भेंडवळ भाकीत : यंदा समाधानकारक पाऊस, मात्र अवकाळी पावसाचा फटका
1 min read✴️ पार्श्वभूमी
मागील 350 वर्षांपासून या घट मांडणीच्या आधारावर वर्षभराचं राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि हवामानाचं भविष्य वर्तवले जाते. शेती व पाऊसविषयक अभ्यास गुढीपाडवा ते अक्षय तृतीया या काळात केला जातो. त्यानंतर घट मांडणीत वर्षभराची भाकिते वर्तविले जाते. 350 वर्षांपूर्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी ही घट मांडणी सुरू केली होती. त्यांच्या वंशजांनी ही परंपरा कायम ठेवली आहे.
✴️ भेंडवळची घट मांडणी
भेंडवळची घट मांडणी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सायंकाळी केली जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी गावाबाहेरील शेतात घटाची आखणी करून, त्यात घागर, मातीचे ढेकळे, पापड, पुरी, सांडोळी, कुरडी, पान आणि त्यावर सुपारी, गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, बाजरी, तांदूळ, अंबाडी, वाटाणा, सरकी, मसूर, करडी असे एकूण 18 प्रकारच्या धान्याची प्रतिकात्मक मांडणी केली जाते. पृथ्वीच्या प्रतिकात्मक स्वरुपातील पुरी, समुद्राचे प्रतीक म्हणून घागर आणि त्यावर पापड, वडा, पावसाळ्याचे प्रतीक म्हणून मातीचे ढेकळे, वडा, पान सुपारी यांचीही मांडणी केली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी घट मांडणीमधील बदलांचे निरीक्षण करून भाकीत वर्तविले जाते.
✴️ पावसाबाबतचे भाकीत
🌐 यंदा देशात वरुणराजाची कृपा असणार आहे.
🌐 जूनमध्ये चांगला तर जुलैमध्ये साधारण स्वरूपाचा पाऊस कोसळेल.
🌐 ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस बरसणार आहे.
🌐 शेतकऱ्यांना अवकाळी पावसाची चिंता वर्षभर सतावणार आहे.
✴️ पिकांबाबतचे भाकीत
🌐 कापूस, उडीद, ज्वारी, हरभरा ही पिकं चांगली येतील. या पिकांना भावही चांगला मिळेल.
🌐 वाटाणा, बाजरी, गहू, करडई या पिकांचे उत्पादन मध्यम स्वरूपाचे असेल.
🌐 एकंदरीत देशात पीक परिस्थिती चांगली असेल.
🌐 काही महत्त्वाच्या पिकांना समाधानकारक भाव मिळणार नाही.
🌐 लवकर येणाऱ्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
✴️ रोगराईबाबतचे भाकीत
🌐 यावर्षी देशात रोगराई राहणार नाही.
🌐 कोरोनासारख्या महामारीतून वर्षभरात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
✴️ राजकीय भाकीत
🌐 देशाच्या राजाची गादी कायम राहणार असून, सत्तापालट होणार नाही.
✴️ देशावरील संकटाबाबत भाकीत
🌐 देशाच्या सरंक्षण खात्यावर जास्त दबाव राहणार नाही.
🌐 देशाचे संरक्षण चांगले राहील.
🌐 देश आर्थिक अडचणीत असेल.
✴️ मूळ भाकीत
❇️ अंबाडी :- कुलदैवत कायम
❇️ कापूस :- साधारण चांगले
❇️ ज्वारी :- आत बाहेर चांगले
❇️ तूर :- 6 बोट आत बाजर चांगली
❇️ मूग :- मोघम
❇️ हळद :- 1 बोट आत साधारण
❇️ तीळ :- चौरस 2 बोटे
❇️ भादली :- रोगराई कमी
❇️ बाजरी :- मोघम
❇️ मटकी :- 1 बोट आत व बाहेर
❇️ साळी :- आत जास्त बाहेर कमी
❇️ जवस :- मोघम
❇️ लाख :- मोघम
❇️ वाटाणा :- मोघम
❇️ गहू :- मोघम
❇️ हरभरा :- साधारण चांगला
❇️ करडी :- ठीक
❇️ मसूर :- परतीचा त्रास
✴️ पावसाळा
❇️ जून :- साधारण
❇️ जुलै :- साधारण
❇️ ऑगस्ट :- चांगला
❇️ सप्टेंबर :- भरपूर
❇️ अवकाळी पाऊस
❇️ पुरी :- गायब
❇️ वडाभाषा :- चाराटंचाई
❇️ पापड :- आहे
❇️ राजा :- कायम
(टीप : ‘भेंडवळची घट मांडणी’ ही भेंडवळ, जिल्हा बुलडाणा या गावातील स्थानिक परंपरा आहे. त्यातून पावसाचा अंदाज वर्तविण्यात येत असल्याचा त्यांचा दावा आहे. यावर काहींचा विश्वास असला तरी कृषिसाधना या परंपरेचे समर्थन करीत नाही.)
उपयुक्त माहिती