krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Cotton Sowing & Production : कापसाचे पेरणीक्षेत्र घटले, उत्पादनही घटणार!

1 min read

Cotton Sowing & Production : दरवर्षी ऑगस्ट शेवटच्या आठवड्यात देशभरातील खरीप पिकांचे पेरणीक्षेत्र (Sowing area of kharif crops) स्पष्ट हाेते. देशात दरवर्षी 125 ते 130 लाख हेक्टरमध्ये कापसाची पेरणी (Cotton Sowing) केली जाते आणि 310 ते 330 लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेते. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाचे पेरणीक्षेत्र तब्बल 14.129 लाख हेक्टरने घटले असून, भरडधान्ये (Millet) आणि डाळवर्गीय (Pulses) पिकांच्या पेरणीक्षेत्रात थाेडी वाढ झाली आहे. त्यामुळे यावर्षी कापसाचे उत्पादन (Production) घटणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

🎯 इतर पिकांच्या पेरणीक्षेत्रात वाढ
यावर्षी खरीप पीक पेरणीक्षेत्र 21.04 लाख हेक्टरने वाढले आहे. मागील वर्षी (सन 2023) 1,010.52 लाख हेक्टरमध्ये विविध खरीप पिकांची पेरणी करण्यात आली हाेती तर यावर्षी (सन 2024) 20 ऑगस्ट 2024 पर्यंत 1,031.56 हेक्टरमध्ये खरीप पिकांची पेरणी करण्यात आली आहे. धानाचे पेरणीक्षेत्र 19.56 लाख हेक्टरने वाढले आहे. मागील वर्षी 349.49 लाख हेक्टरमध्ये धानाची (Paddy) पेरणी करण्यात आली हाेती तर यावर्षी 369.05 लाख हेक्टरमध्ये धानाची पेरणी करण्यात आली. विविध डाळवर्गीय पिकांचे क्षेत्र 6.49 लाख हेक्टरने वाढले असून, मागील वर्षी ते 113.69 लाख हेक्टर हाेते तर यावर्षी ते 120.18 लाख हेक्टर एवढे आहे. भरडधान्यांच्या पेरणीक्षेत्रातही 4.72 लाख हेक्टरने वाढ झाली आहे. यावर्षी 181.11 लाख हेक्टरमध्ये भरडधान्याची पेरणी करण्यात आली असली तरी मागील वर्षी हे क्षेत्र 176.39 लाख हेक्टर एवढे हाेते. तेलबियांचे (Oil seed) पेरणीक्षेत्र 1.64 लाख हेक्टरने वाढले असून, यावर्षी 186.77 लाख हेक्टरमध्ये तेलबियांची पेरणी करण्यात आली असून, मागील वर्षी 185.13 लाख हेक्टरमध्ये पेरणी करण्यात आली हाेती.

🎯 सर्वाधिक वाढ काेणत्या पिकाची?
पेरणीक्षेत्रातील सर्वाधिक वाढ ही धानाच्या क्षेत्रात नाेंदविण्यात आली असून, ते 19.56 लाख हेक्टरने वाढले आहे. डाळवर्गीय पिकांमध्ये तुरीचे पेरणीक्षेत्र 5.04 लाख हेक्टरने वाढले असून, त्याखालाेखाल मुगाचे म्हणजे 2.97 लाख हेक्टर, भरडधान्यामध्ये मक्याचे पेरणीक्षेत्र 5.98 लाख हेक्टर, तेलबियांमध्ये भुईमुगाचे पेरणीक्षेत्र 3.75 लाख हेक्टरने वाढले आहे.

