‘ड्रोन’ भारतीय शेती क्षेत्रातील क्रांतिकारी बदल
1 min read फवारणी करताना विषबाधा
शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी दोन दशकांपूर्वी शेतीमध्ये विनावाहक विमानांचा (Unmanned Aircraft) वापर करणे गरजेचे असल्याचे सांगितले होते. ऑक्टोबर 2017 मध्ये धुळ्यात तर नोव्हेंबर 2017 मध्ये यवतमाळ जिल्ह्यात कपाशी (Cotton) व इतर पिकांची फवारणी (Crop Spraying) करताना विषबाधा (Poisoning) होऊन 50 च्या शेतमजुरांचे बळी (Death) गेल्यानंतर शेतकरी संघटनेने फवारणीसाठी ड्रोन (Drone for Spraying) वापराच्या परवानगीसाठी मागणी केली होती.
सरकारचे सकारात्मक धोरण
या घटना आणि शेतकरी संघटनेच्या मागणीनंतर केंद्र सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने (Ministry of Civil Aviation) ड्रोन विषयक धोरण (Drone Policy) जाहीर केले. या ड्रोन धोरणानुसार कृषी (Agriculture), आरोग्य (Health), नैसर्गिक आपत्ती (Natural Disasters), संकटकाळी मदत (Crisis Relief) या क्षेत्रात मानवरहित विमानाचा (Unmanned Aircraft) (ड्रोन-Drone) व्यावसायिक वापर (Commercial Use) 1 डिसेंबर 2018 पासून करण्यास परवानगी दिली. यासाठी ड्रोनची नोंदणी (Registration of Drones) करणे आवश्यक आहे. या नोंदणीनंतर ‘ड्रोन युनिक आयडेंटिटी नंबर’ (Drone Unique Identity Number) दिला जातो. या ड्रोनच्या वापरासाठी प्रत्येकाच्या वेळेस उड्डाणासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. हा परवाना एका ‘अँप’वर (App) मिळणार आहे. संबंधित सर्व परवानग्यांसाठी ‘डिजिटल स्काय’ (Digital Sky) हे अँप डिसेंबरपासून कार्यरत करण्यात आले. ड्रोन चांगली दृश्यमानता (Visibility) असलेल्या ठिकाणी फक्त दिवसा उडवता येणार आहे. ड्रोन 400 फूट उंचीपर्यंत उडवता येतील. ते 450 मीटर अंतरापर्यंत मध्ये ‘रिटर्न टू होम टेक्नॉलॉजी’ (Return to Home Technology) असेल. चुकून ड्रोन भरकटले तर ते आपोआप परत येऊ शकेल. सध्या बाजारात पाच प्रकारचे ड्रोन उपलब्ध आहेत.
ड्रोनचे प्रकार व वापर
🌱 नँनो ड्रोन (Nano Drone) :- या ड्रोनचे वजन ग्रामपेक्षा कमी असते. हे मुख्यतः खेळणे म्हणुन वापरतात.
🌱 मायक्रो ड्रोन (Micro Drone) :- या प्रकारातील ड्रोन दोन किलो वजनाचे असते. नँनो ड्रोन व मायक्रो ड्रोन उडवण्यासाठी परवानगीची व नोंदणीची गरज नाही. बंद जागेत हे ड्रोन 50 फुटांपर्यंत उडवता येतील. 200 फुटांपेक्षा जास्त उडवण्यासाठी जवळच्या पोलिसांना माहिती द्यावी लागते. या प्रकारच्या ड्रोनचा वापर ‘एरियल फोटोग्राफी’साठी (Aerial Photography) मोठ्या प्रमाणात केला जातो.
🌱 स्मॉल ड्रोन (Small Drone) :- या ड्रोनची भार वहनक्षमता 25 किलोपर्यंत असते. त्याची बाजारातील किंमत दोन लाख 23 लाख रुपयांपर्यंत आहेत. भारतीय शेतीत हे ड्रोन मोठ्या प्रमाणात वापरले जाते.
🌱 मिडीयम ड्रोन (Medium Drone) :- हे ड्रोन 150 किलोपर्यंत वहन क्षमता असणारे आहेत.
🌱 लार्ज ड्रोन (Large Drone) :- या ड्रोनची क्षमता 150 किलोपेक्षा अधिक असते. ही छोटी विमानेच असतात.
🌱 मीडियम व लार्ज ड्रोनचा व्यावसायिकदृष्ट्या वापर केल्या जातो. भारतीय शेतीच्या वापरासाठी स्मॉल ड्रोन मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरणार आहे.
ड्रोन उडवण्यासाठी लागणारी पात्रता
ड्रोन उडवण्यासाठी ते उडवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. हा परवाना मिळवण्यासाठी वयाची 18 वर्षे पूर्ण असले पाहिजे. शैक्षणिक पात्रता किमान दहावी पास व इंग्रजीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ड्रोन चालवणे हे ‘रिमोट कंट्रोल’ची (Remote Control) कार (Car) चालवण्याइतके सोपे असणार आहे.
रोजगार निर्मिती
शेतीतील ड्रोनच्या वापरामुळे ग्रामीण भागात नवीन रोजगार (Employment) मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. भारतीय शेतीमध्ये सर्वात मोठी समस्या ही मजुरांची (Laborer) कमतरता आहे. भारतात जनुकीय तंत्रज्ञान (Genetic Technology) फारसे विकसित नसल्याने कीड व रोगांना प्रतिबंध (Prevention of Pests and Diseases) करण्यासाठी घातक व विषारी औषधांची (Pesticides, Insecticides) फवारणी (Spyaing) करावी लागते. ही औषधे मानवी शरीरास घातक परिणाम करत असल्याने फवारणीसाठी ड्रोनला परवानगी देण्याची मागणी शेतकरी संघटना सातत्याने लावून धरत होती. या नव्या ड्रोन पॉलिसीने भारतीय शेतीत नव्या तंत्रज्ञानाचा मोठा वापर होणार आहे. शेतीत ड्रोनचा वापर फक्त फवारणी पुरता न राहता तो अमर्याद असणार आहे. जसाजसा ड्रोनचा वापर वाढेल तसे तसे कामांच्या संख्येतही वाढ होणार आहे. देखरेखीपासून फवारणीपर्यंत असंख्य कामे ड्रोनद्वारे केली जातील. कॅमेऱ्याद्वारे पिकांची पाहणी, किटकनाशकांची फवारणी, पिकांवरील कीड-रोगांची पाहणी (Survey of Crop Pests), क्षेत्रफळ पाहणी (Area Survey), जमिनीची तपासणी (Land Inspection), खतांची फवारणी (Fertilizer Spraying), नुकसानग्रस्त भागाची पाहणी (Inspection of Damaged Area) यासह शेतीतील अनेक कामे या ड्रोन द्वारे केली जातील. ड्रोनचा वापर भारतीय शेतीत नवी क्रांतीचे पहिले पाऊल आहे.
Information about flying of drone,and cost of training.
२लाख से २३लाख तक होती है।
Information about flying of drone,and cost of training.
9223299632. Pls share ur no on this no. We will give u complete details about it.
Pls call or share ur no on 9223299632. We willl give u complete details about agree drone.
इसकी कीमत क्या है
Nice send information of good company drone on my whats app no 9422871738