Indian Farmer: भारतात शेतकरीच आत्महत्या का करतो?
1 min read⚫ इंडियाच्या उभारणीसाठी न्यायबंदी
आजवर माझ्या अनेक पिढ्यांचे शोषण या शेतकरीविरोधी कायद्यांनी व ते हेतूपुरस्सर निर्माण करणाऱ्या तथाकथित कल्याणकारी (?) सरकारांनी केले आहे, याची मला सप्रमाण जाणीव झाली आहे. 18 जून 1951 रोजी पहिल्या घटनादुरुस्तीच्या (First Constitutional amendment) नावाने शेतकऱ्यांना ‘न्यायबंदी’ करण्यात आली. स्वतंत्र देश सर्वांचा तर देशातील केवळ शेतकऱ्यांनाच ‘न्यायबंदी’ का? या प्रश्नाने आम्हाला विचलित केले. इंग्रजांनी व्यापारासाठी शेतकऱ्यांचे शोषण केले. शोषित शेतकऱ्यांनी स्वातंत्र्यासाठी आहूती दिली आणि स्वातंत्र्यानंतर पुन्हा कायद्याचा जाळ आणि धुराळा करून ‘इंडिया’ (India) उभा करण्यासाठी त्याच्या पायात शेतकऱ्यांनाच गाडायला सुरुवात झाली.
⚫ मधमाश्या, शेतकरी व धूर
मधाच्या पोळ्यातील मध लुटायचे असेल तर धूर केला जातो, मधमाश्यांनी तयार केलेल्या मधापासून मधमाश्यांनाच दूर ठेवले जाते. शेतकरी शेतमाल तयार करतात पण ऐनवेळी व्यवस्थेचा धूर त्यांना त्यांच्या शेतमालापासून दूर करतात. व्यापारी नावाच्या माणसाकरवी सरकार शेतकऱ्यांचे मध लुटते.
⚫ काळा दिवस
शेतकऱ्यांचे शोषण करणारी व्यवस्था निर्माण करण्याची सुरुवात 18 जून 1951 ला झाली म्हणून हा दिवस आम्हा शेतकऱ्यांसाठी व त्यांच्या मुला-मुलींसाठी ‘काळा दिवस’ (Black Day) पाळतो. या दिवशी निषेध म्हणून घरावर काळे झेंडे लावतो, हातावर काळा कपडा बांधतो, काळे झेंडे घेऊन पदयात्रा करतो आणि शेतकऱ्यांना बळीराजा/अन्नदाता म्हणणाऱ्या मुर्दाड समाजात शेतकरी सहवेदनेचा पाझर फुटावा, यासाठी त्यांच्या तथाकथित कल्याणकारी सरकारच्या ढोंगी चेहऱ्यावरचे मुखवटे उतरविण्यासाठी निरंतर प्रयत्न करत आहोत. आपण किसानपुत्र म्हणून निदान ‘शेतकरीविरोधी कायदे’ व त्याचे आजवरचे परिणाम समजून तरी घेणार आहात की नाही?
⚫ शेतकाऱ्यांना गळफास ठरलेले,
◆ कमाल शेतजमीन धारणा कायदा ((Ceiling) Act)
◆ आवश्यक वस्तू कायदा (Essential Commodities Act)
◆ जमीन अधिग्रहण कायदा (Land Acquisition Act)
आदी शेतकरीविरोधी ‘नरभक्षी’ कायदे रद्द करा!
जयगुरू 🙏 खूप छान मांडणी केली भाऊ…..! ऋणी आहेच… 🙏