krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

महाराष्ट्रात 3 ते 31 मेपर्यंत शून्य सावली

1 min read
खरं तर, 'शून्य सावली' दिवस हा शब्दच कुतूहल निर्माण करणारा आहे. वर्षभर सोबत राहणारी आपली सावली या दिवशी काही मिनिटांसाठी आपल्याला सोडून जाते. महाराष्ट्रात 3 ते 31 मे या काळात आपल्याला 'शून्य सावली दिवस' अनुभवता येणार आहेत.

💥 काय आहे ‘शून्य सावली’
सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या 23.50 अक्षांश दक्षिण आणि उत्तरेकडे असतो. म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त यादरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षांतून दोनदा दुपारी डोक्यावर येतो आणि दोनदा शून्य सावली दिवस येतात. सूर्य आणि पृथ्वी यातील कोनीय व्यास आणि अंशात्मक अंतर जिथे जुळते, तिथे शून्य सावली दिवस घडतो. उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा तसेच सूर्य दररोज 0.50 अंश सरकतो म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर दोन दिवस राहतो. त्यामुळे एकाच ठिकाणावरून दोन दिवस शून्य सावली अनुभवता येते. महाराष्ट्रात 3 ते 31 मे या काळात शून्य सावली दिवस आहेत.

💥 शून्य सावलीची वेळ
कोल्हापूर जिल्ह्यातील सावंतवाडी येथे 3 मे रोजी तर धुळे जिल्ह्यात 31 मे रोजी शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 15.6 अक्षांश ते धुळे जिल्ह्यात 21.98 अक्षांश या दरम्यान शून्य सावली दिवस पाहता येणार आहे. एका अक्षांशवर येणाऱ्या सर्व परिसरात त्याच दिवशी शून्य सावली दिवस येतात. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तावर वेगळे दिवस आणि वेळा आहेत, त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक आहे. त्यामुळे आपण दुपारी 12 ते 12.35 वाजताच्या दरम्यान सूर्य निरीक्षण करावे. समूहासाठी उपक्रम करायचा असेल तर मोकळ्या मोकळय़ा आणि कौटुंबिक निरीक्षण करायचे असेल तर घराच्या छतावर किंवा अंगणात केले तरी चालेल, असे ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले आहे.

