बहुगुणी वृक्ष : भोकर
1 min read
🌳 कुठे आढळते?
भोकर हा वृक्ष भारत, श्रीलंका, इजिप्त, चीन, तैवान, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, जपान या देशांमध्ये आढळते. भारतात ही वनस्पती कोरड्या, पानझडी तसेच ओलसर मोसमी जंगलात सर्वत्र आढळून येते. महाराष्ट्रातही सर्वत्र आढळते. पश्चिम घाट, सातपुडा, कोकण या सर्व ठिकाणी भोकरीचे वृक्ष नैसर्गिकपणे जंगलात वाढलेले असतात, काही ठिकाणी या वृक्षाची लागवडही करतात.

🌳 झाडाची रचना
भोकराचे झाड 12 ते 15 मीटर उंच वाढते. त्याची पूर्ण वाढ होण्यासाठी किमान 50 ते 60 वर्षे लागतात. पूर्ण वाढलेल्या भोकराच्या खोडाचा घेर सुमरे एक मीटर असतो. साल गर्द पिंगट व भेगाळलेली असते. पाने साधी, एकाआड एक, जाडसर व खरखरीत असतात. पानाच्या तळातून 3 ते 5 शिरा निघतात. कोवळी पाने केसाळ असतात. फुले मार्च-एप्रिलमध्ये येतात. फुले लहान, पांढरी व सुवासिक असून, नर फुले आणि मादी फुले एकाच वृक्षावर येतात. फळे लांबट, फिकट पिवळसर तपकिरी ते लालसर काळपट, चकचकीत आणि एकबीजी असतात. पिकलेली फळे चवीला गोड असून, ती चिकट रसाने भरलेली असतात.
🌳 जैवविविधता
कोकिळा, साळुंकी, दयाळ, ब्राम्हणी मैना, जंगली मैना, पोपट, लालबुड्या बुलबुल, कोतवाल, चिमण्या, बटेर आदी पक्ष्यांचा भोकर हा आवडता वृक्ष आहे. भोकर वृक्षावर लहान-लहान कीटकही पोसले जातात व या पक्ष्यांनाही खाण्यासाठी काही पक्षी येतात. पावसाळ्याच्या प्रारंभी भोकरची फळे पिकल्यानंतर पक्ष्यांची संख्या अधिकच वाढते.

🌳 आयुर्वेदिक महत्त्व
✳️ फळे – फळेस्नेहन व संग्राहक आहेत. भोकरीचे फळ कृमिनाशक, कफोत्सारक व खोकल्यापासून आराम देणारे आहे. फळ मूत्रवर्धक व सारक गुणधर्माचे आहे. कोरडा खोकला, छाती व मूत्रनलिकेचे रोग, पित्तप्रकोप, दीर्घकालीन ताप, तहान कमी करणे, मूत्र जळजळ, जखम व व्रण भरण्यासाठी भोकरीचे फळ उपयुक्त आहे. सांधेदुखी, घशाची जळजळ यासाठीही भोकरीचे फळ उपयोगी आहे. फळे शोथशामक असल्याने खोकला, छातीचे रोग, गर्भाशय व मूत्रमार्गाचे रोग तसेच प्लिहेच्या रोगात भोकरीची फळे वापरतात.
🌳 आहारातील महत्त्व
भोकर या झाडाचा उपयोग आहारात खूप मोठ्या प्रमाणावर होतो. या झाडाच्या पानांची भाजी खूप छान लागते. याच्या फळांची भाजी सुद्धा खूप छान लागते. याच्या फळांचे लोणचे केले जाते. हे लोणचे खूप चविष्ठ असतें.

🌳 अभिप्राय
अशा प्रकारे हा वृक्ष बहु्गुणी आहे, प्रत्येकाने याचे एक झाड आपल्या शेतामध्ये लावलेच पाहिजे. नागर फाउंडेशनने या झाडाचे संवर्धन करण्याचा ध्यास घेतला आहे, जर या झाडाचे रोपे किव्वा बिया कोठे असतील तर आमच्याशी संपर्क करा.
मला भोकराचे रोप मिळेल का