krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Monsoon Arrival Possibility : मान्सून काेकणात सक्रीय, मुंबईत आगमनाची शक्यता

1 min read

Monsoon Arrival Possibility : मुंबईसह संपूर्ण कोकणात मंगळवार (दि. 23 जून)पासून पावसासाठी (Rain) अनुकूल वातावरण निर्मितीची शक्यता निर्माण झाली आहे. या भागात सध्या पूर्वमोसमी (Pre-monsoon) पावसाची शक्यता (Possibility) जाणवत असून, वेंगुर्ला, देवगड, हर्णाई या मान्सून (Monsoon) पोहोचलेल्या ठिकाणी मान्सूनच्या सरींना चालना मिळू शकते.

🔆 मुंबईत मान्सूनचे आगमन कधी?
मागील 2019 व 2023 या एल-निनो च्या गत दोन वर्षात मुंबईत मान्सूनचे 25 जूनला म्हणजे त्याच्या सरासरी 11 जून या तारखेपासून तब्बल 14 दिवसांनी उशिरा आगमन (Arrival) झाले होते. यावर्षीही एल-निनोचे (El Nino) वर्ष आहे आणि अद्याप मुंबईत मान्सून पोहोचला नाही. 2026 च्या एल-निनो वर्षात सुद्धा मान्सूनचे गुरुवार (दि. 25 जून)ला मुंबईत आगमनाची शक्यता निर्माण झाली आहे.

🔆 जोरदार मान्सूनची हजेरी मुंबईसह कोकणात कधी?
गुरुवार (दि. 25 जून) ते बुधवार (दि. 1 जुलै) दरम्यानच्या जूनच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईसह संपूर्ण कोकणात जोरदार मान्सूनची शक्यताही कायम आहे. शनिवार (दि. २० जून) पासून वातावरण बदलास सुरुवात झाली असून, मुंबईकरांना दिवसाच्या दमटपणा व रात्रीच्या उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळू शकतो.

🔆 उर्वरित महाराष्ट्रात मान्सून कधी?
मुंबईतील मान्सूनच्या आगमनानंतर म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यात खानदेश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर व पश्चिम मराठवाड्यातील जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाची शक्यता जाणवते. पूर्व मराठवाडा व विदर्भात मात्र जुलै पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात मान्सूनच्या पावसाची शक्यता जाणवते. तत्पूर्वी तुरळक ठिकाणी किरकोळ पूर्वमोसमी पावसाची शक्यता जाणवते.

🔆 मुंबईतील पिण्याच्या पाण्याच्या स्थिती व भाष्य
एल-निनोचे वर्ष व आजपावेतो कोकणात 81 टक्के कमी झालेला पाऊस, असे जरी असले तरी मान्सूनच्या उर्वरित 130 दिवसांच्या कालावधीतून म्हणजे आजपासून (दि. 20 जून) साधारण 20 ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मान्सूनच्या पावसातून मुंबईतील तळी व धरणांचे असलेले जाळे यातून मुंबईकरांची वर्षभराची पिण्याच्या पाण्याची समस्या मिटू शकते, असे वाटते.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!