Cloudy weather, October hits : आधी ढगाळ वातावरण, नंतर ऑक्टाेबर हिट
1 min read
बुधवार (दि. 18 ऑक्टोबर)पासून पुन्हा ढगाळ वातावरण निवळून ऑक्टोबर हिटचा (October hits) परिणाम महाराष्ट्रात पुन्हा पूर्ववत जाणवू लागेल. दरवर्षीपेक्षा यावर्षीची ऑक्टोबर हिट महाराष्ट्रात अधिक दाहक जाणवण्याची शक्यता आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा दुपारचे कमाल तापमान 2 डिग्रीने तर पहाटेचे किमान तापमान 3 ते 4 डिग्रीने अधिक असण्याची शक्यता आहे. कोकण व मराठवाड्यात ऑक्टोबर हिटच्या परिणाम अधिक असू शकतो, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रातील काही भागात पाऊस हा दि. 9 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या रब्बीच्या तिसऱ्या आवर्तनातील असून पावसाचा परिणाम दक्षिण महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, दक्षिण सातारा, सोलापूर, सांगली या जिल्ह्यापर्यंत साधारण जाणवू शकतो. नैऋत्य मान्सून अद्यापही महाराष्ट्रातील वेंगुर्ल्यापर्यंत खिळलेलाच आहे. देशातून पूर्णपणे परतला नसून, त्याला निरोप देण्यासाठी अजूनही वाट पहावी लागेल. ईशान्य मान्सून तामिळनाडूमध्ये कदाचित 25 ऑक्टोबर दरम्यान सेट होण्याची शक्यता जाणवते. सध्या चक्रीवादळाचा काळ असून त्यांची निर्मिती व त्यामुळे महाराष्ट्रात होऊ शकणाऱ्या पावसासंबंधीची माहिती त्या-त्या वेळेस अवगत केली जाईल, असेही माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले.