krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Palm and Refined oil : पामतेल व रसायन मिश्रित रिफाइंड ऑइल मानवी आराेग्यास घातक

1 min read
Palm and Refined oil : माणसांना हाेणाऱ्या किमान 70 टक्के आजारांचे मूळ पाेटात असते. त्याला आपली पचनशक्ती (Digestive power), जीवनशैली (Lifestyle), आपण खात असलेले खाद्यपदार्थ यासह इतर काही बाबी कारणीभूत असतात, असे आयुर्वेदिक डाॅक्टर सांगतात. यात आपण राेज खात असलेले खाद्यतेल (Edible oil) अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. बहुतांश मंडळी आराेग्याला गाैण तर जीवनशैली आणि चवीला अधिक महत्त्व देत असल्याचेही अनेकदा निदर्शनास आले आहे. अलीकडे हाॅर्ट अटॅक (Heart attack) व डायबिटीस (Diabetes) या आजारांचे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे. त्यामुळे आपण राेज खात असलेले रिफाइंड तेल (Refined oil) आपल्या व कुटुंबीयांच्या आराेग्यासाठी सुरक्षित आहे का? याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

🔆 खाद्यतेलाचे परावलंबित्व
देशाच्या लाेकसंख्येसाेबतच खाद्यतेलाचा वापर आणि मागणी वाढत गेली. दुसरीकडे, नागरिकांना कमी दरात खायला मिळावे म्हणून तेलबियांचे (Oilseeds) दर नियंत्रित करण्याचे धाेरण आजवरच्या केंद्रातील सर्व सरकारांनी केले आहे. दर कमी मिळताे म्हणून शेतकऱ्यांनी उत्पादनासाठी तेलबियांना पर्यायी पिकांची निवड केली. त्यामुळे तेलबियांचे पेरणीक्षेत्र कमी हाेत गेले आणि खाद्यतेलाचा वापर व मागणी वाढत गेली. केंद्र सरकारच्या चुकीच्या धाेरणांमुळे एकेकाळी तेलबिया व खाद्यतेलाच्या उत्पादनात स्वयंपूर्ण असलेला भारत आता परावलंबी झाला आहे.

🔆 पामतेलाच्या आयातीवर भर
खाद्यतेलाची गरज पूर्ण करण्यासाठी भारतात एकूण उत्पादनाच्या 68 ते 70 टक्के खाद्यतेल दरवर्षी आयात (Import) करावे लागते. यात सर्वाधिक म्हणजेच एकूण आयातीच्या 66 टक्के पामतेल (Palm oil) तर 34 टक्के साेयाबीन (Soybean) व सूर्यफुलाचे तेल (Sunflower oil) आयात केले जाते. जागतिक बाजारात इतर खाद्यतेलाच्या तुलनेत पामतेलाचे दर बरेच कमी असतात. त्यामुळे आजवरच्या केंद्र सरकारांनी केवळ पैसे वाचविण्यासाठी पामतेलाच्या आयातीवर व ते प्रत्येक रिफाइंड ऑइलमध्ये मिसळण्यावर विशेष भर दिला आहे. हे सर्व करताना काेणत्याही सरकारने अथवा सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या आराेग्याकडे लक्ष दिले नाही व आजही दिले जात नाही.

🔆 पामतेल व रसायनांची भेसळ सरकारमान्य
खाद्यतेलाची गरज पूर्ण करण्यासाठी 30 वर्षांपूर्वी रिफाइंड ऑइल ही संकल्पना पुढे आली. सन 2002 पासून प्रत्येक रिफाइंड तेलात पामतेल मिसळणे सुरू झाले. याला केंद्र सरकारची अधिकृत परवानगी आहे. दाेन टक्क्यांपासून सुरू झालेली रिफाइंड ऑइलमधील ही भेसळ आता 62 ते 65 टक्क्यांवर पाेहाेचली आहे. म्हणजेच आपण जर एक लिटर (1,000 ML) साेयाबीन तेल खरेदी केले तर त्यात साेयाबीनचे मूळ तेल 350 ते 380 ML आणि 620 ते 650 ML पामतेल असते. आपण खरेदी करीत असलेल्या सिंगल रिफाइंड खाद्यतेलात 7 तर डबल रिफाइंड खाद्यतेलात 14 वेगवेगळ्या प्रकारचे रसायने मिसळली जातात. ही रसायने प्रति लिटर खाद्यतेलात किमान 50 ते 80 ML जरी मिसळली तरी साेयाबीनच्या मूळ तेलाचे प्रमाण आणखी कमी हाेते. ही बाब प्रत्येक रिफाइंड खाद्यतेलास लागू आहे. विशेष म्हणजे, मानवी आराेग्याला अत्यंत घातक असलेली खाद्यतेलातील ही भेसळ सरकारमान्य आहे.

