Count the rain : घराच्या घरी मोजा पाऊस!
1 min readउदाहरणार्थ विसूभाऊ, त्यांच्या ऊसाला दर 15 दिवसांनी पाणी देत असतील आणि या 15 दिवसांत एकूण 50 मिमी पाऊस पडलेला असेल, याच 15 दिवसात बाष्पीभवनही 50 मिमी असेल तर अशावेळी पिकाला पाण्याची गरज नसते. परंतु, शेतकरी नेहमीप्रमाणे पाणी देत असतो. पाण्याच्या अतिवापरामुळे महाराष्ट्रात 10 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन क्षारपड, पाणथळ झालेली आहे आणि त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे पाण्याचा अपव्यय होतोय. शिवाय, पिकाचे उत्पादन व प्रत घटते. हे टाळण्याकरिता आपल्याला घरच्या घरी पाऊस मोजता येईल, अशी सोपी पद्धती सुचवित आहे. जी अत्यंत सोपी, अल्प खर्चाची आणि सर्वांना सहज जमण्यासारखी आहे.
🔆 आकृती क्रमांक-1 मध्ये एक मोकळी पाण्याची बाटली दाखविलेली आहे. या बाटलीवर फुल्या केलेली रेष आहे. येथून ही बाटली लहान करवतीने अथवा व्हेक्सा ब्लेडने सरळ कापून घ्या.
🔆 आकृती क्रमांक-2 मध्ये दाखविल्याप्रमाणे ठेवा. त्यानंतर या बाटलीवर शून्य मिमी पासून वरून 1,000 मिमी पर्यंतच्या खुणा करून घ्या.
🔆 ही बाटली शेतामध्ये लावताना सभोवताली मोठी झाडेझुडपे, गवत नाहीत याची खात्री करून घ्यावी. तसेच ही बाटली वाऱ्याने उडून जाऊ नये, यासाठी या बाटलीच्या बाहेरून दोन्ही बाजूने तोंड उघडे असलेला ड्रम बसवावा.
🔆 पावसाळ्यात पाऊस पडलेल्या प्रत्येक दिवशी सकाळी 8 वाजता हे पाणी किती मिमी आहे, हे मोजावे. त्यानंतर बाटलीतले पाणी फेकून द्यावे म्हणजे दुसऱ्या दिवशीचा पाऊस मोजता येईल.
🔆 पाऊस मिली मीटरमध्ये मोजल्यानंतर ते मिलीलिटर (ml) पाऊस मिलीमीटर (mm) करताना खालील आकृतीत दिलेल्या दाेन सूत्रांचा वापर करावा.
उदाहरणार्थ :- एका बाटलीत 500 मिलीलिटर पावसाचे पाणी गोळा झालेले आहे. बाटलीचे क्षेत्रफळ 50 सेंमी आहे. तर त्या दिवशी एकूण किती मिलीमीटर पाऊस झाला?
अशा रीतीने आपण आपल्या शेतात/गावात पडलेल्या पाऊस मोजू शकता.