Cannabis Smuggling & Research : गांजा तस्करीत टॉप, संशोधनात मात्र फ्लॉप!
1 min read
Cannabis Smuggling & Research : गांजा (Cannabis) म्हटलं की डाेळ्यासमाेर येताे ते चिलमीतून निघणारा धूर… अर्थात नशा! अनादीकाळापासून गांजाचा वापर नशेसाठी (Intoxication) केला जात असल्याने गांजा बदनाम झाला आहे. याच कारणामुळे भारतात गांजा उत्पादन, विक्री वाहतूक (Smuggling) आणि वापर यावर नार्कोटिक ड्रग्स ॲण्ड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस कायदा 1985 (NDPS – Narcotic Drugs and Psychotropic Substances) अंतर्गत बंदी घालण्यात आली. असे असताना काही राज्ये गांजा उत्पादनात आघाडीवर आहेत. बदलत्या काळात गांजाकडे संशाेधक नजरेने बघून त्यावर संशाेधन (Research) करणे आणि त्याचा मानवी व गुरांच्या औषधांसाठी वापर करून वाढविणे गरजेचे आहे.
गांजाच्या उत्पादन, वापर व विक्रीवर कायद्याने बंदी आली तरी ओडिशा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि मणिपूर या राज्यांमध्ये जंगल व डोंगराळ भागात गांजाची बेकायदेशीर माेठ्या प्रमाणात लागवडी केली जाते. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्यूरो (NCRB – National Crime Records Bureau) व राज्य पोलीस अहवालांनुसार ओडिशा व आंध्र प्रदेशात जप्त केलेल्या गांजाचे प्रमाण तुलनेने सर्वाधिक असल्याचे दिसून येते. त्यामुळे या दाेन राज्यांमध्ये गांजा उत्पादन अधिक असल्याचे स्पष्ट हाेते. भारतात गांजा उत्पादनाची अधिकृत आकडेवारी कुठल्याही स्वरूपात उपलब्ध नसली तरी, पोलीस व नार्कोटिक्स नियंत्रण विभागाच्या जप्तीच्या अहवालांनुसार ओडिशा व आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये गांजाचे उत्पादन सर्वाधिक असल्याचे स्पष्ट हाेते. विशेष म्हणजे, या दाेन्ही राज्यांमधील गांजा लागवड ही बेकादेशीर आहे.
🎯 ओडिशा (Odisha) मधील गांजा उत्पादक जिल्हे
🔆 मलकानगिरी (Malkangiri)
🔆 कोरापुट (Koraput)
🔆 कंधमाल (Kandhamal)
🔆 नबरंगपूर (Nabarangpur)
🎯 आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) मधील गांजा उत्पादक जिल्हे
🔆 विशाखापट्टणम (Visakhapatnam) – विशेषतः पर्वतीय भाग
🔆 अल्लुरी सीतारामराजू (Alluri Sitarama Raju, माजी Visakhapatnam Agency व East Godavari Agency चा भाग)
🔆 ईस्ट गोदावरी (East Godavari) – काही डोंगराळ पट्टे
🎯 देशभरात NCRB ने जप्त केलेला गांजा
🔆 2020 : 8,53,554.414 किलाेग्रॅम – 853.55 टन
🔆 2021 : 7,96,080.805 किलाेग्रॅम – 79.61 टन
🔆 2022 : 1,716,700.049 किलाेग्रॅम – 1,716.7 टन
2022 मध्ये ओडिशामध्ये 1,69,427 किलाेग्रॅम म्हणजे 169.427 टन आणि आंध्र प्रदेशात 169,202 किलाेग्रॅम म्हणजे 169.202 टन गांजा जप्त करण्यात आला. ही दाेन्ही राज्ये गांजा जप्तीत सर्वाधिक योगदान देणारे होते.