🔆 रिफाइंड तेलात घातक रसायनांचा वापर
रिफाइंड ऑइलमध्ये पामतेलासाेबत रसायनांची (Chemicals) केली जाणारी ही अधिकृत व सरकारमान्य भेसळ मानव आराेग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक व विविध आजारांना निमंत्रण देणारी आहेत, अशी माहिती तज्ज्ञ डाॅक्टरांसह केमिस्टनी दिली आहे. रिफाइंड तेल तयार करण्यासाठी पामतेलाचा ब्लेंडिंग (Blending) म्हणून वापर केला जातो. या पामतेलात आधीच डालडा व चरबीचा वापर केला जाताे. केमिकल्स वापरल्याशिवाय तेल रिफाइंड होत नाही. सिंगल रिफाइंडसाठी गॅसोलिन (Gasoline), सिंथेटिक अँटी ऑक्सिडंटस् (Synthetic antioxidants), हेक्सेन (Hexane) यासह एकूण 7 तर डबल रिफाइंडमध्ये 14 घातक केमिकल्स वापरली जातात. या केमिकल्समुळे त्या तेलाचा वास येत नाही. चव आणि चिकटपणा नष्ट हाेताे. त्यात काेणतेही प्रोटीन (Protein), फॅटी अॅसिड (Fatty acids), व्हिटॅमिन ई (Vitamin E) व मिनरल्स (Minerals) तसेच मानवी आराेग्याला आवश्यक असलेले घटक शिल्लक राहत नाही. बहुतांश मंडळी त्यांच्या आराेग्याऐवजी गंध व चव रहित खाद्यतेल खाण्याला प्राधन्य देतात. जे लाेकं कडक उपवास करतात व खनिज मीठ वापरतात त्यांनी तळण्यासाठी चुकूनही रिफाइंड तेल वापरू नये, असा सल्लाही डाॅक्टर देतात.

🔆 हार्ट अटॅकला निमंत्रण
पामतेल व केमिकल्समिश्रित रिफाइंड तेलामुळे मानवी शरीरात काही घातक घटक तयार होतात. त्याला एल. डी. एल. (Low density lipoprotein) म्हणतात. त्यामुळे रक्त घट्ट (Blood thickens) हाेणे, रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजस् (Blockages) तयार होऊन हार्ट अटॅकचा (Heart attack) धाेका संभवताे. काहींच्या शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचित पावतात. वात विकार असंतुलित राहताे. साेबतच गंभीर आजार उद्धभवतात, अशी माहिती डाॅक्टरांनी दिली.

🔆 उकळलेल्या तेलात विषारी घटक
या खाद्यतेलाला रिफाइंड करताना पहिल्यांदा 300 आणि दुसऱ्यांदा 464 डिग्री सेल्सिअस इतक्या उच्च तापमानावर उकळले जाते. तेल एकदा उकळले तर ते पुन्हा खाण्यायोग्य राहत नाही. डबल व ट्रिपल रिफाइंड करताना हे तेल दोनदा व तीनदा उकळल्याने त्यात काही विषारी घटक तयार हाेतात. त्यामुळे हाॅटेलमध्ये वारंवार उकळलेल्या तेलात तळलेले खाद्यपदार्थ खाऊ नये, असा सल्ला डाॅक्टर देतात. वारंवार उकळल्यामुळे या तेलाची घनता कमी हाेते. त्यामुळे या तेलाचा वापर आणि त्यावरील खर्चही वाढताे.असे असले तरी देशातील सत्ताधाऱ्यांसाेबतच नागरिकही मानवी आराेग्यास घातक असलेले, त्यात विषारी घटत तयार झालेले सिंगल, डबल व ट्रिपल रिफाइंड खाद्यतेल खाण्यात व स्वत:सह कुटुंबीयांचे आराेग्य बिघडवून घेण्यात धन्यता मानत आहेत.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!