🎯 काेणत्या पिकांचे पेरणीक्षेत्र घटले?
यावर्षी सर्वाधिक घट ही कापसाच्या पेरणीक्षेत्रात नाेंदविण्यात आली. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाचे पेरणीक्षेत्र 14.129 लाख हेक्टरने घटले असून, 20 ऑगस्ट 2024 पर्यंत ही घट 11.08 लाख हेक्टर एवढी हाेती. मागील वर्षी देशभरात एकूण 125.200 लाख हेक्टरवर कापसाची पेरणी करण्यात आली हाेती तर 20 ऑगस्ट 2023 पर्यंत हे क्षेत्र 122.15 लाख हेक्टर एवढे हाेते. यावर्षी 20 ऑगस्ट 2024 पर्यंत 111.071 लाख हेक्टरमध्ये कापसाची पेरणी करण्यात आली. देशातील 11 कापूस उत्पादक राज्यांपैकी केवळ आंध्र प्रदेशात कापसाचे पेरणीक्षेत्र 1.150 लाख हेक्टरने वाढले असून, इतर राज्यांमध्ये ते घटले आहे. सर्वाधिक घट 3.347 लाख हेक्टरची घट ही गुजरातमधील असून, येथील घटलेले कापसाचे पेरणीक्षेत्र भुईमुगाच्या पेरणीक्षेत्रात बदलले आहे. देशात उडिदाचे पेरणीक्षेत्र 1.19 लाख हेक्टर, कुलथी 0.04 लाख हेक्टर, मटकी 0.33 लाख हेक्टर, बाजरी 2.79 लाख हेक्टर, तीळ 0.80 लाख हेक्टर तर ज्युट व मेस्ताचे पेरणीक्षेत्र 0.86 लाख हेक्टरने घटले आहे.

🎯 कापूस पेरणीक्षेत्र (लाख हेक्टर)
राज्य :- 2024 – 2023
🔅 पंजाब :- 1.000 – 1.750 – 0.750 घट
🔅 हरयाणा :- 4.760 – 6.650 – 1.890 घट
🔅 राजस्थान :- 5.132 – 7.910 – 2.778 घट
🔅 गुजरात :- 23.473 – 26.820 – 3.347 घट
🔅 महाराष्ट्र :- 40.832 – 42.220 – 1.388 घट
🔅 मध्य प्रदेश :- 6.149 – 6.300 – 0.151 घट
🔅 तेलंगणा :- 16.988 – 18.220 – 1.232 घट
🔅 आंध्र प्रदेश :- 3.420 – 2.270 – 1.150 वाढ
🔅 कर्नाटक :- 6.640 – 6.920 – 0.280 घट
🔅 तामिळनाडू :- 0.090 – 1.620 – 1.530 घट
🔅 ओडिशा :- 2.346 – 2.350 – 0.004 घट
🔅 इतर :- 0.241 – 0.170 – 0.071 वाढ
🔅 एकूण :- 111.071 – 125.200 – 14.129 घट

🎯 कुठे फायदा, तर कुठे फटका
अतिपाऊस आणि सततच्या ढगाळ हवामानामुळे विदर्भातील कापसाच्या पिकाची वाढ खुंटल्यागत झाली असून, पिकाची अवस्था सध्यातरी वाईट आहे. खान्देश, मराठवाड्यासह राज्यातील इतर भागात तसेच तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक तसेच मध्य प्रदेश व गुजरातमध्ये पिकाची अवस्था थाेडी चांगली असल्याचे तेथील शेतकऱ्यांनी सांगितले. गुलाबी बाेंडअळीचा प्रादुर्भाव व मजुरांच्या कमतरतेमुळे पंजाब, हरयाण व राजस्थान या तीन राज्यांमध्ये कापसाचे पेरणीक्षेत्र सरासरी 30 टक्क्यांनी घटले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी गुलाबी बाेंडअळीची नुकसान पातळी सध्यातरी 75 टक्के कमी आहे. यावर्षी तिन्ही राज्यांमध्ये उशिरा पेरणी झाल्याने तसेच पिके चांगली असल्याने या राज्यांमधील कापूस सप्टेंबरमध्ये बाजारात येईल, अशी माहिती हरयाणामधील इंडियन काॅटन इनसाइट्सचे संस्थापक नवनीतसिंह सैनी यांनी दिली.

