krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

British heirs : गोऱ्या इंग्रजांचे देशी वारस…!

1 min read
British heirs : दुसरे महायुद्ध (World War II) सुरू झाले तेव्हा सैन्याला अन्नधान्य व इतर साहित्य हक्काने उपलब्ध करून देता यावे, यासाठी इंग्रजांनी 'आवश्यक वस्तू' (Essential commodities) अध्यादेश आणला होता. महायुद्ध संपल्यानंतर आवश्यक वस्तू अध्यादेश रद्द करण्याबाबत मागणी पुढे येऊ लागली. कारण या अध्यादेशामुळे शेतकऱ्यांचा शेतीमाल मातीमोल भावाने विकू लागला होता. त्या काळच्या पंजाब प्रांतात मोठे प्रभावी आंदोलन उभारणाऱ्या सर छोटूराम या शेतकरी नेत्याने 'आवश्यक वस्तू कायदा' (Essential commodities act) हटविण्यासाठी मोठी चळवळ उभी केली होती.

या चळवळी दरम्यान नामांकित शायर अल्लामा इकबाल यांचा शेर खूप गजला.
“जिस खेत से दहक़ाँ को मयस्सर नहीं रोज़ी|
उस ख़ेत के हर ख़ोशा-ए-गुन्दम को जला दो||”
याचा अर्थ आहे, ज्या शेतातून शेतकर्‍याला त्याची रोजी उपलब्ध होत नसेल, अशा शेतातील पिकाची प्रत्येक ओंबी शेतकऱ्यांनो जाळून टाका. या आंदोलनादरम्यान (Farmer movement) सर छोटूराम यांच्या नेतृत्वाखाली अनेक शेतकऱ्यांनी अक्षरशः आपली गव्हाची पिके (Wheat crop) जाळून टाकली हाेती.

पुढे लवकरच इंग्रज निघून गेले आणि आपले सरकार अस्तित्वात आले. त्यांनी हा अध्यादेश रद्द करण्याऐवजी या अध्यादेशाचा ‘आवश्यक वस्तू कायदा-1955’ तयार करून तो परिशिष्ट-9 मध्ये टाकला. इंग्रजांनी देशाला लावलेला आवश्यक वस्तू कायद्याचा रोग आमच्या सरकारने मोठ्या प्रमाणात पसरवला. त्यामुळे आपले नेते गोऱ्या इंग्रजांचे देशी वारस ‘British heirs: ठरले.

या कायद्याच्या आधारे शेतकऱ्यांचा माल स्वस्तात मिळविण्याच्या सरकारच्या षडयंत्रामुळे केवळ शेतकरीच आत्महत्या ‘Farmer suicide) करत आहेत, असे नाही तर त्यामुळे देशाची अर्थव्यवस्थाही मोडकळीस आली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात आणि देश बरबाद होण्यापासून वाचावा, असे वाटत असेल तर शेतकऱ्यांची कोंडी बंद करायला हवी.

  1. जमीन धारणा कायदा. Land tenure act
  2. आवश्यक वस्तू कायदा. Essential commodities act
  3. जमीन अधिग्रहण कायदा. Land acquisition act
    या तीन कायद्यांनी शेतकऱ्यांची कोंडी केली आहे. हे तिन्ही कायदे आणि यांना पोसणारे परिशिष्ट-9 विनाविलंब रद्द झाले पाहिजे.

1 thought on “British heirs : गोऱ्या इंग्रजांचे देशी वारस…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!