Biporjoy Cyclone : बिपोरजॉय चक्रीवादळ दिशा बदलणार
1 min read✴️ वादळाच्या परिणामामुळे सौराष्ट्र व कच्छ विभागात मंगळवार (दि. 13 जून) ते शनिवार (दि. 17 जून) पर्यंतच्या पाच दिवसात जोरदार पावसाची शक्यता जाणवते तर महाराष्ट्रातील मुंबईसह कोकणातील उत्तर पश्चिम किनारपट्टी तसेच उत्तर महाराष्ट्रातील खानदेश व नाशिक जिल्ह्यात वेगवान वाऱ्यासहित मध्यम पावसाची शक्यताही नाकारता येत नाही.
🌐 बिपोरजॉयने दिशा का बदलली?
✴️ वादळाच्या दोन्हीही म्हणजे पश्चिम बाजूला अरबी समुद्रात तर पूर्व बाजूला महाराष्ट्रातील पश्चिम किनारपट्टी भू-भागावर जमिनीपासून 6 ते 10 किमी उंचीवर असलेले साधारण 4 किमी जाडीचे उच्च हवेच्या दाबाचे प्रत्यावर्ती चक्रवती क्षेत्रे व सॅन्डविच सारखे दोघांच्या मधून त्याच उंचीपर्यंत असलेल्या बिपोरजॉय वादळाचे क्षेत्र यामुळे सरळ पश्चिम किनारपट्टी समांतर बिपोरजॉय उत्तरेकडे मार्गक्रमण करणार आहे. परंतु, साधारण 14 जून दरम्यान अरबी समुद्रातील हवेचा उच्च दाबाच्या अति प्रभावामुळे त्याची दिशा पूर्वेकडे होवून वादळ ईशान्येकडे गुजरातकडे वळणार आहे.
✴️ दुसरे उत्तर भारतात 10 ते 12 किमी उंचीवर असलेला पश्चिमकडून पूर्वेकडे वाहणारा अति-वेगवान वाऱ्याचा आडवा झोत-पट्टा अधिक दक्षिणेकडे म्हणजे राजस्थान मध्यप्रदेश राज्य रेषेपर्यंत सरकल्यामुळे चक्रीवादळाच्या उत्तर दिशा मार्गक्रमणास अटकाव होण्याच्या शक्यतेमुळे वादळाची दिशा येमेन वा ओमान आखाती देशांच्या किनारपट्टीवर न होता भारत व पाकिस्तान देशांच्या सीमावर्ती भागाकडे वळली.