krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Orange export subsidy proposal : संत्रा उत्पादन सात जिल्ह्यात; निर्यात सबसिडी प्रस्ताव एकाच जिल्ह्यातून

1 min read

Orange export subsidy proposal : आयात शुल्कामुळे (Import duty) नागपुरी संत्र्याची (Nagpuri orange) बांगलादेशातील निर्यात (Export) मंदावली आणि देशांतर्गत बाजारातील संत्र्याचे दर काेसळल्याने संत्रा उत्पादकांचे माेठे आर्थिक नुकसान झाले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने 7 डिसेंबर 2023 राेजी बांगलादेशात निर्यात हाेणाऱ्या संत्र्याला 50 टक्के म्हणजेच 44 रुपये प्रति किलाे सबसिडी (Subsidy) जाहीर केली. ही सबसिडी देण्यासाठी राज्य सरकारच्या पणन संचालनालयाने संत्रा उत्पादक जिल्ह्यांमधील जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या माध्यमातून संत्रा निर्यातीचे प्रस्ताव (Proposal) मागितले. यात राज्यातील अमरावती या एकमेव जिल्ह्यातून पुणे येथील पणन संचालनालय कार्यालयाला 22 कंपन्यांचे 37 प्रस्ताव पाठविण्यात आले.

🍊 संत्रा उत्पादक जिल्हे
महााष्ट्रात दाेन लाख हेक्टरवर संत्र्याच्या बागा असून, १ लाख 80 हजार हेक्टरवरील संत्रा बागा विदर्भात आणि 20 हजार हेक्टरमधील संत्रा बागा इतर जिल्ह्यात आहेत. यातील १ लाख 60 हजार हेक्टरमधील बागा उत्पादनक्षम आहेत. विदर्भात संत्र्याच्या सर्वाधिक बागा अमरावती आणि नागपूर जिल्ह्यात असून, त्याखालाेखाल वर्धा, बुलढाणा, अकाेला व वाशिम जिल्ह्यात आहेत. विदर्भ वगळता अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात संत्रा बागा असून, अहमदनगरमधील संत्रा नागपुरी असला तरी नाशिकमधील संत्रा हा नागपुरी नाही. विदर्भात अंबिया बहाराचे 60 टक्के आणि मृग बहाराच्या संत्र्याचे 40

🍊 निर्यात सबसिडी आणि प्रस्ताव
बांगलादेशने ऑक्टाेबर 2019 मध्ये नागपुरी संत्र्यावर प्रतिकिलाे 20 टका म्हणजेच 14.29 रुपये आयात शुल्क लावला. एवढेच नव्हे तर यात पाच वर्षात सातत्याने वाढ केली. चार वर्षात म्हणजेच सन 2023 मध्ये हा आयात शुल्क प्रतिकिलाे 88 टका अर्थात 62.86 रुपये तर सन 2024 मध्ये प्रतिकिलाे 101 टका म्हणजे 72.95 रुपये करण्यात आला. या आयात शुल्कमुळे बांगलादेशात संत्र्याचे दर वाढले आणि मागणी घटल्याने भारतातून हाेणारी निर्यात मंदावली. परिणामी सन 2023 च्या हंगामात शेतकऱ्यांना अंबिया बहाराचा संत्रा कमी दरात विकावा लागला आणि प्रति क्विंटल 7 ते 10 हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. यातून मार्ग काढण्यासाठी संत्रा निर्यातीला सबसिडी देण्याची मागणी शेतकऱ्यांनी रेटून धरली आणि त्यासाठी आंदाेलनेही केली. परिणामी, राज्य सरकारने 7 डिसेंबर 2023 राेजी संत्र्याला 50 टक्के म्हणजे 44 रुपये प्रतिकिलाे निर्यात सबसिडी जाहीर केली. ही सबसिडी देण्यासाठी 171 काेटी रुपयांची तरतूद केल्याचे राज्य सरकारने जाहीर केले हाेते.

