कापूस लागवडीसाठी ठिबकचा वापर करा आणि अधिक उत्पादन मिळवा!
1 min read🌱 राज्यात नव्हे तर, देशात सर्व पिकांमध्ये सर्वात जास्त ठिबक सिंचनाचा वापर कापूस पिकासाठी होत आहे. महाराष्ट्रात कापूस पिकासाठी 5.28 लाख हेक्टर क्षेत्रावर ठिबक सिंचनाचा वापर होत आहे. कापूस पिकामध्ये ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे.
🌱 जैन इरिगेशनने कापूस पिकासाठी ठिबक सिंचनाचा वापर 1995 पासुन सुरू केला. कापूस पंढरी जरंडी, ता. सोयगाव, जिल्हा औरंगाबाद, अंतुर्ली, ता. पाचोरा, करंज, ता. जि. जळगाव येथून सुरूवात करण्यात आली. त्याकरीता प्रचार, प्रसार सुरू केला. त्यावेळी तिन्ही ठिकाणी कापूस पिकाचे जैन ठिबकवर अनुक्रमे एकरी 19, 17, आणि 20 क्विंटल उत्पादन मिळाले होते.
🌱 कापूस लागवडीच्या अंतरामध्ये तसेच लागवड काळात बदल करून जमीनीत बशीच्या आकाराचा ओलावा ठिबक सिंचन संच फक्त 10 ते 15 मिनिटे चालवून तयार करून त्यात कापसाचे एकच बी टोकण पद्धतीने लागवड करून उत्कृष्ठ उगवण होण्यास मदत झाली. ठिबक सिंचनाने कापूस पिकास त्याच्या गरजेनुसार, अवस्थेनुसार प्रत्येक झाडास सारखे पाणी दिले. त्या सोबत खते ही ठिबक मधून दिली होती. त्यावेळी बीटी तंत्रज्ञान नव्हते. ठिबक सिंचनाला सन 2002 मध्ये बोलगार्ड तंत्रज्ञानाची जोड मिळाली. जणू काही दूग्ध शर्करा योग घडून आला.
🌱 कापूसमधील ठिबक सिंचनाचे निष्कर्ष आश्चर्यकारक आहेत, ठिबकवर बऱ्याच शेतकऱ्यांनी एकरी 15 ते 20 क्विंटल उत्पादन घेतलेले आहे. म्हणून कापसाचे अधिक उत्पादन घेण्यासाठी कापूसमध्ये ठिबक सिंचनाचा अवलंब करणे आवश्यक आहे. ह्यात फक्त मानसिकता बदलण्याची गरज आहे.
❇️ थिंक आऊट ऑफ बॉक्स
विचारांच्या पलीकडे विचार केला पाहिजे. आपल्या देशात ठिबक सिंचन तंत्रज्ञानाचे वय 35 वर्षांपेक्षा जास्त आहे.
💧 कापूस पिकामध्ये ठिबक सिंचन तंत्रज्ञानाचे फायदे
कापूस पिकाच्या उत्पादनात भरीव वाढ होते.
💧 कापसाची प्रत, गुणवत्ता सुधारते.
💧 पात्या, फुलांची गळ कमी होते.
💧 कापूस पिकास पाण्याचा अजीबात ताण पडत नाही.
💧 ठिबकमधून पाण्यात विरघळणारी खते देता येते. त्यामुळे खतांच्या वापरात बचत होते.
💧 कापसाची बोंडे चांगली पोसली जाऊन वजनदार झाल्याने उत्पादन अधिक मिळते.
💧 पाणी, खते, वीज आणि मजुरांची बचत होते.
💧 मुळांच्या कार्यक्षेत्रामध्ये नेहमीच वाफसा ठेवता येत असल्याने पाणी आणि खतांची कार्यक्षमता वाढते.
💧 कापूस पिकाखाली भारतात 123.5 लाख हेक्टर क्षेत्र आहे. जगातील एकूण कापूस क्षेत्राच्या सुमारे 33 टक्के क्षेत्र आपल्या देशात आहे.
💧 भारतातील कापसाची उत्पादकता फक्त 469 किलो रूई प्रति हेक्टर आहे.
👉 ठिबक सिंचन तंत्रज्ञानाचा वापर करून कापसाची उत्पादकता वाढवता येते हे सिद्ध झाले असुन, हा प्रवास 37 वर्षाचा आहे. गेल्या 18-20 वर्षापासून कापूस पिकामध्ये ठिबकचा वापर दरवर्षी वाढताना दिसत आहे.
👉 महाराष्ट्र, गुजरातमध्ये कापूस पिकात ठिबक सिंचनाचे आश्चर्यकारक परिणामांमुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर त्याचा स्वीकार केला आहे. कापूस पिकासाठी महाराष्ट्रात 5.28 लाख हेक्टर व गुजरातमध्ये 3.87 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये ठिबकचा वापर होत आहे. मध्य प्रदेशमध्येही कापूस पिकामध्ये ठिबकचा वापर वाढत आहे.
👉 आपल्या देशात कापसाची लागवड उत्तर, मध्य आणि दक्षिण अशा तीन विभागामध्ये केली जाते. उत्तर विभागात पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांमध्ये कापसाची लागवड केली जाते. त्तर या विभागातील मध्ये कापसाची लागवड 90-95 टक्के बागायती असुन, मोकाट सिंचन पद्धतीवर घेतले जाते,
👉 मध्य विभागात कापूस मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र राज्यात घेतला जातो. मध्य विभागात मध्यप्रदेश व गुजरात राज्या मध्ये 40 ते 42 टक्के बागायती कापूस आहे, महाराष्ट्रात फक्त 5-10 टक्के बागायती कापूस आहे.
👉 दक्षिण विभागात तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडूमध्ये कापूस लागवड केली जाते. ओडिशामध्ये 1.75 लाख हेक्टर क्षेत्रातही याची लागवड केली जाते.
👉 भारतातील सर्व कापूस उत्पादक राज्यांमध्ये ठिबक सिंचनाचा अवलंब करणे आवश्यक आहे.
ठिबक सिंचनाखाली कापसाचे उत्पादन जगातील कापसाच्या उत्पादनापेक्षा (791 किलो रूई प्रति हेक्टर) जास्त आहे.
👉 महाराष्ट्रात शेतकरी प्रति एकर 15-20 क्विंटल (40-50 क्विंटल/हेक्टर) कापसाचे बंपर उत्पादन घेत आहेत.
👉 ठिबकमुळे शेतकऱ्यांना कापसाचे अधिक उत्पादन मिळण्यास मदत होत आहे.
Good
Nice sir