krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

रासायनिक खतांमधील ‘भेसळ’ ओळखायची कशी?

1 min read
पिकांच्या चांगल्या उत्पादनासाठी आणि जमिनीची सुपीकता (Soil fertility) वाढविण्यासाठी शेतकरी रासायनिक खतांचा (Fertilizer) वापर करतात. खरं तर सुपीक जमिनीमध्ये पुन्हा पुन्हा पिकांचे (Crop) उत्पादन घेतल्यामुळे जमिनीची सुपीकता (उत्पादन क्षमता) हळूहळू कमी होऊ लागते. म्हणूनच जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी वेळोवेळी माती परीक्षण (Soil testing) करायला पाहिजे.

🌱 सरकारने सुद्धा मृद आरोग्य पत्रिकेच्या (Soil health card) माध्यमातून मातीमध्ये किती प्रमाणात पोषक घटक आहेत?
🌱 त्यांच्यात काय कमी आहे?
🌱 कोणते खत कसे आहे?
🌱 त्यांची गुणवत्ता व क्षमता कशी वाढवावी?
याबाबत शेतकऱ्यांना माहिती देणे सुरू केले आहे. जमिनीचे आरोग्य (Soil health), पिकांची उत्पादकता (Crop productivity)) आणि उत्पादन खर्च (Production costs) या बाबी लक्षात घेता ही माहिती शेतकऱ्यांनी जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

❇️ आजपासून चार ते पाच दशकापूर्वी जमिनीची सुपीकता खूप जास्त होती, त्यामुळे योग्य व पुरेसे प्रमाणात पिकांना पोषकद्रव्ये (Nutrients) मिळत होती. परंतु, आता अधिक उत्पादन देणार्‍या जाती आणि अयोग्य माती व्यवस्थापनामुळे मातीची प्रजनन क्षमता (Soil fertility) कमी होण्यास सुरुवात झाली आहे. पिकास कोणत्या प्रकारची खते आवश्यक आहेत? त्यांचे गुणधर्म काय आहेत? आणि त्याची उत्पादन क्षमता कशी वाढवायची याविषयी संपूर्ण माहिती दिली आहे. याचा शेतकर्‍यांना फायदा होऊ शकेल.

❇️ पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी आवश्यक अन्नद्रव्ये
💦 प्रमुख अन्नद्रव्ये (Main Nutrients)
🌱 नत्र (Nitrogen) (N2)
🌱 स्फुरद (Phosphorus) (P2O5)
🌱 पालाश (Potassium) (K+)
💦 दुय्यम अन्नद्रव्ये (Secondary nutrients) :-
🌱 कॅल्शियम (Calcium) (Ca2+),
🌱 मॅग्नेशियम (Magnesium) (Mg2+)
🌱 गंधक (Sulfur) (SO42)
💦 सूक्ष्म अन्नद्रव्ये (Micronutrients) :-
🌱 लोह (Iron) (Fe+)
🌱 मँगेनीज (Manganese) (Mn2+)
🌱 कॉपर (Copper) (Cu+)
🌱 झिंक (Zinc) (Zn2+)
🌱 बोरॉन (Boron) (H3BO3)
🌱 मॉलिब्डेनम (Molybdenum) (MoO42)
🌱 क्लोरिन (Chlorine (Cl-)
🌱 निकेल (Nickel) (Ni2+)

❇️ मुख्यतः नत्राचा पुरवठा करण्यासाठी युरिया (Urea), स्फुरदचा पुरवठा करण्यासाठी डीएपी (Di-ammonium Phosphate), एसएसपी (Single Super Phosphate) किंवा एनपीके (Nitrogen-Phosphorus-Potassium) आणि पालाशचा पुरवठा करण्यासाठी एमओपी (Muriate of Potassium) किंवा एनपीकेचा वापर केला जातो. तसेच जस्त (Zinc)चा पुरवठा करण्यासाठी झिंक सल्फेटचा (Zinc sulphate) वापर केला जातो.

❇️ खतांची गुणवत्ता खालीलप्रमाणे तपासली जाऊ शकते
💦 युरिया (Urea)
हा पांढरा रंगाचा चमकदार असतो, यात सामान आकाराचे गोल दाणे असतात. हा पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळतो. पाण्यात विरघळलेल्या द्रावणाला स्पर्श केल्यास थंड लागते. युरियाचे दाणे उन्हात जमिनीवर ठेवल्यास ते वितळतात आणि जास्त उन्हात युरियाचे कोणतेही अवशेष राहत नाहीत.

💦 डीएपी (Di-ammonium Phosphate)
डीएपीचे दाणे कठोर, भुरे, काळे किंवा बदामी रंगाचे असतात. डीएपीची गुणवत्ता ओळखण्यासाठी काही दाण्यांना हातात घेऊन त्यात थोडा चुना मिसळून तंबाकू सारखे रगडल्यावर तीव्र गंध तयार होतो. ज्याचा वास घेणे खूप कठीण असते. याव्यतिरिक्त डीएपीच्या काही दाण्यांना फरशीवर रगडल्यावर ते तुटत नाहीत. डीएपीच्या दाण्यांना तव्यावर हळुवार गरम केल्यास ते दाणे फुगतात.