🍊 केवळ अमरावती जिल्ह्यातून प्रस्ताव
ही सबसिडी पणन संचालनालयाच्या माध्यमातून संत्रा निर्यात करणारे शेतकरी (Farmer), शेतकरी गट (Farmers group), शेतकरी उत्पादक कंपनी (Farmers Producers Company), सहकारी प्रक्रिया संस्था (Cooperative Processing Organization) आणि निर्यातदार (Exporter) यांनाच देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या पणन मंत्रालयाने घेतला. त्याअनुषंगाने पणन संचालनालयाने संत्रा उत्पादक जिल्ह्यांमधील जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून संत्रा निर्यातीचे प्रस्ताव 31 मार्च 2024 पर्यंत मागितले. अमरावती जिल्हा उपनिबंधक (District Deputy Registrar) कार्यालयाने पणन संचालनालय कार्यालयाला संत्रा निर्यातीचे एकूण 37 प्रस्ताव पाठविले. हे प्रस्ताव एकूण 22 कंपन्यांचे आहेत.

🍊 मुदतीनंतर स्वीकारले प्रस्ताव
ही सबसिडी अंबिया बहाराच्या सन 2023 मधील हंगामासाठी देण्यात आली हाेती. हा हंगाम डिसेंबर 2023 मध्येच संपला. प्रस्ताव मागविण्याची प्रक्रिया 18 जानेवारी 2024 पासून सुरू करण्यात आली. निर्यातदारांना 31 मार्च 2024 पर्यंत संत्रा निर्यातीचे प्रस्ताव जिल्हा उपनिबंधकांच्या माध्यमातून पणन संचालनायला सादर करायचे हाेते. मात्र, पणन संचालनालयाने हे प्रस्ताव मे 2024 पर्यंत स्वीकारले. पणन संचालनालयाने मार्च 2024 मध्ये 24, एप्रिलमध्ये 7 आणि मे महिन्यात 6 प्रस्ताव स्वीकारले.

🍊 नऊ प्रस्ताव विचाराधीन
राज्य सरकारच्या पणन संचालनालयाने मे 2024 पर्यंत प्राप्त झालेल्या 22 कंपन्यांच्या 37 प्रस्तावांची छाननी केली आणि यातील 9 प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविले. हे नऊ प्रस्ताव नेमके काेणकाेण्त्य कंपन्यांचे आहेत आणि ते किती काेटी रुपयांचे आहेत? हे पणन मंत्रालयाने अद्याप स्पष्ट केले नाही. विशेष म्हणजे, राज्य सरकारने या प्रस्तावांना अद्याप मंजुरी दिली नसल्याने कुणालाही संत्रा निर्यात सबसिडी मिळाली नाही.

🍊 अमरावती जिल्हा व वरुड तालुका आघाडीवर
अमरावती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने 22 कंपन्यांचे 37 प्रस्ताव पणन संचालनालयाला पाठविले आहे. याच जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील चार कंपन्यांचे 11 तर काेलकाता (पश्चिम बंगाल) येथील 26 कंपन्यांचे प्रस्ताव अमरावती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला प्राप्त झाले हाेते. यात वरुड तालुक्यातील ताज फ्रुट कंपनीच्या पाच, रियाज फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या तीन, एम. के. सी. ॲग्रो फ्रेश लिमिडेड कंपनीच्या दाेन आणि जे. के. ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या एका प्रस्तावाचा समावेश आहे. संत्रा निर्यात सबसिडी प्रस्ताव पाठविणारा अमरावती जिल्हा आणि वरुड तालुका एकमेव ठरला आहे. हा प्रकार देखील सबसिडी व सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.

