krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Cold possibility : 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान पुन्हा थंडी

1 min read
Cold possibility : सरासरीपेक्षा काहीसे अधिक तापमान (Temperature) आणि त्यातील चढ-उतार यामुळे मंगळवार (दि. 13 फेब्रुवारी) पासून महाराष्ट्रातून थंडी (Cold) गायब हाेण्याची शक्यता (possibility) निर्माण झाली हाेती. त्यातच पिके व फळबागांना लाभदायक ठरू पाहणारी फेब्रुवारीअखेर पर्यंतची हिवाळ्यातील थंडी आपला हंगामी कार्यकाळ पूर्ण करणार की काय, असे वाटू लागले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान पुन्हा थंडीची शक्यता निर्माण झाली आहे.

🎯 कशामुळे घडते हे?
🔆 उत्तर भारतात एकापाठोपाठ कमी दिवसांच्या अंतराने मार्गक्रमण करणाऱ्या तीव्र पश्चिम झंजावातांची साखळी सतत टिकून राहिल्यामुळे हे घडत आहे. उत्तर भारतात त्यामुळे धुक्याचे प्रमाणही आता कमी होऊन दृश्यमानताही तेथे सुधारली आहे.
🔆 संपूर्ण उत्तर भारतात रविवार (दि. 18 फेब्रुवारी)पासून पुढील 5 दिवस म्हणजे 22 फेब्रुवारीपर्यंत पश्चिमी झंजावात व त्याचबरोबर मध्य-भारत स्थित प्रत्यावर्ती वारा पॅटर्नच्या बदलातून तेथे पुन्हा जोरदार पाऊस, जबरदस्त बर्फवृष्टी व गारपीट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
🔆 संपूर्ण उत्तर भारत ते महाराष्ट्रातील खान्देशातील अक्षवृत्तपर्यंत समुद्रसपाटी पासून साडेबारा किमी उंचीवर पश्चिम दिशेकडून ताशी 250 ते 270 किमी अतिवेगवान प्रवाही झोताच्या पश्चिमी वाऱ्यांचे वहन अजूनही टिकून आहे.
🔆 कर्नाटक किनारपट्टी ते खान्देशपर्यंत समुद्र सपाटीपासून साधारण 1 किमी उंचीपर्यंत पसरलेला हवेच्या कमी दाबाचा आस.
🔆 ह्या सर्वांच्या एकत्रित परिणामातून महाराष्ट्राकडे थंडी वाहण्याचा खंडीत का होईना पण स्रोत टिकून आहे.
त्यामुळे महाराष्ट्रात मुंबईसह कोकण व मध्य महाराष्ट्रातील खान्देश, नाशिक ते सोलापूरपर्यंतच्या 17 जिल्ह्यात उत्तरेकडून शिरणाऱ्या थंड वाऱ्यांच्या शक्यतेमुळे पहाटेच्या किमान तापमानात घट होऊन 21 ते 23फेब्रुवारी (बुधवार ते शुक्रवार) पर्यंतच्या 3 दिवसांत पुन्हा वरील 17 जिल्ह्यात मध्यम थंडीची शक्यता वाढली आहे.
🔆 मराठवाडा व विदर्भात मात्र दरम्यानच्या काळात पहाटेचे किमान तापमान सरासरीइतकेच राहून तेथे त्या प्रमाणातच थंडी जाणवेल. या वातावरणीय परिणामातून जम्मू काश्मिर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमधील पर्यटन पुढील 5 दिवस म्हणजे 22 फेब्रुवारीपर्यंत गैरसोयीचे व त्रासदायक ठरू शकते, याचीही नोंद पर्यटकांनी घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!