krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Wheat straw manure : गव्हाच्या कुटाराचे खत कसे तयार करावे?

1 min read
Wheat straw manure : बरेच शेतकरी गव्हाचे कुटार जाळुन टाकतात किंवा त्याची विक्री करतात. त्यापासुन उत्तम खत तयार करता येते. आता बऱ्याच ठिकाणी गहु काढणीला सुरुवात झाली आहे. चला तर मग या वर्षी पासुन गव्हाच्या कुटारापासुन खत (Wheat straw manure) तयार करुया

❇️ कुटारामधील अन्नद्रव्य
🔆 नत्र = 0:30 – 0:35 टक्के
🔆 स्फुरद = 0:80 – 0:1 टक्के
🔆 पालाश = 0:70 – 01 टक्के

🔆 एक हेक्टर मध्ये 7/8 टन कुटार मिळते त्या पासुन सेंद्रीय खत तयार करता येते.
🔆 कुटार शेतात मध्य भागी असतें ते कोपरयावर वाहुन ढीग पसरावा, तो ओला करावा.
🔆 त्यावर 2 बॅग युरीया, 2 बॅग सुपर फॉस्फेट, जिवाणू कल्चर, वेस्ट डीकाॅमपोजर 200 लिटर द्रावण शिंपडावे.
🔆 गव्हाचे काड सिंगल पल्टी नांगरावे एक महिन्याने रोटाव्हेटरने मिक्स करावे. पावसाळ्यात पहिला पाऊस पडल्यावर एकरी दोनशे लिटर वेस्ट डिकंपोजर शिंपडावे. दोन महिन्यांत खत तयार होईल.

❇️ हे शक्य नसल्यास
🔆 शेतातील कुटारावर 200 लिटर वेस्ट डीकाॅमपोजर शिंपडावे ट्राली त भरुन शेतात पसरावे.
नागरटी करून जमिनीत गाडावे 2/3 महिन्यात कुजुन खत तयार होईल. जमिनीत सेंद्रीय कर्ब वाढतो. पुढील पिकांस फायदेशीर होईल. मित्रांनो, रासायनिक खतांचा बेसुमार वापर थांबवा आणि सेंद्रिय खतांचा वापर वाढवा. त्याशिवाय तरणोपाय नाही.
🔆 जमिनिची उत्पादकता वाढवायची असेल तर सेंद्रिय कर्ब आणि जिवाणू वाढ याशिवाय आपल्याजवळ दुसरा कोणताच मार्ग नाही. त्यामुळे आपले कोणतेही पीक प्रतिकार क्षम होईल व रोग कमी पडतील.
🔆 रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळेच आजची आपली शेती आपल्याला परवडत नाही. शेती हे शास्त्र आहे, पारंपरिक पद्धतीने केली तर लावलेला खर्चही वसूल होणार नाही, त्यासाठी सुशिक्षित, नवयुवक शेतकऱ्यांनी शास्त्र शुद्ध पद्धतीनेच शेती केली पाहिजे.
🔆 जमिनीच्या सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सेंद्रिय कर्बामुळे जमिनीतील सूक्ष्मजीव कार्यरत होऊन माती जिवंत होण्यास मदत होते. जमिनीमध्ये कार्बन आणि नत्र यांचे योग्य गुणोत्तर ठेवले जाते.

❇️ सेंद्रिय कर्बाचे मातीतील प्रमाण
🔆 साधारणपणे 25 टक्के हवा, 25 टक्के पाणी, 45 टक्के खनिजे आणि 5 टक्के सेंद्रिय कर्ब मातीमध्ये आढळून येते. अशी माती शेतीसाठी सर्वांत चांगली मानता येईल.
🔆 आपण शेतात चालतांना शेतजमीन इतकी भुसभुशीत झाली पाहिजे की, त्या जमिनीवरून चालतांना आपण गादीवरून चालत आहोत असा भास झाला पाहिजे.
🔆 हे केव्हा होईल, जेव्हा शेतकरी मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खते वापरतील तेव्हा. याचा प्रत्येय या वेळेस आला की जिथे आम्ही बनविलेले कर्ब युक्त सेंद्रिय खत वापरलेल्या जागेत मऊ ,भुसभुशीत पणा आणि तपकिरी रंग आल्यासारखा जाणवत होता. म्हणून शेतकऱ्यांनी ज्यास्तीत ज्यास्त सेंद्रिय खते वापरणे खूप गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!