) 100 ते 120 सें. मी. पिकांची वाढ झाल्यावर ते जमिनीत गाडतात. त्यामुळे जमिनीत 40 ते 80 किलो नत्र वाढते. या खताचा भात पिकासाठी वापर केल्यास लुंपादनात 60 ते 80 टक्के वाढ होतें.
🟢 ढेंचा
ढेंचा हे एक हिरवळीचे उत्तम पीक आहे. हे पीक क्षारपड जमिनीमध्ये आणि भात पिकामध्ये घेता येते. त्यामध्ये नत्राचे प्रमाण 0.42 टक्के आहे. हे पीक जमिनीत गाड़ल्यानंतर पिकास हेक्टरी 60 ते 90 किलो नत्र मिळतो. त्यासाठी 20 ते 40 केिलो बियाणे प्रतेि हेक्टरी पेरणी करून पिकाची वाढ 3 ते 4 फुट उंची झाल्यावर 40 ते 55 दिवसात जमिनीमध्ये गाडावे. ढेंचाचे हिरवळीचे खत वापरल्यामुळे भात (धान) उत्पादनात 20 टक्के वाढ दिसून आली आहे.
🟢 हिरवळीची पिके जमिनीत गाडताना घ्यावयाची काळजी
हिरवळीच्या पिकांना स्फुरदयुक्त खते द्यावीत. त्यामुळे हिरवळीच्या पेिकांचे उत्पादन वाढते. पीक फुलोऱ्यात असताना त्याची कापणी करून ट्रॅक्टरच्या साहाय्याने मशागत करून जमिनीत गाडावेत. ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे व पावसाचे प्रमाण जास्त अशा ठिकाणी हिरवळीच्या पिकांचा वापर करावा. त्यामुळे लवकरात लवकर कुजण्यास मदत होईल. ऊस पिकामध्ये आंतरपीक म्हणून ताग किंवा ढेंचा यांचा वापर केल्यास ऊस उत्पादन वाढविण्यास मदत होते.