Cold possibility : ढगाळ वातावरण निवळतीकडे; पहाटेच्या गारव्याची शक्यता
1 min readमुंबईसह संपूर्ण कोकणात मात्र शनिवारी (दि.11 नोव्हेंबर) ढगाळ वातावरण राहू शकते. रत्नागिरी सिंधुदुर्ग व कोल्हापूर या तीन जिल्ह्यात पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार (दि. 16 नोव्हेंबर)पर्यंत ढगाळ वातावरणासाेबतच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता कायम आहे, असेही माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले.
येत्या काळात अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात चक्रीय वाऱ्याच्या (Cyclic wind) स्थितीतून जरी कमी दाब क्षेत्राच्या निर्मितीची शक्यता असली तरी महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात कोणत्याही प्रकारच्या पावसाची शक्यता (Rain possibility) जाणवत नाही. शुक्रवार (दि. 17 नोव्हेंबर)पासून महाराष्ट्रात हळूहळू थंडीची चाहूल लागू शकते, असा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.