krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Cloudy weather : पाच दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता

1 min read
Cloudy weather : महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड व चंद्रपूर जिल्ह्यात रविवार (दि. 5 नाेव्हेंबर)पासून पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार (दि. 9 नाेव्हेंबर)पर्यंत ढगाळ वातावरण (Cloudy weather) राहण्याची अधिक शक्यता आहे. अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची (Rain) शक्यता जाणवते, असा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.

विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्रात मात्र पहाटेचा गारवा कमी होईल. शिवाय, दुपारचे कमाल तापमान काहीसे अधिक राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागात तेथे पावसाची शक्यता जाणवत नाही.

दरम्यान, पाच दिवसांच्या कालावधीत अरबी समुद्रात चक्रीय वाऱ्याच्या स्थितीतून (Cyclic wind conditions) कमी दाब क्षेत्राची (low pressure area) निर्मिती होवू शकते. परंतु, त्यापासून महाराष्ट्रात साधारण 20 नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही पावसाची शक्यता जाणवत नाही. शुक्रवार (दि.10 नोव्हेंबर) पासून पुन्हा हळूहळू पहाटेच्या गारव्यात वाढ होवून दुपारचे कमाल तापमानही सामान्य राहण्याची शक्यता जाणवते, असेही माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!