💥 शून्य सावलीचे दिवस व स्थळ
🌞 6 मे :- कोल्हापूर, इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर).
🌞 7 मे :- रत्नागिरी, सांगली, मिरज (जिल्हा सांगली).
🌞 8 मे :- कऱ्हाड (जिल्हा सातारा), जयगड (जिल्हा रायगड), अफजलपूर.
🌞 9 मे :- चिपळूण (जिल्हा रत्नागिरी), अक्कलकोट (जिल्हा सोलापूर).
🌞 10 मे :- सातारा, पंढरपूर ( जिल्हा सोलापूर), सोलापूर.
🌞 11 मे :- महाबळेश्वर (जिल्हा सातारा), फलटण (जिल्हा सातारा), तुळजापूर (जिल्हा उस्मानाबाद), वाई ( जिल्हा सातारा).
🌞 12 मे :- बारामती (जिल्हा पुणे), बार्शी (जिल्हा सोलापूर), उस्मानाबाद.
🌞 13 मे :- पुणे, मुळशी (जिल्हा पुणे), दौड (जिल्हा पुणे), लातूर, लवासा (पुणे), असरल्ली (जिल्हा गडचिरोली)
🌞 14 मे :- लोणावळा (जिल्हा पुणे), अलिबाग (जिल्हा रायगड), दाभाडे (जिल्हा पुणे), पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे), देहू (जिल्हा पुणे), जामखेड (जिल्हा अहमदनगर), आंबेजोगाई (जिल्हा बीड).
🌞 15 मे :- मुंबई, नवी मुंबई, कर्जत (जिल्हा रायगड), बीड, माथेरान (जिल्हा रायगड), राळेगणसिद्धी (जिल्हा अहमदनगर), सिरोंचा (जिल्हा गडचिरोली).
🌞 16 मे :- बोरीवली (मुंबई), ठाणे, डोंबिवली (जिल्हा ठाणे), कल्याण (जिल्हा ठाणे), भिवंडी (जिल्हा ठाणे), बदलापूर (जिल्हा ठाणे), नारायणगाव (जिल्हा पुणे), खोडद (जिल्हा पुणे), अहमदनगर, परभणी, नांदेड,
🌞 17 मे :- नालासोपारा (जिल्हा पालघर), विरार (जिल्हा पालघर), आसनगाव (जिल्हा पालघर), अहेरी (जिल्हा गडचिरोली), आल्लापल्ली (जिल्हा गडचिरोली).
🌞 18 मे :- पालघर, कसारा (जिल्हा ठाणे), संगमनेर (जिल्हा अहमदनगर), अंबड (जिल्हा जालना), हिंगोली, मूलचेरा (जिल्हा गडचिरोली).
🌞 19 मे :- औरंगाबाद, डहाणू (जिल्हा पालघर), नाशिक, कोपरगाव (जिल्हा अहमदनगर), वैजापूर (जिल्हा औरंगाबाद), जालना, पुसद (जिल्हा यवतमाळ), बल्लारशा (जिल्हा चंद्रपूर), चामोर्शी (जिल्हा गडचिरोली).
🌞 20 मे :- चंद्रपूर, मेहकर (जिल्हा बुलडाणा), वाशीम, वणी (जिल्हा यवतमाळ), मूल (जिल्हा चंद्रपूर).
🌞 21 मे :- मनमाड (जिल्हा नाशिक), चिखली (जिल्हा बुलडाणा), गडचिरोली, सिंदेवाही (जिल्हा चंद्रपूर), रोहना.
🌞 22 मे :- मालेगाव (जिल्हा नाशिक), चाळीसगाव (जिल्हा जळगाव), बुलडाणा, खोपोली (जिल्हा कोल्हापूर), यवतमाळ, आरमोरी( जिल्हा गडचिरोली).
🌞 23 मे :- खामगाव (जिल्हा बुलडाणा), अकोला, देसाईगंज (जिल्हा गडचिरोली)’ ब्रह्मपुरी (जिल्हा चंद्रपूर), नागभीड (जिल्हा चंद्रपूर).
🌞 24 मे :- धुळे, जामनेर (जिल्हा जळगाव), शेगाव (जिल्हा बुलडाणा), वर्धा, उमरेड (जिल्हा नागपूर), दर्यापूर (जिल्हा अमरावती).
🌞 25 मे :- जळगाव, भुसावळ (जिल्हा जळगाव), अमरावती, अमळनेर (जिल्हा जळगाव), तेल्हारा (जिल्हा अकोला).
🌞 26 मे :- नागपूर, भंडारा, परतवाडा (जिल्हा अमरावती), चोपडा (जिल्हा जळगाव).
🌞 27 मे :- नंदुरबार, शिरपुर (जिल्हा धुळे), बुऱ्हाणपूर (मध्य प्रदेश), चिखलदरा (जिल्हा अमरावती), तुमसर (जिल्हा भंडारा), गोंदिया, सावनेर (जिल्हा नागपूर), काटोल (जिल्हा नागपूर), रामटेक (जिल्हा नागपूर).
🌞 28 मे :- अक्कलकुआ (जिल्हा नंदुरबार), शहादा (जिल्हा नंदुरबार), पांढुर्णा (जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश), वरुड (जिल्हा अमरावती), नरखेड (जिल्हा नागपूर).
🌞 29 मे :- बोराड, नर्मदानगर (जिल्हा नंदुरबार).
🌞 30 मे :- धाडगाव (जिल्हा नंदुरबार).
🌞 31 मे :- तोरणमाळ (जिल्हा नंदुरबार).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!