krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

अमेरिकेत कोरड्या दुष्काळाचे सावट; आगामी काळात कापसाचे दर स्थिर राहणार

1 min read
USDA : भारतासाेबतच जागतिक पातळीवरील कापड उद्याेग कापसाचे सध्याचे चढे दर कमी हाेण्याची प्रतीक्षा करीत आहेत. कापसाचे उत्पादन घटल्याने तसेच वापर व मागणी वाढल्याने कापसाच्या दरात जागतिक पातळीवर माेठी वाढ झाली. आगामी हंगामात कापसाचे उत्पादन वाढल्यास दर कमी हाेतील, अशी अपेक्षा कापड उद्याेगांनी बाळगणे स्वाभाविक आहे. परंतु, अमेरिकेला काेरड्या दुष्काळाचा धाेका असल्याने पुढील हंगामातही अमेरिकेतील कापसाचे पीक प्रभावित हाेणार आहे, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने (United States Department of Agriculture - USDA)ने व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी हंगामात कापसाचे दर फार काही खाली येणार नाही. ते यावर्षीप्रमाणे चढे अथवा स्थिर राहतील.

🌎 अमेरिकेतील कापसाच्या पिकाला धोका
यूएसडीए (USDA) च्या अंदाजानुसार चालू हंगामात काेरड्या दुष्काळामुळे अमेरिकेतील कापसाचे किमान 51 टक्के पीक प्रभावित हाेण्याचा धाेका आहे. कॉटलुक ए इंडेक्स (Cotlock A Index) देखील USDA च्या या अंदाजाला सहमती दर्शविली असून, कापसाचे दर किमान ऑगस्ट 2022 पर्यंत कमी हाेणार नाही, असा अंदाज व्यक्त केला आहे. USDA च्या ताज्या अहवालानुसार, सन 2022-23 च्या म्हणजेच येत्या हंगामात (ऑगस्ट-2022 ते जुलै-2023) अमेरिकेतील कापसाचे उत्पादन सन 2021-22 च्या हंगामाच्या तुलनेत 2.23 लाख मेट्रिक टनाने घटणार आहे. अमेरिकेत सन 2021-22 च्या हंगामात 38.15 लाख मेट्रिक टन कापसाचे उत्पादन झाले होते तर सन 2022-23 च्या हंगामात कापसाचे उत्पादन 35.92 लाख मेट्रिक टनापर्यंत कमी होऊ शकते. सन 2020-21 मध्ये अमेरिकेत कापसाचे 31.81 लाख मेट्रिक टन उत्पादन झाले होते. आयसीई काॅटन यूएस (ICE Cotton US) कापूस उत्पादन परिस्थितीबाबत वेळाेवेळी माहिती घेत असल्याने नजीकच्या काळात कापसाचे दर कमी हाेण्याची शक्यता फार कमी आहे.

🌎 जागतिक पातळीवर कापसाचे उत्पादन वाढणार
सन 2022-23 च्या हंगामात भारत, चीन, ब्राझील आणि पाकिस्तानमध्ये कापसाचे उत्पादन वाढू शकते, असा अंदाज ही USDA ने त्यांच्या ताज्या अहवालात व्यक्त केला आहे. त्यामुळे जागतिक कापूस उत्पादन सन 2021-22 च्या तुलनेत 254.61 लाख मेट्रिक टनावरून आगामी म्हणजेच सन 2022-23 च्या हंगामात 264.03 लाख मेट्रिक टनापर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. म्हणजेच सन 2021-22 च्या तुलनेत सण 2022-23 मध्ये जागतिक पातळीवर कापसाचे एकूण उत्पादन 9.42 लाख मेट्रिक टनाने वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

🌎 कापसाचे दर
TexPro व कॉटलुक A- इंडेक्स (USASMP) नुसार, ऑगस्ट-2022 मध्ये अमेरिकेत कापसाचा नवीन हंगाम सुरू होईल. तेव्हा कापसाचे दर प्रति पाउंड 1.552 डाॅलर इतका उच्च राहील. जुलै-2022 च्या तुलनेत हे दर किंचित अधिक असतील. जुलै-2022 मध्ये कापसाचे दर 1.551 डाॅलर प्रति पाउंड असेल. मे-2022 मध्ये कॉटलुक इंडेक्सवर कापसाचे दर 1.635 डाॅलर प्रति पाउंडवर पोहोचले हाेते. जून-2022 मध्ये कापसाचे सरासरी दर किंमत 1.564 डाॅलर प्रति पाउंड होते.

🌎 कापसाचा क्लोसिंग-ओपनिंग स्टॉक प्रभावित
USDA च्या अहवालानुसार सन 2022-23 च्या हंगामात जागतिक पातळीवर कापसाचे उत्पादन 9.42 लाख मेट्रिक टनाने वाढणार असले तरी जगात याच तुलनेत कापसाचा वापर व मागणी देखील वाढणार आहे. शिवाय, सन 2021-22 मध्ये जागतिक पातळीवर कापसाचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झाल्याने जगातील कापड व सूत उद्योग व त्यांना कापसाचा पुरवठा करणाऱ्या संस्थांचा कापसाचा क्लोसिंग आणि ओपनिंग स्टॉक प्रभावित झाला आहे. भविष्यात कापडाचे उत्पादन अडचणीत येऊ नये यासाठी त्यांना सन 2022-23 व त्यानंतरच्या हंगामाच्या क्लोसिंग व ओपनिंग स्टॉकमध्ये योग्य प्रकारे ताळमेळ बसवावा लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!