krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Tropical Cyclone : अतिखोल अरबी समुद्रातील अति तीव्र चक्रीवादळ

1 min read
Tropical Cyclone : सध्या उत्तर केरळातील कालिकत शहराच्या समोर पश्चिमकडे खोल अरबी समुद्रात आज (मंगळवार, दि. 7 जून) सकाळी असलेले अति तीव्र हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र आज (मंगळवार, दि. 7 जून संध्याकाळी जवळपास मंगळुरू शहराच्या समोर पश्चिमकडे खोल अरबी समुद्रात चक्रीवादळात (Tropical Cyclone) रुपांतरित होण्याची शक्यता जाणवत आहे. सदर चक्रीवादळाचे यादीत अनुक्रमाने उपलब्ध असणारे व बांगलादेशाने सुचवलेल्या त्यांच्या बंगाली भाषेतील नाव 'बिपॉरजॉय' असेल. त्याचा मराठीत अर्थ 'आपत्ती' हा होय.

✴️ या चक्रीवादळाचे येत्या 3 ते 4 दिवसात अतितीव्र चक्रीवादळात रुपांतर होवून साधारण 6 दिवसानंतर रविवार (दि. 11 जून दरम्यान) मुंबई शहर ते ओमान देशाच्या ‘काल बन’ व ‘दावाह’ बेटांच्या दरम्यान सरळ जोडणाऱ्या अंतराच्या मध्यावर खोल अरबी समुद्रात त्याचे ठिकाण असून त्यावेळी त्याचा झटक्याखाली वाऱ्याचा वेग हा ताशी 150 ते 170 किमी असू शकतो.

✴️ हे वादळ अतिखोल अरबी समुद्रात असल्यामुळे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर विशेष नुकसानदेही परिणाम होण्याची शक्यता कमीच वाटते. अजून देशाच्या भू-भागावर प्रवेश न पावलेला मोसमी पावसाच्या आगमनावर काय परिणाम होवू शकतो, याबद्दलचे चित्र लवकरच स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!