🔔 प्रस्ताव प्राप्त तरीख – कंपनीचे नाव – सबसिडी रक्कम
💰 07-03-2024 :- ताज फ्रुट कंपनी, वरुड, ता. वरुड, जिल्हा अमरावती :- 1,31,73,181.14 रुपये.
💰 21-03-24 :- ताज फ्रुट कंपनी, वरुड, ता. वरुड, जिल्हा अमरावती :- 81,68,289.00 रुपये.
💰 09-05-2024 :- ताज फ्रुट कंपनी वरुड, ता. वरुड, जिल्हा अमरावती :- 1,74,70,735.32 रुपये.
💰 09-05-2024 – ताज फ्रुट कंपनी वरुड, ता. वरुड, जिल्हा अमरावती :- 1,69,31,736.30 रुपये.
💰 09-05-2024 – ताज फ्रुट कंपनी वरुड, ता. वरुड, जिल्हा अमरावती :- 1,59,87,057.16 रुपये.
💰 21-03-24 :- जे. के. ॲग्रो इंडस्ट्रीज वरुड, ता. वरुड, जिल्हा अमरावती :- 6,84,68,365.00 रुपये.
💰 28-03-2024 :- रियाज फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. तिवसा घाट, ता. वरुड, जिल्हा अमरावती :- 1,74,55,015.73 रुपये.
💰 28-03-2024 :- रियाज फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. तिवसा घाट, ता. वरुड, जिल्हा अमरावती :- 40,18,766.47 रुपये.
💰 05-05-2024 :- रियाज फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. तिवसा घाट, ता. वरुड, जिल्हा अमरावती :- 24,62,840.53 रुपये.
💰 28-03-2024 :- एम. के. सी. ॲग्रो फ्रेश लि. वरुड, ता. वरुड, जिल्हा अमरावती :- 1,31,87,641.52 रुपये.
💰 28-03-2024 :- एम. के. सी. ॲग्रो फ्रेश लि. वरुड, ता. वरुड, जिल्हा अमरावती :- 2,53,67,863.40 रुपये.
💰 22-04-2024 :- मोहम्मद फैयाज अहमद, कोलकाता :- 1,57,15,192.40 रुपये
💰 22-04-2024 :- मोहम्मद फैयाज अहमद, कोलकाता :- 71,97,527.34 रुपये.
💰 22-04-2024 :- मोहम्मद फैयाज अहमद, कोलकाता :- 1,04,39,669.61 रुपये.
💰 25-04-2024 :- मोहम्मद फैयाज अहमद, कोलकाता :- 1,15,91,826.01 रुपये.
💰 25-04-2024 :- मोहम्मद फैयाज अहमद, कोलकाता :- 35,33,866.94 रुपये.
💰 05-05-2024 :- एशियन स्टार एन्टरप्राईझेस, मदन मोहन बुरहान, कोलकाता :- 1,42,09,292.58 रुपये.
💰 05-05-2024 :- एशियन स्टार एन्टरप्राईझेस मदन मोहन बुरहान, कोलकाता :- 1,11,82,314.62 रुपये.
💰 05-05-2024 – एशियन स्टार एन्टरप्राईझेस मदन मोहन बुरहान, कोलकाता :- 59,99,374.91 रुपये.
💰 23-04-2024 :- एशियन स्टार एन्टरप्राईजेस मदन माेहन बुरहान, कोलकाता :- 33,09,206.22 रुपये.
💰 07-03-2024 :- नूर ईन्फेस बागायतदार, वेस्ट बंगाल, कोलकाता :- 22,18,740.00 रुपये.
💰 21-03-24 :- बिस्मीला इन्टरनॅशनल बलालदास स्ट्रीट, कोलकाता :- 7,92,331.25 रुपये.
💰 09-05-2024 :- मे. बिसाल एक्सपोर्ट, वेस्ट बंगाल कोलकाता :- 1,84,80,223.84 रुपये.
💰 28-03-2024 :- जे. के. इअरप्राईजेस, कोलकाता पश्चिम बंगाल :- 99,75,972.21 रुपये.
💰 28-03-2024 :- मे. ग्रेन एक्सपोर्ट, गोकुलपूर, स्वरुपनगर, कोलकाता :- 31,40,484.99 रुपये.
💰 05-05-2024 :- सा. एक्झीम प्रायव्हेट लि., मदन मोहन बुरहान, कोलकाता :- 1,09,02,650.25 रुपये.
💰 23-04-2024 :- एस. ए. ए. एक्सीम इंटरनॅशनल, कोलकाता :- 35,39,010.80 रुपये.
💰 09-05-2024 :- सा. एक्सीस प्रायव्हेट लि. मदन मोहन बुरहान, कोलकाता :- 1,26,72,257.43 रुपये.
💰 05-05-2024 :- अनस ऐटरप्राईजेस, मदन मोहन बुरहान, कोलकाता :- 1,41,31,226.93 रुपये.
💰 05-05-2024 :- आलमगिर एंटरनॅशनल, कोलकाता :- 3,11,00,118.42 रुपये.
💰 22-04-2024 :- मे. एस. पी. एन्टरप्राईजेस, कोलकाता :- 52,36,035.34 रुपये.
💰 22-04-2024 :- मे. नॅशनल ट्रेडिंग कार्पोरेशन, कोलकाता :- 33,88,362.45 रुपये.
💰 22-04-2024 :- मे. एम. टी. ई. एक्सिस प्रायव्हेट लि., कोलकाता :- 1,19,42,847.13 रुपये.
💰 25-04-2024 :- मे. एम. टी. ई. एक्सिस प्रायव्हेट लि., कोलकाता :- 1,96,91,053.29 रुपये.
💰 23-04-2024 :- मरीयम एन्टरप्रायजेस, कोलकाता :- 4,09,12,576.71 रुपये.
💰 23-04-2024 :- अध्यान इंटरनॅशनल, कोलकाता :- 56,65,353.98 रुपये.
💰 09-05-2024 :- मॉ. सिद्धेश्वरी एन्टरप्राईजेस, बोनगाव, वेस्ट बंगाल, कोलकाता :- 1,79,71,831.51 रुपये.

