krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Prosperity Summit : ग्राम संसद समृद्धी शिखर परिषदचे आयाेजन

1 min read

Prosperity Summit : ‘फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स’, ‘ग्राम गौरव प्रतिष्ठान’ (पाणी पंचायत), ‘समन्यायी पाणी हक्क परिषद’ आणि ‘ग्राम स्वराज प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 10 मे राेजी पुणे शहरात ‘ग्राम संसद समृद्धी शिखर परिषद’ (Prosperity Summit) आयोजित केली आहे. या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना ही ‘ग्रामीण आर्थिक समृद्धी’ ही आहे.

ग्रामीण भागातील कुटुंबाचे लोकजीवन बदलणे, रोजगार निर्मिती, नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन, महिला आर्थिक सक्षमीकरण, सर्वांगीण विकास, आर्थिक साक्षरता, शासनाच्या विविध योजना, अनुदाने, बक्षिसे यांची अद्यावत माहिती देण्यात येणार आहे. तसेच ग्रामपंचायतीला CSR म्हणजे (Corporate Social Responsibilty) – औद्योगिक सामाजिक बांधिलकी / उत्तरदायित्व फंड कसा उपलब्ध करता येईल, हे सांगितले जाईल. आदर्श गावाच्या यशोगाथा तुमच्या गावाला स्मार्ट बनविण्यासाठी प्रेरणादायी ठरतील.

या संदर्भातील विविध विषयांवर तज्ज्ञ व मान्यवर वक्त्यांचे मार्गदर्शन आयाेजित केले आहे.
कोणासाठी उपयुक्त – ग्रामीण कार्यकर्ते, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, आदिवासी, शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, पंचायत समिती सदस्य, ग्रामस्थ, महिला बचत गट वगैरे.

📍 वक्ते आणि विषय
🔆 डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपमहासंचालक, यशदा (यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी) – समृद्ध पंचायत राज अभियान (2025-26) विविध सरकारी योजना व पुरस्कार.
🔆 डॉ. सुमंत पांडे, माजी कार्यकारी संचालक, यशदा (यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी) – आर्थिक आराखडा व अर्थसंकल्प नियोजनातून सर्वंकष ग्रामविकास.
🔆 श्री. रवींद्र इंगोले, महाराष्ट्र राज्य प्रशिक्षक वाशिम – मनरेगा (जि रामजी) अंमलबजावणीतून रोजगारनिर्मिती.
🔆 कॉ. किशोर ढमाले, राज्य संघटक सत्यशोधक शेतकरी सभा – पेसा व वन हक्क कायदा-ग्रामसभेचे महत्त्व.
🔆 सौ. योगेश्वरी चौधरी (देशातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत बक्षीस पुरस्कृत) सरपंच, डव्वा, जिल्हा गोंदिया – आदर्श गाव कसे असते-यशोगाथा.
🔆 श्री. प्रमोद झिंजाडे – अध्यक्ष, महात्मा फुले समाज सेवा मंडळ – आर्थिक उन्नती हाच खरा ग्रामधर्म.
🔆 श्री. प्रदीप दळवे, प्रशिक्षक Cybage फाउंडेशन – सीएसआर फंड ग्रामपंचायतीला कसा मिळवावा.
🔆 सौ. शीतल पवार, अधिकारी, माविम (महिला आर्थिक विकास महामंडळ) – ‘नव तेजस्विनी’ प्रकल्पाद्वारे आर्थिक समृद्धी.
🔆 श्री. पी. टी. काळे, संचालक राष्ट्रीय कोअर कमिटी – ग्रामीण उद्योग (स्टार्टअप) बिझिनेस मार्गदर्शन.

📍 परिषद तपशील
🔆 तारीख – 10 मे 2026, रविवार
🔆 वेळ – सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत
🔆 स्थळ – मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चर, टिळक रोड, स्वारगेट कॉर्नर, पुणे- 411002
🔆 महत्त्वाचे – जागा मर्यादित असल्यामुळे सोबत दिलेल्या ‘गुगल फॉर्म लिंक’वर पूर्व रजिस्ट्रेशन आवश्यक आहे.
🔆 गूगल फॉर्म लिंक – https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfW_1Wnm8hfCUZQY7wSrcWUZ_dwC7_VOjAwOOxR79f4CkccpA/viewform?usp=dialog
🔆 टॅग लाईन – उत्सव नाही रिझल्ट निकालाभिमुख कृती (Not Event but Result Oriented Actions)

📍 एकच ध्यास-शेतकरी आणि एकात्मिक ग्रामीण विकास!

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!