krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

शेळीपालनामध्ये लोकं अपयशी का होतात?

1 min read
Goat farming : शेळीपालक अपयशी होण्याची मी काही कारणं शोधली आहेत...

शेळीपालक अपयशी होण्याची मी काही कारणं शोधली आहेत…

🟢 माहितीचा अभाव, 

🟢 झटपट श्रीमंत होण्याचा शॉर्टकट, 

🟢 युट्युब (You Tube)वरील बोगस यशोगाथा,

🟢 उंटावरून शेळीपालन करणे

🟢 पैसा कुठेतरी गुंतवायचा म्हणून बकरी पालन करणे. 

डिग्री, डिप्लोमा, व अमाप पैसा असणारे तसेच काही रिटायर्ड झाल्यावर तर काही पारंपरिक पद्धतीने व काही संयम, जिद्द आणि चिकाटी असणारे अभ्यासू वृत्ती ठेवून या व्यवसायात येणारे शेळीपालक आहेत. आपल्या परिचयातील किंवा बाजूचा ओळखीतला कुणीतरी शेळीपालन करतो व चांगला पैसा कमवतो आहे. आपण जर हा व्यवसाय केला तर आपणही पैसा कमाऊ. कुणी नोकरी करणारे असतात तर कुणी धंदेवाईक असतो. कुणी शेतकरी असतो तर कुणी नोकरी मिळत नाही म्हणून शेळीपालन करतो.

यामध्ये तीन प्रकारचे लोकं मोडतात

🟢 एक माहिती असणारे, 

🟢 दुसरे काहीही माहिती नसनारे, 

🟢 तिसरे You Tube बघून शेळीपालन करणारे.

 हे लोकं आजूबाजूच्या शेळीपालकांना फोन करून अथवा प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन शेळीपालनाविषयी माहिती घेतात. ज्या ज्या फार्मवर हे लोकं भेटी देतात (अर्थात गावरान सोडून) त्या ठिकाणी यांचा ‘माईंड वॉश’ करण्याची कामे केली जातात. आपल्याकडे जी जात आहे, त्याबद्दलच अधिक भर देऊन माहिती सांगण्यात येते. बघायला जाणारी व्यक्ती चक्रावून जाते. त्याच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येऊ लागतात. कोणती ब्रीड घेतली तर आपल्याला फायदा होईल, काय केलं म्हणजे आपल्याला फायदा होईल, या विचारचक्रात गुरफटून ते शेवटी गावरान सोडून इतर जातीच्या शेळ्या घेतात आणि इथेच ते फसतात.

 त्यांना एकतर विस्तृत माहिती नसते. जर काही प्रॉब्लेम झाले तर ओळखीतल्या शेळीपालकाला माहिती विचारून ‘ट्रीटमेंट’ केली जाते. नाहीतर फक्त डॉक्टरच्या भरवशावर फार्म चालवल्या जाते. बरं यांचा फार्म गडी माणसाच्या भरवशावर असतो. बकरीला हगवण लागली की,  लगेच गडीमाणूस मालकाला फोन करणार. नाही दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेळेला तो मालकाला फोन करेल. तोपर्यंत आजार बळावतो आणि डॉक्टरला बोलवावे लागते. 

 ही मंडळी इकडून तिकडून माहिती गोळा करून शेळीपालनाला सुरुवात करतात. पण प्रत्यक्ष अनुभव काहीच नसते. त्यांना ना इंजेक्शन देता येत,  ना गोळी देता येत.त्यांचं वास्तव्य मोठ्या शहरात असते आणि ते शेळीपालन करतात खेडेगावात. राहतात मुंबईला आणि शेळीपालन करतात 700 किमीदूर असलेल्या एखाद्या जिल्ह्यातील खेड्यात. म्हणजे हे खऱ्या अर्थाने उंटावरून शेळीपालन करणारेच असतात. 

 काही लोकं बसल्या बसल्या मोबाईलवर युट्युबवर यशोगाथा बघतात. त्यांना वाटते की, बकरी पालन आपणही करू शकतो व लाखो रुपये कमावू शकतो. हे लोकं बकरी पालनामध्ये फसतात. माझ्या ओळखीतले बरेच लोकं आहेत, ते एकतर उंटावरून शेळीपालन करतात. पैसा भरपूर आहे म्हणून शेळीपालन करतात. नफा मिळाला नाही म्हणून दुसऱ्याच वर्षी शेडसहित शेळ्या विकून टाकतात. एवढेच नव्हे तर, बकरी पालन परवडत नाही असे सांगून बकरीला बदनाम करतात. वास्तवात, ही मंडळी गरज नसताना शेडवर लाखो रुपये खर्च करतात.

 स्वतः जर मेहनत करणारा असेल तर तो शेळीपालक कधीच तोट्यात जाणार नाही. बकरीला किंवा पिल्लाला जर हगवण लागली तर स्वतः लक्ष देणारा लगेच तिला औषध देईल. नाक जर ओले दिलेले तर लगेच सर्दीचे औषध देऊन टाकेल म्हणजे पुढचे येणारे धोके तो टाळू शकतो. आपला शेळीपालन व्यवसाय चांगल्या स्थितीत आणणे हे आपल्या हातात आहे. शेळी ही अशी जात आहे की,  ती आपल्या मालकाला कधीच उपाशी ठेवत नाही.

1 thought on “शेळीपालनामध्ये लोकं अपयशी का होतात?

  1. शेळीपालण कसे करावे म्हणजे ते यशस्वी होईल हे सांगणे महत्त्वाचे आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!