🔆 2018 – 12,28,089.216 किलाेग्रॅम. – 1,228.089216 टन
🔆 2019 – 4,43,978.908 किलाेग्रॅम. – 443.978908 टन
🔆 2020 – 8,53,554.414 किलाेग्रॅम. – 853.554414 टन
🔆 2021 – 7,96,080.805 किलाेग्रॅम. – 796.080805 टन
🔆 2022 – 17,16,700.049 किलाेग्रॅम. – 1,716.700049 टन
🔆 2023 – 6,28,612 किलाेग्रॅम. – 628.612 टन
🔆 2024 – 5,33,903 किलाेग्रॅम. – 533.903 टन
🎯 गांजा जप्त करण्यात आलेली काही प्रमुख राज्य
📍 सन 2018
🔆 मध्य प्रदेश (Madhya Pradesh) – 6,97,330.811 किलाेग्रॅम – 697.330811 टन
🔆 उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) – 1,90,707.753 किलाेग्रॅम – 190.707753 टन
🔆 त्रिपुरा (Tripura) – 62,671.328 किलाेग्रॅम – 62.671328 टन
🔆 ओडिशा (Odisha) – 50,674.944 किलाेग्रॅम – 50.674944 टन
🔆 छत्तीसगड (Chhattisgarh) – 36,271.211 किलाेग्रॅम – 36.271211 टन
📍 सन 2019
🔆 उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) – 1,03,028.541 किलाेग्रॅम – 103.028541 टन
🔆 आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) – 66,665.529 किलाेग्रॅम – 66.665529 टन
🔆 ओडिशा (Odisha) – 61,993.390 किलाेग्रॅम – 61.993390 टन
🔆 तामिळनाडू (Tamil Nadu) – 28,750.360 किलाेग्रॅम – 28.750360 टन
🔆 छत्तीसगड (Chhattisgarh) – 19,936.275 किलाेग्रॅम – 19.936275 टन
📍 सन 2020
🔆 तामिळनाडू (Tamil Nadu) – 2,98,678.461 किलाेग्रॅम – 298.678.461 टन
🔆 उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) – 1,41,614.634 किलाेग्रॅम – 141.614634 टन
🔆 आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) – 1,06,042.775 किलाेग्रॅम – 106.042775 टन
🔆 ओडिशा (Odisha) – 81,841.234 किलाेग्रॅम – 81.841234 टन
🔆 मध्य प्रदेश (Madhya Pradesh) – 24,670.896 किलाेग्रॅम – 24.670896 टन
📍 सन 2021
🔆 आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) – 1,91,712.562 किलाेग्रॅम – 191.712562 टन
🔆 राजस्थान (Rajasthan) – 1,24,018.954 किलाेग्रॅम – 124.018954 टन
🔆 मध्य प्रदेश (Madhya Pradesh) – 37,236.086 किलाेग्रॅम – 37.236086 टन
🔆 महाराष्ट्र (Maharashtra) – 27,424.951 किलाेग्रॅम – 27.424951 टन
🔆 पंजाब (Punjab) – 35,911.914 किलाेग्रॅम – 35.911914 टन
📍 सन 2022
🔆 आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) – 1,69,201.893 किलाेग्रॅम – 169.201893 टन
🔆 राजस्थान (Rajasthan) – 1,46,889.224 किलाेग्रॅम – 146.889224 टन
🔆 ओडिशा (Odisha) – 1,43,303.45 किलाेग्रॅम – 143.30345 टन
🔆 उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) – 1,03,072.055 किलाेग्रॅम – 103.072055 टन
🔆 पंजाब (Punjab) – 46,502.577 किलाेग्रॅम – 46.502577 टन
📍 सन 2023
🔆 ओडिशा (Odisha) – 2,12,777 किलाेग्रॅम – 212.777 टन
🔆 आंध प्रदेश (Andhra Pradesh) – 53,814 किलाेग्रॅम – 53.814 टन
🔆 त्रिपुरा (Tripura) – 49,053 किलाेग्रॅम – 49.053 टन
🔆 उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) – 38,069 किलाेग्रॅम – 38.069 टन
🔆 महाराष्ट्र (Maharashtra) – 18,663 किलाेग्रॅम – 18.663 टन
📍 सन 2024
🔆 ओडिशा (Odisha) – 1,43,761 किलाेग्रॅम – 143.761 टन
🔆 महाराष्ट्र (Maharashtra) – 55,351 किलाेग्रॅम – 55.351 टन
🔆 आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) – 53,983 किलाेग्रॅम – 53.983 टन
🔆 उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) – 41,327 किलाेग्रॅम – 41.327 टन
🔆 त्रिपुरा (Tripura) – 29,530 किलाेग्रॅम – 29.530 टन
सन 2021 पासून महाराष्ट्रात गांजाची अवैध विक्री, वापर आणि वाहतूक वाढली आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात बहुतांश गांजा आंध्र प्रदेश आणि ओडिशातून आणला जाताे. या आकडेवारी पहिले पाच राज्ये घेतली आहेत. इतर राज्यातही गांजा जप्त करण्यात आला आहे. या आकडेवारीवरून देशभरात गांजाचे उत्पादन व वापर किती हाेताे, हे स्पष्ट हाेते.
(सर्व आकडे NCRB : Crime in India मधील राज्यनिहाय संकलित आहेत.)
🎯 औद्योगिक उत्पादन
भांग (Hemp) हे गांजापासून तयार केले जाणारे अधिकृत व वैध परवानगी असलेले औद्योगिक उत्पादन ठरले आहे. उत्तराखंडमध्ये परवानाधारक उद्याेजक भांग उत्पादन करतात. विशेष म्हणजे, यात मादक घटकांचे प्रमाण खूपच कमी असते.
