Possibility of rain : महाराष्ट्रात आणखी तीन दिवस पावसाची शक्यता
1 min read
Possibility of rain : संपूर्ण महाराष्ट्रात बुधवार (दि. 25 सप्टेंबर) ते शुक्रवार (दि. 27 सप्टेंबर) या तीन दिवसांत विजांच्या कडकडाटासह (Lightning strikes) जाेरदार व अतिजाेरदार परतीच्या (Return) पावसाची (Rain) शक्यता (Possibility) निर्माण झाली आहे. मराठवाडा व विदर्भात ही परिस्थिती रविवार (दि. 30 सप्टेंबर) पर्यंत टिकून राहण्याची शक्यता आहे.
🔆 36 तास अतिजोरदार पावसाचे
बुधवार (दि. 25)ची रात्र व गुरुवार (दि. 26)चा दिवस व रात्र असे 36 तास रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड अशा 16 जिल्ह्यात अंदाजे 12 ते 20 सेंटिमीटर दरम्यानचा अतिजोरदार किंवा काही ठिकाणी 20 सेंटिमीटरपेक्षाही अधिक अशा अत्याधिक जोरदार परतीच्या पावसाची शक्यता जाणवते. विशेषतः मध्य महाराष्ट्रातील पर्जन्यछायेतील प्रदेशात परतीच्या पावसाचा जोर या 36 तासात अधिक जाणवेल.
🔆 पूरजन्य परिस्थिती
कोकणातील मुंबई शहर व उपनगर, ठाणे व उपनगर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा 7 जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर अशा 6 जिल्ह्यातील तापी, गोदावरी व कृष्णा नद्यांच्या खोऱ्यात येत्या तीन दिवसांत पूर परिस्थिती जाणवू शकते.
🔆 पावसाचा जोर कधी कमी होणार?
खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर अशा 10 जिल्ह्यात शनिवार (दि. 28 सप्टेंबर)पासून पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे.
🔆 झडीचे शास्त्रीय कारण
मागच्य आठवड्यात झडीचे वातावरण निर्माण झाले हाेते. त्याचे शास्त्रीय कारण असे की, अति टोकाचे 102 वर्षानंतर सप्टेंबर 2019 च्या शेवटच्या 10 दिवसात परतीचा पाऊस फिरण्यापूर्वी बळकट आयओडी व 10 दिवस एकाच ठिकाणी खिळलेल्या डिप्रेशनमुळे तयार झालेल्या वातावरणातून तो पाऊस झाला होता. तो झडीचा नव्हे तर उत्तरा नक्षत्रातील वळीव स्वरुपातील गडगडाटीचा पाऊस होता. बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व काहीसा गुजरातमध्ये महापुराने ही राज्ये धुवून काढणारा तो पाऊस होता. त्यामुळे त्याचा झडीशी संबंध लावू नये. जसा भूकंप दरवर्षी होत नाही, तसे प्रत्येक सप्टेंबर महिन्यातील पावसाशी त्याचा संबंध लावू नये. असे वातावरण क्वचितच एखाद्या वर्षी घडून येते.
🔆 परतीचा पाऊस
अति वायव्य राजस्थान व कच्छ परिसरातून वायव्यई वारा, खालावणारी आर्द्रता व प्रत्यावर्ती वाऱ्याची स्थिती या बदलानुसार सोमवार (दि. 23 सप्टेंबर)पासून मान्सून राजस्थान, कच्छमधून परतण्यास सुरुवात झाली आहे.