🎯 खरीप पिकांचे पेरणीक्षेत्र (आकडे लाख हेक्टर) (20 ऑगस्ट)
पिके 2024 – 2023
✳️ धान :- 369.05 – 349.49 – 19.56 वाढ
✳️ डाळवर्गीय :- 120.18 – 113.69 – 6.49 वाढ
🔅 तूर :- 45.78 – 40.74 – 5.04 वाढ
🔅 उडीद :- 28.33 – 29.52 – 1.19 घट
🔅 मूग :- 33.24 – 30.27 – 2.97 वाढ
🔅 कुलथी :- 0.20 – 0.24 – 0.04 घट
🔅 मटकी :- 8.95 – 9.28 – 0.33 घट
🔅 इतर :- 3.67 – 3.63 – 0.04 वाढ
✳️ भरडधान्य :- 181.11 – 176.39 – 4.72 वाढ
🔅 ज्वारी :- 14.62 – 13.75 – 0.87 वाढ
🔅 बाजरी :- 66.91 – 69.70 – 2.79 घट
🔅 रागी :- 7.56 – 7.04 – 0.52 वाढ
🔅 इतर : – 4.79 – 4.66 – 0.13 वाढ
🔅 मका :- 87.23 – 81.25 – 5.98 वाढ
✳️ तेलबिया :- 186.77 – 185.13 – 1.64 वाढ
🔅 भुईमूग :- 46.36 – 42.61 – 3.75 वाढ
🔅 साेयाबीन :- 125.11 – 123.85 – 1.26 वाढ
🔅 सूर्यफूल :- 0.70 – 0.65 – 0.05 वाढ
🔅 तीळ :- 10.55 – 11.35 – 0.80 घट
🔅 नायजर :- 0.27 – 0.24 – 0.03 वाढ
🔅 एरंडी :- 3.74 – 6.38 – 2.64 घट
🔅 इतर :- 0.04 – 0.05 – 0.01 घट
✳️ ऊस :- 57.68 – 57.11 – 0.57 वाढ
✳️ ज्युट व मेस्ता :- 5.70 – 6.56 – 0.86 घट
✳️ कापूस :- 111.07 – 122.15 – 11.08 घट
✳️ एकूण :- 1031.56 -1010.52 – 21.04 वाढ

🎯 कापूस, साेयाबीनचे दर दबावात राहणार
वाढता उत्पादन खर्च (Production costs), मिळणारा कमी दर व घटती उत्पादकता (Declining productivity) यामुळे काही राज्यांमधील शेतकऱ्यांनी यावर्षी कापसाच्या पिकाला पर्यायी पीक शाेधले आहे. पेरणीक्षेत्र घटल्याने कापसाचे उत्पादन (Production) नक्कीच घटणार आहे. कापसाची स्थिर मागणी (Demand) व वापर (Consumption) विचारात घेता, शेतकऱ्यांच्या मनात दरवाढीचा विचार येणे स्वाभाविक आहे. मात्र, घटलेल्या उत्पादनामुळे निर्माण झालेली तूट भरून काढण्यासाठी टेक्सटाइल लाॅबी केंद्र (Textile lobby) सरकारवर दबाव निर्माण करून रुई (कापूस)च्या गाठीची आयात करायला लावणार आहे. सध्या जागतिक बाजाराच्या तुलनेत भारतीय कापसाचे दर थाेडे अधिक आहे. ही आयात कमी दरात पडावी, टेक्सटाइल लाॅबी कापसावरील 11 टक्के आयात शुल्क रद्द करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव निर्माण करू शकते. केंद्र सरकारने खाद्यतेलावरील (Edible oil) आयात शुल्क (Import duty) पूर्णपणे हटवला आहे. शिवाय, खाद्यतेलाची आयात (Import) वाढविली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील साेयाबीनसह इतर तेलबियांचे दर दबावात म्हणजेच किमान आधारभूत किमतीच्या (Minimum Support Price) आसपास राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!