💦 एसएसपी (Single Super Phosphate)
एसएसपीचे दाणे कठोर, दाणेदार, भुरे, काळे आणि बदामी रंगाचे असतात. हे खत पावडरच्या स्वरूपात देखील उपलब्ध असते. एसएसपी या दाणेदार खताचा मुख्यतः डीएपी आणि एनपीके या मिश्र खतांसारखाच वापर केला जातो.

💦 एमओपी (Muriate of Potassium)
एमओपी हे पांढर्‍या रंगाच्या मिठासारखे आणि लाल मिरचीच्या मिश्रणासारखे असते. याचे दाणे ओलसर केल्यावर एकमेकांना चिटकत नाहीत. हे खत पाण्यात विरघळल्यावर या खताचा लाल भाग पाण्यावर तरंगतो.

💦 झिंक सल्फेट (Zinc sulphate)
झिंक सल्फेट या खतात मॅग्नेशियम सल्फेटचे (Magnesium sulphate) प्रमुख मिश्रण असते. भौतिक रूप समानतेमुळे या खताची ‘नकली असली’ची ओळख करणे खूप कठीण असते. या खताच्या गुणवत्ता तपासण्यासाठी याच्या मिश्रणात डीएपीचे मिश्रण मिसळल्यावर दाट द्रावण तयार होते. मॅग्नेशियम सल्फेट सोबत असे होत नाही. याशिवाय, झिंक सल्फेटच्या मिश्रणात पातळ दाहक सोडा मिसळल्यावर पांढरे, फिकट तपकिरी द्रावण तयार होते. यात घट्ट दाहक मिसळल्यावर द्रावण पूर्णपणे मिसळून जाते. जर झिंक सल्फेट ऐवजी मॅग्नेशिम सल्फेट घेतले तर द्रावण विरघळत नाही.

❇️ खतांचा योग्य वापर आणि अधिक उत्पादनासाठी योग्य वेळी संतुलित प्रमाणात खतांचा वापर करणे खूप आवश्यक आहे. प्रयोगानुसार पिकास जास्तीत जास्त उत्पादन आणि पोषक तत्वांचा धोका कमी करण्यासाठी आपल्याला खतांची उपयोग क्षमता वाढवणे आवश्यक आहे. खते वापरण्याची क्षमता वाढविण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवा.

❇️ खतांची योग्य निवड
🌱 माती परीक्षणानुसार खत नियोजन करावे. मातीमध्ये ज्या अन्नद्रव्याची कमतरता (Nutrient deficiency) असेल, त्याच अन्नद्रव्यासाठी खत नियोजन करावे.
🌱 नत्राचा पुरवठा करण्यासाठी निम कोटेड युरियाचा (Nim coated urea) वापर करावा.
🌱 मातीमध्ये स्फुरद कमतरता असल्यास पाण्यात विरघळणार्‍या स्फुरदयुक्त खतांचा वापर करावा.
🌱 कमी कालावधीच्या पिकांना त्वरित अन्नद्रव्य उपलब्ध होण्यार्‍या खतांचा आणि जास्त कालावधीच्या पिकांना हळू-हळू अन्नद्रव्य उपलब्ध होतील, अशा खतांचा वापर करावा.
🌱 जास्त कालावधीच्या पिकांना साइट्रेट (Citrate) विरघळणारे तर कमी कालावधीच्या पिकांना फॉस्फेटिक (Phosphatic) खतांचा वापर करावा.
🌱 शेतात कोणते पीक घेणार आहात, त्याआधी त्या शेतात कोणते पीक घेतले होते तसेच त्या पिकात कोणत्या खतांचा किती प्रमाणात वापर केला गेला होता. या गोष्टींचा विचार करून खतांचे नियोजन करावे.
🌱 ओलावा कमी असणार्‍या जमिनीत नायट्रेटयुक्त किंवा नायट्रोजनधारी खतांचा तर सिंचन आणि उच्च पर्जन्य भागात अमोनिकल किंवा अमाईडयुक्त नायट्रोजनधारी खतांचा वापर करावा.
🌱 ओलसर भागात कॅल्शियम तसेच मॅग्नेशियमयुक्त खतांचा वापर करावा. कारण अशा भागात मातीत याची कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची कमतरता असते.
आम्लयुक्त (Acidic) जमिनीत क्षार प्रभाव पसरवणारे नायट्रोजन युक्त खतांचा वापर करावा. तसेच फॉस्फरसच्या पुरवठ्यासाठी फॉस्फेटिकयुक्त मिश्रणाचा वापर करावा.
🌱 वाळूयुक्त (Sandy) जमिनीत जैविक खतांचा अधिकाधिक वापर करा जेणेकरून अन्नद्रव्याचे पोषण होऊन कमीत कमी प्रमाणात नुकसान होईल तसेच अशा जमिनीत नायट्रोजनयुक्त खतांचा वापर करून फवारणी करावी. चिकणी जमिनीत जास्त प्रमाणात जैविक खतांचा वापर केला पाहिजे.