📍 गांजामधील मुख्य घटक व त्याचा औषधी वापर
🔆 टीएचसी – THC (९-टेट्राहायड्रोकानाबिनॉल – Δ-9-Tetrahydrocannabinol) – वेदनाशामक, केमोथेरपी दरम्यानच्या उलट्या/मळमळ कमी करणे, भूक वाढवणे
🔆 सीबीडी – CBD (कॅनाबिडिओल – Cannabidiol) – अपस्मार, चिंता, दाह, वेदना (संशाेधन सुरू आहे)
🔆 सीबीएन – CBN (कॅनाबिनॉल – Cannabinol) – टीएचसीच्या विघटनातून तयार झोपेवर परिणाम, सौम्य वेदनाशामक
🔆 सीबीजी – CBG (कॅनाबिगेरॉल – Cannabigerol) – मूळ कॅनाबिनॉइड, इतरांचे पूर्वरूप दाहरोधक, काही मज्जासंस्था विकारांवर (संशाेधन सुरू आहे)
🔆 सीबीसी – CBC (कॅनाबायक्रोमिन – Cannabichromene) – वेदनाशामक, मूड संबंधित (संशाेधन सुरू आहे)
📍 सुगंध/स्वाद देणारे संयुगे
🔆 मायर्सीन (Myrcene) – दाहरोधक, स्नायू सैलावणे
🔆 लिमोनीन (Limonene) – ताण कमी करणे, मूड सुधारणा
🔆 पायनीन (Pinene) – श्वसनमार्ग विस्तारणे, स्मृती टिकवणे
🔆 लिनालूल (Linalool) – शांत करणारा प्रभाव
📍 इतर घटक
🔆 फ्लॅव्होनॉइड्स (Flavonoids) – अँटिऑक्सिडंट, दाहरोधक (संशाेधन सुरू आहे)
🔆 फायटोस्टेरॉल्स (Phytosterols) – सूज कमी करण्याच्या शक्यता
🎯 गांजाची अधिकृत शेती व उत्पादन
औषधी व वैद्यकीय हेतूसाठी काही देशांनी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनखाली कॅनाबिस (Cannabis) औषधी वापरासाठी परवानगी दिली आहे व त्यानुसार त्या देशांमध्ये गांजाची अधिकृत लागवड होते.
🔆 कॅनडा – वैद्यकीय व मनोरंजनात्मक (दोन्ही) वापरासाठी 2018 पासून राष्ट्रीय स्तरावर कायदेशीर; परवाना मिळालेल्या फार्म्सवर गांजाचे उत्पादन घेतले जाते.
🔆 जर्मनी – वैद्यकीय वापरासाठी कडक परवाने, काही प्रमाणात देशांतर्गत लागवड व अधिकृत आयात केली जाते.
🔆 इस्राएल – वैद्यकीय संशोधन आणि क्लिनिकली सुपरवाइज्ड वितरण; परवानाधारक शेतांवर लागवड केली जाते.
🔆 थायलंड – सन 2022 पासून वैद्यकीय वापरासाठी कायदेशी मान्य; सरकार नियंत्रित शेतांमध्ये उत्पादन घेतले जाते..
🔆 मनोरंजनात्मक (Recreational) वापरासाठी कायदेशीर
काही देश/राज्यांनी नियंत्रित मनोरंजनात्मक वापर परवानगीसह मान्य केला असून व्यावसायिक उत्पादन/विक्री नियंत्रित फ्रेमवर्कमध्ये होते.
🔆 कॅनडा व उरुग्वे – राष्ट्रीय पातळीवर मनोरंजनात्मक वापर व नियमनबद्ध विक्री.
🔆 अमेरिकेतील काही राज्ये (कॅलिफोर्निया, कोलोरॅडो, वॉशिंग्टन, इत्यादी) – राज्यकायद्यानुसार मनोरंजनात्मक लागवड/विक्री कायदेशीर (फेडरल कायदा मात्र मर्यादा घालतो).
गांजावर संशाेधन करून त्यातील आवश्यक घटक काढून घेत त्याचा मानव व गुरांच्या औषधांमध्ये वापर करणे आवश्यक आहे. त्यातील कुठल्या घटकांची तीव्रता कमी करून त्याचा औद्याेगिक उत्पादने तयार करण्यासाठी कितपत वापर करता येताे, हे तपासून बघणे गरजेचे आहे. याच घटकांवर इतर देशांमध्ये संशाेधन केले जात आहे काय? त्या देशांमध्ये गांजाची मागणी निर्माण हाेऊ शकते काय? त्या देशांमध्ये गांजा निर्यात करता येऊ शकताे काय? या दिशेने सकारात्मक विचार व संशाेधन करणे आवश्यक आहे. साेबतच गांजाचा वापर नशासाठी केला जाणार नाही, याची काळजी घेणे, त्यादृष्टीने आवश्यक उपाययाेजना करणेही गरजेचे आहे.