Monsoon rain : मान्सून जागेवरच, पण पावसासाठी अनुकूल वातावरण!
1 min read
✴️ या परिणामामुळे तसेच बंगालच्या उपसागरातील आंध्र प्रदेश, ओडिशाच्या किनारपट्टीवरील 3 किमी उंचीवरील चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे मान्सूनची बंगाल शाखा पूर्व किनारपट्टीकडे वाटचाल करू शकते.
✴️ मान्सूनच्या बंगालच्या शाखेमुळे अरबी समुद्रात थंडावलेली मान्सूनची शाखाही उर्जीतावस्थेत येईल. परंतु, सुरुवातीला तिचा जोर कोकणात अधिक तर सह्याद्रीच्या पूर्वेकडील वर्षाच्छायेच्या प्रदेशात (विशेषतः अहमदनगर, पुणे व सातारा या जिल्ह्यात) सध्या तरी काहीसा कमी जाणवेल.
✴️ शुक्रवार (दि. 23 जून)पासून महाराष्ट्रात काही ठिकाणी ‘पूर्वमोसमी’ तर काही ठिकाणी ‘मोसमी’ पावसाच्या असलेल्या शक्यतेनुसार उद्या, गुरुवार (दि. 22 जून)पासून हळूहळू पावसासाठी वातावरणात बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
✴️ महाराष्ट्रात शुक्रवार (दि. 23 जून), शनिवार ( दि. 24 जून), रविवार (दि. 25 जून) व साेमवार (दि. 26 जून) या काळात तुरळक ठिकाणी किरकोळ ते मध्यम पावसाची अपेक्षा करू या!
✴️ कोकणात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता असून, मुंबईसह संपूर्ण कोकणातील चार जिल्हे व गोव्यात तसेच विदर्भातही उद्यापासूनच म्हणजे गुरुवार (दि. 22 जून) व त्यापुढील पाच दिवस म्हणजे सोमवार (दि. 26 जून)पर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता जाणवते.
✴️ मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मात्र शुक्रवार (दि. 24 जून)पासून पावसाची शक्यता जाणवते. सध्या वातावरणीय बदल एवढाच जाणवतो.