❇️ खतांचा वापर कधी आणि कसा करावा
🌱 शेणखत, कंपोस्ट खत, हिरव्या खतासारखे सेंद्रिय खते पीक पेरणीपूर्वी शेतात चांगल्या प्रकारे मिसळून द्यावे.
🌱 फॉस्फेटिक आणि पोटॅशिक खतांची पूर्ण मात्रा पीक पेरणीच्या वेळी शेतात चांगल्या प्रकारे जमिनीत मिसळून द्यावे.
🌱 नायट्रोजन, फॉस्फेटिक आणि पोटॅशिक ही खते पेरणीच्या वेळी शेतात 3 ते 4 से.मी. खाली आणि 3 ते 4 सेंमी बाजूला दिले पाहिजे. तसेच फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि जस्त या खतांना नेहमी पिकांच्या मुळांजवळ द्यावे.
🌱 खतांना मिश्रणाच्या स्वरूपात उभ्या पिकात फवारणी केल्यास, नायट्रोजन, वायुवीजन, स्थिरीकरण, डिनायट्रिफिकेशन इत्यादीद्वारे होणार्‍या नुकसानापासून वाचविले जाऊ शकते.

❇️ खतांचे प्रमाण
धान (भात) (Paddy) आणि गहू (Wheat) या पिकांसाठी
🌱 जर गहू पिकाच्या शिफारशीनुसार खतांची मात्रा दिली असेल तर धान पिकाच्या पुढील पेरणीसाठी फॉस्फरस आणि पोटॅश या खतांची मात्रा देऊ नये.
धान पिकासाठी निमकोटेड आणि जस्तकोटेड नायट्रोजनयुक्त खतांचा वापर करावा.
🌱 रबी पीक पेरणीआधी शेतात हिरव्या (हिरवळीचे खत) खतांचे पीक घेतले गेले असेल आणि वेळेवर पीक जमिनीत गाडली गेले असतील तर रबी पिकांच्या पेरणीवेळी नत्राची मात्रा प्रति हेक्टरी 40 किलोने कमी करावी.
🌱 जर शेतात शेणखत किंवा कंपोस्ट वापरले गेले असेल, तर पुढील पिकासाठी नंतर 5 किलो, स्फुरद 2.5 किलो आणि पालाश 2.5 किलो प्रती टन या प्रमाणात नत्र, स्फुरद आणि पालाशच्या मात्रेत कमी द्यायला हवे.
🌱 पिकाची योग्य वेळेत पेरणी केल्यास खतांची उत्पादन क्षमता वाढत असते.
🌱 पिकातील दोन ओळीतील अंतर आणि दोन रोपातील अंतर योग्य ठेवल्यास खतांचा योग्य आणि जास्त पुरवठा होतो.

4 thoughts on “रासायनिक खतांमधील ‘भेसळ’ ओळखायची कशी?

  1. हे माहिती शेतकऱ्यांसाठी गरजेची आहे पण इथे जी माहिती दिली आहे तिथे फक्त कोणत्या जमिनी ला कोणते खत दिले पाहिजे किती प्रमाणात दिले पाहिजे आणि कोणत्या जमिनीला किती प्रमाणात पाहिजे फक्त हेच दिले आहे पण कीटक नाशके यांच्याबद्दल काही पण माहिती दिला नाही‌ आणि कोणत्या कीटक नाशकाणि जमिनीला धोका धोका नाही आणि या किटक नाशकांचा वापर करून उलटा नुकसान होऊ शकतो याची काळजी कशी घ्यावी हे सुद्धा तितकेच गरजेचे आहे म्हणून कृपया याबद्दल पण शेतकऱ्यांना बरे ची माहिती द्यावी

  2. हे माहिती शेतकऱ्यांसाठी गरजेची आहे पण इथे जी माहिती दिली आहे तिथे फक्त कोणत्या जमिनी ला कोणते खत दिले पाहिजे किती प्रमाणात दिले पाहिजे आणि कोणत्या जमिनीला किती प्रमाणात पाहिजे फक्त हेच दिले आहे पण कीटक नाशके यांच्याबद्दल काही पण माहिती दिला नाही‌ आणि कोणत्या कीटक नाशकाणि जमिनीला धोका धोका नाही आणि या किटक नाशकांचा वापर करून उलटा नुकसान होऊ शकतो याची काळजी कशी घ्यावी हे सुद्धा तितकेच गरजेचे आहे म्हणून कृपया याबद्दल पण शेतकऱ्यांना बरे ची माहिती द्यावी

  3. प्रिय सुनील, आपण या विषयातील एक अधिकारी तज्ञ व्यक्ती आहात. आपले लेखन नियमित वाचत असतो. आपले लेखन ही काळाची गरज आहे. अनंत शुभेच्छा
    – गजानन जानभोर

  4. वरील माहिती शेतकरी वर्गासाठी अंत्यत उपयुक्त माहिती आहे.शेतकऱ्यांनी वरील माहितीप्रमाणे खतांचे नियोजन केल्यास नक्कीच उत्पन्नात लाभ होऊ शकेल.अशी खात्री वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!