HTBT कपाशी, BT वांग्याच्या परवानगीचा लढा सुरूच ठेवावा लागेल
1 min readशेतकरी संघटनेच्या प्रदीर्घ लढ्याला मिळालेले हे यश आहे. त्याचे स्वागतच करायला हवे. जीएम पिकांकडे (GM Crop) पाहण्याच्या सरकारच्या दृष्टीकोनात बदल झाला, ही चांगली बाब आहे. पण, ही परवानगी नेमकी कशी आहे? कोणते वाण नियंत्रणमुक्त केले? हे कार्यकर्त्यानी समजून घेणे आवश्यक आहे.
या पत्रानुसार SDN-1 व SDN-2 या जीएम तंत्रज्ञानाने तयार झालेल्या पिकांनाच परवानगी देण्यात आलेली नाही. SDN म्हणजे Site-Directed Nuclease तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानात त्या पिकाच्या स्वतःच्या गुणसूत्रांत बदल केला जातो. दुसर्या जिवाणू मधील जीन ( जनुक ) त्या पिकात टाकला जात नाही. BT कापसात मातीतील बॅक्टेरिया कपाशीच्या गुणसूत्रांत टाकलेला आहे. HTBT (Herbicide Tolerant Bacillus Thuringiensis) कपाशी किंवा BT (Bacillus Thuringiensis) वांगी SDN श्रेणींत येत नाहीत.
SDN-1 मध्ये फक्त नको असलेल्या जीन (Gene) काढून टाकले जातात किंवा कमजोर केले जातात. SDN-2 मध्ये नको असलेला जीन कमजोर करुन त्याला हवा त्या पद्धतीने दुरुस्त करण्यासाठी एक टेम्पलेट (Template) टाकले जाते. याला CRISPR (Clustered regularly interspaced short palindromic repeats) तंत्रज्ञान म्हटले जाते. भरतात अनेक पिकांवर या तंत्रज्ञानाचा वापर करून संशोधन सुरू आहे. मात्र, अद्याप वाण तयार होऊन जाती तयार झालेल्या नाहीत.
केंद्र शासनाने दिलेल्या परवानगीचा फायदा HTBT कापूस किंवा BT कपाशीसाठी होणार नाही. त्यासाठी आपला लढा सुरुच ठेवावा लागेल, याची जाणीव शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पार्टीच्या कार्यकर्त्यांना असावी.
Htbt kapas nu biyaran levu che saheb….contek no…
बोंड अळी वर लवकर उपाय शोधून काढला पाहिजे नाही तर मराठवाड्यातील व विदर्भात कोरडवाहू शेतकरी आणखी कर्ज बाजारी होईल तरी पण लवकर लवकर नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा ही विनंती एक शेतकरी.