krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Rain forecast : महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता

1 min read

Rain forecast : आज (गुरुवार, दि. 2 जुलै)पासून पुढील आठवडाभर म्हणजे बुधवार (दि 8 जुलै)पर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकण व विदर्भ तसेच खान्देश, नाशिक, पुणे, अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यांत मध्यम (Moderate) ते मुसळधार (heavy) पावसाची (Rain) शक्यता (forecast) जाणवते. विशेषतः कोकणातील पालघर, ठाणे, मुंबईसह रायगड, रत्नागिरी तसेच नाशिक, पुणे, सातारा या 3 जिल्ह्यातील घाट क्षेत्र व विदर्भातील अकोला, अमरावती, गोंदिया, नागपूर, भंडारा, वर्धा, बुलढाणा व चंद्रपूर जिल्ह्यात बुधवार (दि 8 जुलै)पर्यंतच्या आठवड्यात 2 ते 3 (3 व 4 जुलै) पावसाळी दिवसात अति- मुसळधार पावसाची शक्यता जाणवते. सध्याचा पडणारा पाऊस हा मान्सूनच्या (Monsoon) 22 जूनला सुरू झालेल्या पहिल्या आवर्तनातील पाऊस समजावा.

📍 मुंबईतील पूर-पाण्याचा निचरा
मुंबई शहर व सबर्बन मुंबई, पालघर, ठाणे, रायगड व रत्नागिरी या 6 जिल्ह्यात 3 ते 6 जुलै दरम्यानच्या अतिजोरदार पावसामुळे पूर-पाण्याच्या वेगात निचऱ्याअभावी जनजीवन काहीसे विस्कळीतही होऊ शकते.

📍 पालखी प्रस्थान दरम्यानचा पाऊस
मंगळवार (दि. 7 जुलै) व बुधवार (दि. 8 जुलै) पालखी प्रस्थान दरम्यान पावसाची शक्यता जाणवते. मात्र, पालखीच्या पुणे मुक्कामादरम्यान पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

📍 जुलैच्या दुसऱ्या आठवड्यातील पाऊस
सध्या तरी गुरुवार (दि. 9 जुलै)पासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता जाणवते. त्यामुळे 9 ते 15 जुलै दरम्यान विदर्भातील अपेक्षित जोरदार पावसाची शक्यताही मावळलेली दिसते.

📍 एकूणच जुलै महिन्यातील पाऊस
विदर्भ वगळता उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता जाणवते. त्यामुळे जूनमधील राहिलेली पावसाच्या तुटीसह जुलै महिन्यातही तूट असू शकते, असे वाटते. पेरणीबाबतचा खुलासा 10 जुलै दरम्यान करता येईल.

📍 आठवड्यातील पाऊस कशामुळे?
🔆 देशात समुद्रसपाटी पातळीतील हवेच्या कमी दाबाचा हंगामी आस सरासरी जागेवर आहे.
🔆 अरबी समुद्रात महाराष्ट्र कोकण किनारपट्टी दरम्यान द्रोणीय आस निर्माण झाला आहे.
🔆 बंगालच्या उपसागरातील मध्य तपाबंरातील हवेचे कमी दाब क्षेत्र तयार झाले आहे.
या तीन कारणांमुळे या आठवड्यात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!