Onion booty : 43 वर्षातील कांद्याच्या लुटीचे वेगळे गणित
1 min readशेती व्यवसायाला 10 हजार वर्षांपेक्षा जास्त मोठी परंपरा आहे. इ.स. 1200 पर्यंत तुम्ही सोन्याच्या ताटात जेवण करत आलात. परकीय आक्रमण उलथवून तुम्ही आतापर्यंत आपली संस्कृती जपली. सभ्यता राखली आणि दान, धर्म केले. इ.स. 1980 पर्यंत प्रत्येक सरकारने शेतकरी हा केंद्रस्थानी ठेऊन निर्णय घेतले. कारण तुम्ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा राहिले आहात. परंतु, मागच्या 40 वर्षात पद्धतशीरपणे हा कणा मोडण्यात आला.
कौटुंबिक उद्योग घराण्यांनी राजकारणी, सरकारी नोकरदार, सरकारी वित्तीय संस्थाचे प्रमुख यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात सरकारी पैसा त्यांच्या उद्योकांकडे वळवण्यात यश मिळविले. त्यात अनुदान असेल, कर्ज असेल हे मोठ्या प्रमाणात नियम तोडून किंवा नियम बदलून देण्यात आलं आणि त्यांनी बनवलेल्या वस्तू तुम्हालाच महागड्या दारात विकण्यात आल्यात. त्यात वीज, डिझेल, वाहन आणि बरच काही.
इ.स. 1980 ते 2023 पर्यंतची आकडीवारी तुम्हाला सांगतो. त्यावरून तुम्हाला कळेल की, तुमचा आतापर्यंत किती तोटा झाला आहे.
✳️ कांदा 1980 मध्ये 90 रुपये प्रति क्विंटल होता. तो आता 700 रुपये प्रति क्विंटल आहे .
वाढ झाली 677 टक्के
✳️ सोने (पूर्वी सर्व व्यापार सोनं केंद्रस्थानी ठेऊन व्हायचे ) 1980 मध्ये 130 रुपये ग्राम होतं, ते आता 5,500 रुपये ग्राम आहे,
वाढ झाली 4,130 टक्के.
✳️ केंद्र सरकारी (चतुर्थ श्रेणी) नोकराचा पगार 750 रुपये महिना होता, तो आता 18,000 रुपये आहे आहे,
वाढ झाली 2,300 टक्के.
✳️ बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) ची इंडेक्स 1980 मध्ये होती 380, ती आता आहे 60,000,
वाढ झाली 1,5689 टक्के.
✳️ सोने जरी केंद्रस्थानी ठेवून 1980-2023 पर्यंत कांद्याचा व्यवहार झाला असता तर तुम्हाला आतापर्यंत 1 एकरामधून उन्हाळी आणि पावसाळी कांदा विकून 3.2 कोटी अधिक मिळाले असते.
✳️ सरकारने जर कांद्याला हमीभाव देऊन, नोकरदारांच्या पगारासारखी वाढ केली असती तर तुम्हाला आतापर्यंत 1.82 कोटी अधिक मिळाले असते.
✳️ कौटुंबिक उद्योग घराण्यांसारखा तुम्ही जर राजकारण्यांना, नाेकरदारांना, सरकारी वित्तीय संस्थाच्या प्रमुखांना पैसे देऊन कांद्याची भरमसाठ वाढ करून विक्री केली असती तर तुम्हाला एकर मधून उन्हाळी आणि पावसाळी कांदा विकून 12.4 कोटी मिळाले असते.
शेतमालाला कमी भाव का देण्यात येतो, हे सर्वच मोठ्या राजकारण्यांना माहीत आहे. पण, या उद्योगांच्या विरोधात जो पण बोलला त्याच राजकीय आयुष्य संपवण्यात येतं. राजू शेट्टी ह्यांनी दूध दरवाढी साधं आंदोलन केलं 2018 मध्ये, तर 2019 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना हरवण्यात आलं. कारण, त्यांच्या आंदोलनामुळे दूध उद्योगाचा नफा कमी झाला. त्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षाचा पदाधिकारी, समाज माध्यम या कौटुंबिक उद्योग घराण्यांवर टीका करणं टाळतो.
भविष्यात जे राजकारणी तुम्हाला याच्यासाठी मदत करतील. त्याच्यावर त्यांचा पक्ष, कौटुंबिक उद्योग घराण्यांच्या दबावापोटी कारवाई करू शकतो. त्यामुळे तुमची पण जबाबदारी आहे की, त्याच्या प्रचारात जाऊन त्याला परत निवडणुकीत निवडून देणे , त्यांच्यामुळे जास्तीत जास्त राजकारणी तुमच्या मागण्यासाठी तुमच्या सोबत राहतील.
तीन महत्त्वपूर्ण गोष्टी तुम्ही सरकारकडे मागू शकतात
✳️ सन 1980 पासून 2023 पर्यंतची शेतमालाच्या नुकसानीची भरपाई.
✳️ आतापर्यंत कौटुंबिक उद्योग घरण्यांनी नियमबाह्य पद्धतीने दिलेला पैसा व्याजासहीत परत घ्या आणि तो शेती व्यवसायाकडे वळवा.
✳️ कांद्यासाठी हमीभाव जो कमीतकमी 2,100 रुपये क्विंटल आणि महागाई नुसार प्रत्येक वर्षी वाढ करून घ्या.
✳️ एक गोष्ट लक्ष्यात असु द्या कुठली सरकार पाडणे किंवा निवडून आणणे हे सर्वस्वी तुमच्या हातात नसल्यामुळे आहे त्या सरकारवर दबाव आणून तुमच्या मागण्या पूर्ण करून घ्या.
माझ्या तुम्हाला याच्यासाठी शुभेच्छा! तुम्ही आतापर्यंत मुघलांना हरवलं, ब्रिटिशांना हाकललं, आता हे कौटुंबिक उद्योग घराणे संपून, राजकारण्यांना योग्य मार्ग दाखवून परत शेती आणि शेतकरी अर्थव्यस्थेच्या केंद्रस्थानी आणा. 2100 शतकातली जगातली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, ती अन्न सुरक्षा! म्हणून इतिहासात पण तुम्हाला महत्त्वाचं स्थान होतं आणि भविष्यात पण राहणार आहे.
‘इ. स. १९८० पर्यंत प्रत्येक सरकारने शेतकरी हा केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेतले.’ हे विधानच चुकीचे आहे.