💰 एकूण :- 49,76,30,838.73 रुपये

🎯 ताज फुट कंपनी, वरुड ता. वरुड जि. अमरावती – 5 प्रस्ताव – 7,17,30,998.92 रुपये.
🎯 रियाज फार्मर प्रोड्युसर कंपनी लि., तिवसा घाट, ता. वरुड, जिल्हा अमरावती – 3 प्रस्ताव – 2,39,36,622.73 रुपये.
🎯 एम. के. सी. ॲग्रो फ्रेश लि., वरुड, ता. वरुड, जिल्हा अमरावती – 2 प्रस्ताव – 3,85,55,504.92 रुपये.
🎯 मोहम्मद फैयाज अहमद कोलकाता – 5 प्रस्ताव – 4,84,78,082.30 रुपये.
🎯 एशियन स्टार एन्टरप्राईझेस, मदन मोहन बुरहान, कोलकाता – 4 प्रस्ताव – 3,47,00,187.75 रुपये
🎯 मे. एम. टी. ई. एक्सिस प्रायव्हेट लि., कोलकाता – 2 प्रस्ताव – 3,16,33,900.42 रुपये.
🎯 जे. के. ॲग्रो इंडस्ट्रीज वरुड ता.वरुड जि. अमरावती (6,84,68,365.00) यांच्यासह इतर 17 कंपन्यांचे प्रत्येकी- 1

☢️ वरुड (जिल्हा अमरावती) तालुक्यातील चार कंपन्यांचे 11 प्रस्ताव :- 20,26,91,491.57 रुपये.
☢️ इतर कंपन्यांचे 26 प्रस्ताव :- 29,49,39,347.16 रुपये.

🍊 सबसिडी व सरकारच्या धाेरणावर प्रश्नचिन्ह
काेणत्या कंपनीने किती टन संत्रा बांगलादेशात निर्यात केला? त्यांनी हा संत्रा शेतकऱ्यांकडून किती दरात खरेदी केला? या संत्रा विक्रीतून निर्यातदारांना किती रुपये मिळाले? या व्यवहारात निर्यातदारांचे नेमके किती आर्थिक नुकसान झाले? याची माहिती राज्य सरकारकडे उपलब्ध नाही. सरकारकडे उपलब्ध नसलेली माहिती, विचाराधीन असलेल्या नऊ प्रस्तावांबाबत पाळली जात असलेली गाेपनीयता आणि एकट्या अमरावती जिल्हा व वरुड तालुक्यातून प्राप्त हाेणारे प्रस्ताव विचारात घेता संत्रा निर्यातदारांना दिल्या जाणाऱ्या या सबसिडी तसेच सरकारच्या निर्णय व धाेरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!