krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

करडईचं तेल भारताचं सोनं आणि महासत्तेचा मार्ग

1 min read
Oil : आज जगावर युद्धाची छाया आहे. महासत्ता असलेला रशिया आणि अमेरिका एकमेकांच्या जीवावर उठले आहेत. याचे साधे कारण त्यांचे अर्थकारण आणि खनिज तेलावर हुकूमत मिळवणे हे आहे...

आखाती देशात अमेरिकेने जे जे काही केले त्याच्या मुळाशी पेट्रोल (Petrol) हेच होते. हे दोन्ही देश तेल साठ्यांसाठी काहीही करायला तयार आहेत. आता प्रश्न आमचा! आपल्याकडे तेलाचे साठे नाहीत. त्यामुळे आम्हीं केवळ जागतिक भिकारी झालो आहोत दुसरे काही नाही.

130 कोटी लोकांची हक्काची बाजारपेठ असताना आम्ही नुसत्या आयातीचा धडाका लावलेला आहे. जो थोडाफार ‘जीडीपी’ (GDP-Gross Domestic Product) दर टिकून आहे तो केवळ कृषी क्षेत्रामुळे (Agricultural Sector) आहे. अर्थातच यात शेतकरी बांधवांचे योगदान मोठे आहे. असे असताना दरवर्षी मानवी आरोग्याला घातक ठरणारे पामतेल (Palm Oil) आयात (Import) करून येथील कृषीपूरक तेल उद्योग व व्यापार (Oil Industry and Trade) आणि त्यावर अवलंबून असणारे लघु उद्योग (Small Scale Industry) आम्हीं रसातळाला घातली आहे.

दरवर्षी 95 हजार कोटीच्या आसपास आम्हीं हे मानवी आरोग्याला घातक ठरणारे पामतेल (Palm Oil) आयात (Import) करत आहोत. दरवर्षी फक्त तेलाचा विचार करू या! एवढा पैसा जरी आपल्या शेतकरी बांधवांच्या अर्थव्यस्थेत मुरला तरी त्यात केवळ शेतकऱ्यांचेच नव्हे तर देशाच्या समृद्धीचे गणित सामावलेले आहे..केवळ स्वस्त मिळते म्हणून आम्हीं हे घातक ते आयात करण्याचा मूर्खपणा का करतो आहोत? याचाही विचार केला पाहिजे.

सर्वात महत्वाचे म्हणजे तेल निर्मितीसाठी (Oil Production) म्हणजेच तेलबिया उत्पादनासाठी (Oil Seed Production) आपणांस कोरडवाहू क्षेत्र लागते. आजही आपल्या महाराष्ट्रात 83 टक्के शेतजमीन कोरडवाहू आहे.

बागायती जमीनधारक साखर कारखाने (Sugar industry) चालवतील. ते त्यांचे पाहून घेतील. साखर कारखानदारी तरी काय साखर नावाचे पांढरे विषच निर्माण करीत आहे. साखरेचा तुटवडा (Sugar Shortage) निर्माण झाला तर लोकं काही तडफडून मारणार नाहीत. तरीही कोट्यवधी रुपयांचा चुराडा साखर कारखान्यांवर केला जात आहे.

दुसरीकडे, कोरडवाहू क्षेत्रावर अन्यायच केला जात आहे. कोरडवाहू क्षेत्र हे तेलबिया उत्पादन व तेल उद्योगासाठी वरदान ठरू शकते. नव्हे तर, एकेकाळी ही आपल्या देशाची मोठी ताकत होती. पण, आम्हीं त्याचा कधीच विचार केला नाही आणि आज ही करत नाही.

नुसती करडईच (Safflower) नव्हे तर तीळ (Sesame), मोहरी (Mustard), भुईमूग (Groundnut), सूर्यफूल (Sunflower), जवस (Linseed) या आरोग्यवर्धक तेलबिया व त्यापासून खाद्यतेलाचे (Edible Oil उत्पादन जरी आम्हीं देशात वाढवले तसेच या पामतेलाची आयात बंद केली तर एक जागतिक महासत्ता बनण्याच्या दिशेने भारताची किमान वाटचाल तरी सुरू होऊ शकते.

ग्रीन ऑईल पॉवर (Green Oil Power) म्हणून भारत जगाच्या क्षितिजावर येऊ शकतो. यात महत्त्वाचे म्हणजे याला आपल्याच देशाची बाजारपेठ उपलब्ध आहे. आपल्याला कुणाच्या दारात जाऊन विक्रीसाठी हात पसरण्याची गरज नाही. आपल्या सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही आपला पारंपरिक खाद्यतेल उद्योग परत उभा राहिला पाहिजे.

कोरडवाहू शेतकऱ्यांनी सामूहिक शेतीचा आधार घेत हजारो एकर शेतीवर करडईचे उत्पादन घेऊन आपल्याच शेतमालावर प्रक्रिया करणारे तेल कारखाने उभारण्याची खूप गरज आहे. गावोगावी परत तेल घाणे जिवंत झाले पाहिजेत. खाद्यतेल ही आजही आपली फार मोठी ताकत आहे.

सरकारने या पामतेलाच्या माध्यमातून खाद्यतेलातील भेसळीला सरळ सरळ परवानगी दिली आहे. तुम्हीं चार पैसे जास्त देऊन जरी करडई, जवस अथवा शेंगदाना तेल विकत घेतले तरी त्यात पामतेल मिक्स केले जात आहे. हा सरकारने लोकांच्या आरोग्याशी खेळणारा किळसवाणा व जीवघेणा प्रकार ही ताबडतोब बंद केला पाहिजे. आपला भारत देखील GREEN OIL POWAR बनू शकतो. फक्त तरुण पिढीने आपल्या डोळ्यावरची झापडं उघडली पाहिजे.

6 thoughts on “करडईचं तेल भारताचं सोनं आणि महासत्तेचा मार्ग

  1. करडई वगैरे सर्व काही करू शकतो शेतकरी पण त्याला त्याप्रमानात दर मिळायला हवा…नाहीतर दुसऱ्याचे आरोग्य सांभाळता सांभाळता स्वतःचे आयुष्य उद्धवस्त नाही झाले पाहिजे हे प्रत्येकाला वाटत असतं.
    उदा. आमच्याकडे बार्शीला गावरान ज्वारी नैसर्गिकरित्या पिकवतो मात्र;त्याला दर मिळतो 1600₹/qtl.
    गावरान वाण असेल तर उतार जरा कमीच येतो आणि दर मात्र कवडीलमोल ..

    1. छा न माहिती आहे
      विजय कराड साहेब तुमचा नंबर पाठवा.
      माझा नंबर 9372306798

  2. घाणा करडी तेल 220/- रूपये किलो दराने पुण्यात किरकोळीने मिळते,
    तर करडीला काय भाव मिळणार ?
    ते करडी पीक शेतकर्‍यांना परवडणार का?
    कृपया आर्थिक गणित मांडले तर सर्वांना माहीत होईल,

  3. मी करडई माझ्या शेतात पेरली आहे यावर्षी आणि इतरांनाही पेरण्यासाठी सांगितले आहे .आणि त्यांनी पेरली सुद्धा.

  4. खरच काळाची गरज आहे खाद्य तेल उत्पादनात आपण अग्रेसर झालो तरच भारत महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करेल
    सर मी BSc Agriculture पूर्ण केलेला मुलगा आहे मी नक्कीच या दिशेने वाटचाल करेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!